2024 Maharashtra Vidhan Sabha Election Updates, 17 November 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार संपायला अवघे दोन दिवस बाकी आहेत. हा प्रचार अंतिम टप्प्यात असून ठिकठिकाणी राजकीय नेत्यांकडून जाहीर सभा घेतल्या जात आहेत. प्रचार संपण्यापूर्वी आज शेवटचा रविवार असल्याने जवळपास सर्वच राजकीय नेत्याच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभांमधून हे नेते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. याशिवाय शनिवारी रात्री अमरावतीत नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत राडा बघायला मिळाला आहे. यावरून आता राजकीय प्रतिक्रियाही उमटण्याची शक्यता आहे. एकंदरितच राज्यात निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक घडामोडींकडे आपलं लक्ष राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 17 November 2024 : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा

19:12 (IST) 17 Nov 2024

महाराष्ट्रामध्ये महायुतीचे महाभ्रष्ट सरकार, काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगढी यांची खरमरीत टीका

अकोला : महाराष्ट्रामध्ये महायुतीचे महाभ्रष्ट सरकार अस्तित्वात होती. त्या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांपासून महाराष्ट्राला स्वतंत्र करण्याची वेळ आली आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे राज्यसभा खासदार इमरान प्रतापगढी यांनी केली.

सविस्तर वाचा…

18:14 (IST) 17 Nov 2024

पहिल्या दिवशी छातीत दुखू लागल्याने मुंबईत परतलेला गोविंदा दुसऱ्या दिवशी रोड शोसाठी पुन्हा हजर

जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवारासाठी आयोजित केलेल्या रोड शो दरम्यान शनिवारी अचानक छातीत दुखू लागल्याने मुंबईला परत जावे लागलेला अभिनेता गोविंदा दुसऱ्याच दिवशी रविवारी जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील रोड शोसाठी पुन्हा उपस्थित राहिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

सविस्तर वाचा…

17:57 (IST) 17 Nov 2024

उद्योगपतींसाठी आदिवासींच्या जमिनी बळजबरी लाटल्या, प्रियंका गांधीचा भाजपवर आरोप

गडचिरोली : गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या सरकारने मोठ्या उद्योगपतींसाठी गोरगरीब आदिवासींच्या जमिनी बळजबरी लाटल्या. त्यांना सामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही.

सविस्तर वाचा…

17:48 (IST) 17 Nov 2024

नागपूरमध्ये भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो पार पडला. मात्र, यानंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी काहीवेळ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही वेळ या ठिकाणी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. मात्र, यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तरुणांना बाजूला केलं.

17:35 (IST) 17 Nov 2024

राष्ट्रवादीच्या उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचार गाडीची तोडफोड

गोंदिया : तिरोडा- गोरेगाव तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत (गुड्डू) बोपचे यांच्या प्रचार गाडीवर विरोधकांनी केलेल्या तोडफोडीची घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा…

17:00 (IST) 17 Nov 2024

गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मतदान करू नका, आदिवासी विकास परिषदेचा जाहीरनामा

भंडारा : येत्या सोमवारी प्रचारतोफा थंडावणार आहेत. विधानसभा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांचा प्रचार त्यांचे कार्यकर्ते जोमात करीत आहेत.

सविस्तर वाचा…

16:30 (IST) 17 Nov 2024

गडकरींकडून महाराष्ट्र पालथा

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने १३ दिवसांमंध्ये महाराष्ट्रभरात फिरून महायुतीसाठी प्रचार सभा घतल्या.

सविस्तर वाचा…

15:58 (IST) 17 Nov 2024

चंद्रपुरात कॉंग्रेस उमेदवाराची स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून कोंडी? जिल्ह्यातील इतर जागांवर परिणाम होण्याची शक्यता

चंद्रपूर :काँग्रेसने दलित उमेदवार प्रवीण पडवेकर यांना वाऱ्यावर सोडल्याने त्याचा थेट परिणाम काँग्रेसच्या जिल्ह्यातील सहाही जागांवर होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

15:42 (IST) 17 Nov 2024

प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंना बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यास रोखलं, सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंना बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यास रोखलं अशा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. बारामतीत जो टेक्सटाईल पार्क आहे, तो शरद पवार यांच्या प्रयत्नांनी सुरु झाला. आता याच पार्कमध्ये जाण्यासाठी शरद पवार यांच्या पत्नीला अर्धा तास रोखून ठेवलं. हे दुर्देवी आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

15:41 (IST) 17 Nov 2024

शिवराजसिंह चौहान म्हणतात राहुल गांधींकड विकासाचे कुठलेही व्हीजन नाही

नागपूर : महाविकास आघाडीसह आणि राहुल गांधी यांच्याक़डे विकासाचे कुठलेही व्हीजन नाही. केवळ जाहीर सभामधून खोटी आश्वासन देत जनतेची दिशाभूल करतात.

सविस्तर वाचा…

15:33 (IST) 17 Nov 2024

तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?

गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा मतदारसंघात यंदा पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार, असा प्रश्न चर्चिला जात आहे. येथे भाजपचे विजय रहांगडाले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रविकांत बोपचे यांच्यात थेट लढत आहे.

सविस्तर वाचा…

15:31 (IST) 17 Nov 2024

वाशीममध्ये भाजप व शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजीचे आव्हान, दलितांमध्ये रोषाची भावना; जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर?

अकोला : वाशीम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप व शिवसेना उबाठामध्ये तुल्यबळ लढत असली तरी दोन्ही बाजूला अंतर्गत नाराजीचे मोठे आव्हान आहे.

सविस्तर वाचा….

15:28 (IST) 17 Nov 2024

चिपळूण, राजापूरमध्ये वडिलांसाठी लेकी प्रचाराच्या मैदानात

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पाचही मतदारसंघात चुरस वाढली आहे. या पाचही मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे.

सविस्तर वाचा….

15:27 (IST) 17 Nov 2024

आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !

मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी १४ आंबेडकरी पक्षांचे तब्बल ४३७ उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचे २३७ तर ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे २०० उमेदवार आहेत.

सविस्तर वाचा….

15:27 (IST) 17 Nov 2024

विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?

नागपूर : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. त्यात नवीन काही नाही, पण एखादा मुद्याचा प्रभाव हा निवडणुकीचा कल बदलणारा ठरू शकतो.

सविस्तर वाचा…

15:26 (IST) 17 Nov 2024

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या चिमुरातील सभेची मतदारांमध्ये तुलनात्मक चर्चा

द्रपूर : चिमूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रचार सभांची मतदारांमध्ये तुलनात्मक चर्चा सुरू आहे. कुणाच्या सभेला गर्दी अधिक होती, कुणाचे भाषण मुद्देसूद झाले, यावरून दोन्ही सभांमध्ये तुलना केली जात आहे.

सविस्तर वाचा….

15:26 (IST) 17 Nov 2024

धामणगावात भाजप, काँग्रेसमध्‍ये वर्चस्‍वाची लढाई

अमरावती : धामणगाव रेल्‍वे मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे सातव्‍यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले वीरेंद्र जगताप यांच्‍यासाठी ही निवडणूक प्रतिष्‍ठेची बनली आहे.

सविस्तर वाचा….

15:25 (IST) 17 Nov 2024

आर्वीत उमेदवार पत्नीसाठी पती, तर उमेदवार पतीसाठी पत्नी मैदानात

वर्धा : आर्वी मतदारसंघात मयूरा अमर काळे विरुद्ध सुमित वानखेडे, असा दुहेरी सामना आता कुटुंबाच्या थेट आरोप-प्रत्यारोपाने गाजू लागला आहे.

सविस्तर वाचा…

15:23 (IST) 17 Nov 2024

“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युतर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. उद्या सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यापूर्वी आज पाटणमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच पंतप्रधान मोदींचं आव्हान स्वीकारत त्यांनाही प्रत्युत्तर दिलं.

सविस्तर वाचा

15:07 (IST) 17 Nov 2024

….याचा अर्थ मिंधे गटाचा उपयोग संपला; अमित शाह यांच्या त्या विधानावरून उद्धव ठाकरेंचा टोला

“आपलं सरकार गद्दारी करून पाडण्यात आलं. कारण तर त्यांना महाराष्ट्र लुटायचा होता आणि मी तो लुटू देत नव्हतो. म्हणून त्यांनी पहिला घाव शिवसेनेवर घातला. मिंधेंना कळत नाही. वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची निती आहे. निवडणुकीच्या प्रचारात अमित शाह बोलले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. याचा अर्थ मिंधे गटाचा उपयोग संपला”, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

15:04 (IST) 17 Nov 2024

प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी

नागपूर : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा आज पश्चिम नागपुरातील अवस्थीनगर आणि मध्य नागपुरातील गांधी गेट, महाल येथे रोड-शो होणार आहे.

सविस्तर वाचा…

14:05 (IST) 17 Nov 2024

राहुल गांधींकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस अभिवादन, पोस्ट करत म्हणाले…

आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त राहुल गांधी यांनी पोस्ट करत त्यांना अभिवादन केलं आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या १२ व्या स्मृतीदिनी मी त्यांना अभिवादन करतो असं ते म्हणाले.

13:42 (IST) 17 Nov 2024

दलित समाजाचा उमेदवार पडल्यास याद राखा, ‘यांनी’ काढली काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी

चंद्रपूर : अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महामंत्री के.सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी रात्री चंद्रपुरात धडक देत दलित समाजातून येणारे कांग्रेस उमेदवार प्रवीण पडवेकर यांच्या प्रचारात सहभागी न होणाऱ्या काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

सविस्तर वाचा…

13:19 (IST) 17 Nov 2024

‘या’ जिल्ह्यातील माणूस मुख्यमंत्रीपदी नाना पटोले म्हणतात,’ फडणवीसांचा रडीचा डाव…’

गोंदिया : नाना पटोले यांनी गोंदिया शहरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान जिल्ह्याच्या जनतेला साथ देण्याचे आवाहन केले.

सविस्तर वाचा…

12:35 (IST) 17 Nov 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन

मी बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातो आहे. बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालून आम्ही महाराष्ट्राला पुढे नेतो आहे. पुढच्या पाच वर्षात महायुती सरकार राज्याचा सर्वांगिण विकास करेन, अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

12:03 (IST) 17 Nov 2024

विदर्भातील सर्व सभा तडकाफडकी रद्द करून अमित शहा दिल्लीला

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रविवारी नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेरसह विदर्भात गडचिरोली वर्धा या ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 17 Nov 2024

Sanjay Raut : एकनाथ शिंदे दिल्लीसमोर हुजरेगिरी करतात, संजय राऊतांची टीका

आज एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक दिल्लीसमोर मुजरा करत आहेत. हे बाळासाहेबांना मान्य नव्हते. बाळासाहेबांनी कधीच काँग्रेसचा तिरस्कार केला नाही. इंदिरा गांधींपासून ते राजीव गांधींपर्यंत प्रत्येक वेळी राष्ट्रहिताच्या प्रश्नांवर पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांबरोबर त्यांची जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराष्ट्रात एकोपा राहील. याचा प्रयत्न बाळासाहेबांनी केला. एकनाथ शिंदेंना बाळासाहेब माहिती नाही. त्यांनी टेंभी नाक्या पलिकडे जग बघितलं नाही. ते आज आम्हाला बाळासाहेब ठाकरे सांगणार का? अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

11:27 (IST) 17 Nov 2024

गृहमंत्री शहा यांचा दौऱ्यात नक्सली एलिमेंट नजरेत,शहा चहा घेत नाही म्हणून मग,,,

वर्धा : विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मोठमोठे नेते मैदानात उतरले आहेत. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, काँग्रेसच्या प्रियांका गांधी व अन्य विदर्भ दौऱ्यावर आहेत.

सविस्तर वाचा…

11:26 (IST) 17 Nov 2024

प्रियंका गांधींचा आज नागपुरात या दोन ठिकाणी ‘रोड-शो’

नागपूर : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी रविवारी नागपुरात दोन मतदारसंघात रोड-शो करणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पक्षाने जोरदार तयारी केली आहे.

सविस्तर वाचा…

11:19 (IST) 17 Nov 2024

आदित्य ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन

आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त राजकीय नेत्यांकडून त्यांना अभिवादन केले जात आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनीही एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन केलं आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून उद्या १८ नोव्हेंबर रोजी प्रचाराची मुदत संपणार आहे. मात्र, त्यापूर्वी अमरावतीत माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत राडा झाल्याचं बघायला मिळालं आहे. यावेळी काही लोकांनी नवनीत राणा यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. या हल्ल्यात त्यांचा अंगरक्षण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.