2024 Maharashtra Vidhan Sabha Election Live Updates, 17 November 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार संपायला अवघे दोन दिवस बाकी आहेत. हा प्रचार अंतिम टप्प्यात असून ठिकठिकाणी राजकीय नेत्यांकडून जाहीर सभा घेतल्या जात आहेत. प्रचार संपण्यापूर्वी आज शेवटचा रविवार असल्याने जवळपास सर्वच राजकीय नेत्याच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभांमधून हे नेते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. याशिवाय शनिवारी रात्री अमरावतीत नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत राडा बघायला मिळाला आहे. यावरून आता राजकीय प्रतिक्रियाही उमटण्याची शक्यता आहे. एकंदरितच राज्यात निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक घडामोडींकडे आपलं लक्ष राहणार आहे.
Maharashtra Breaking News Live Today, 17 November 2024 : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा
Sanjay Raut : एकनाथ शिंदे दिल्लीसमोर हुजरेगिरी करतात, संजय राऊतांची टीका
आज एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक दिल्लीसमोर मुजरा करत आहेत. हे बाळासाहेबांना मान्य नव्हते. बाळासाहेबांनी कधीच काँग्रेसचा तिरस्कार केला नाही. इंदिरा गांधींपासून ते राजीव गांधींपर्यंत प्रत्येक वेळी राष्ट्रहिताच्या प्रश्नांवर पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांबरोबर त्यांची जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराष्ट्रात एकोपा राहील. याचा प्रयत्न बाळासाहेबांनी केला. एकनाथ शिंदेंना बाळासाहेब माहिती नाही. त्यांनी टेंभी नाक्या पलिकडे जग बघितलं नाही. ते आज आम्हाला बाळासाहेब ठाकरे सांगणार का? अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
गृहमंत्री शहा यांचा दौऱ्यात नक्सली एलिमेंट नजरेत,शहा चहा घेत नाही म्हणून मग,,,
वर्धा : विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मोठमोठे नेते मैदानात उतरले आहेत. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, काँग्रेसच्या प्रियांका गांधी व अन्य विदर्भ दौऱ्यावर आहेत.
प्रियंका गांधींचा आज नागपुरात या दोन ठिकाणी 'रोड-शो'
नागपूर : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी रविवारी नागपुरात दोन मतदारसंघात रोड-शो करणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पक्षाने जोरदार तयारी केली आहे.
आदित्य ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन
आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त राजकीय नेत्यांकडून त्यांना अभिवादन केले जात आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनीही एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन केलं आहे.
…तर भाजप, काँग्रेसला बाहेर ठेऊन सत्तास्थापनेचा नवा प्रयोग, आंबेडकर
अकोला : विधानसभा निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची चिन्हे नाहीत. निकालानंतर राजकीय खिचडी होण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दोन जाहीर सभा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अक्कलकुवा येथे जाहीर सभा घेणार आहेत. याशिवाय साक्री येथेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा होणार आहे.
Devendra Fadnavis : राज्यात आज देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका
देवेंद्र फडणवीस आज सकाळी ९ वाजता नागपूरमध्ये एक प्रचाररॅलीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता नाशिकमध्ये त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय दुपारी ४ वाजता नाशिकमध्ये ते दुसऱ्या एक सभेला संबोधित करणार आहेत. तर सायंकाळ इचलकरंजी येथे देवेंद्र फडणवीसांची सभा होणार आहे.
Uddhav Thackeray In Patan : उद्धव ठाकरे आज पाटणमध्ये; हर्षल कदम यांच्या प्रचारार्थ घेणार सभा
उद्धव ठाकरे आज सकाळी ११ वाजता हर्षल कदम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.
Balasaheb Thackeray : आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर दर्शनासाठी देशभरातून शिवसैनिक दाखल होत आहेत. त्यासाठी महानगरपालिका आणि पोलीसनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Nitin Gadkari Rally in Karjat Jamkhed : कर्जत जामखेडमध्ये नितीन गडकरी यांची सभा
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या आज कर्जत जामखेडमध्ये सभा घेणार आहेत. रोहित पवार यांच्या मतदारसंघात ही सभा होत असल्याचे याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. याशिवाय नितीन गडकरी आज मुंबईत २ आणि ठाण्यात २ जाहीर सभा घेणार आहेत.
काँग्रेच्या नेत्या प्रियंका गांधी-वाड्रांचा आज नागपुरात रोड शो होणार आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पश्चिम नागपुरचे उमेदवार विकास ठाकरे आणि मध्य नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी हा रोड-शो करणार आहे. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील अवस्थी चौक ते दिनशॉ फॅक्ट्री चौकपर्यंत असा हा रोडशोचा मार्ग आहे.
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून उद्या १८ नोव्हेंबर रोजी प्रचाराची मुदत संपणार आहे. मात्र, त्यापूर्वी अमरावतीत माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत राडा झाल्याचं बघायला मिळालं आहे. यावेळी काही लोकांनी नवनीत राणा यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. या हल्ल्यात त्यांचा अंगरक्षण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून उद्या १८ नोव्हेंबर रोजी प्रचाराची मुदत संपणार आहे. मात्र, त्यापूर्वी अमरावतीत माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत राडा झाल्याचं बघायला मिळालं आहे. यावेळी काही लोकांनी नवनीत राणा यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. या हल्ल्यात त्यांचा अंगरक्षण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.