Maharashtra Politics Updates Today : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. या विधानसभेच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. यातच ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. काही मतदारसंघात बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली तेथे काहीजण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का? हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. या बरोबरच माहीम विधानसभा मतदारसंघावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबतं सुरु आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून सदा सरवणकर आपली उमेदवारी मागे घेतात का? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील हे आज आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे. सर्व उमेदवारांना मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी या ठिकाणी येण्याचं आवाहन केलं आहे. तसेच निवडणुकी संदर्भातील बातम्यांचा आढावा आणि राजकीय घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा