Maharashtra Vidhan Sabha Election Voting Live Updates : गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून चालू असलेल्या नेत्यांच्या प्रचारतोफा सोमवारी (१८ नोव्हेंबर) थंडावल्या. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला (बुधवार) पार पडणार आहे. ही निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. कारण यावेळी सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. इतरही लहान पक्ष या निवडणुकीत असून त्यांची भूमिका देखील महत्त्वाची असली तरी मविआ व महायुतीत सत्तेसाठीची चुरस आहे. या निवडणुकीत काय होणार? मतदान किती टक्के होणार? जनता कुणाला झुकतं माप देणार? या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं २३ नोव्हेंबरला (निवडणुकीचा निकाल) मिळणार आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होईल. यावेळी मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळतं ते बुधवारी सायंकाळी स्पष्ट होईल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ६१.४% मतदानाची नोंद झाली होती.

Live Updates

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live, 20 November 2024 : राज्याच्या कानाकोपऱ्यातील राजकीय बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

00:47 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : पुरोगामी महाराष्ट्रात महिला आमदारांची संख्या कमी

महाराष्ट्राच्या ६७ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार झाल्या आहेत. सध्या विधानसभेत केवळ २१ महिला आमदार आहेत.

23:53 (IST) 19 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: लाडक्या बहिणींच्या राज्यात महिला उमेदवारांची संख्या कमी

२०२४ च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत २५० हून अधिक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण ४ हजार १३६ उमेदवार निवडणूक लढवणार असून त्यापैकी फक्त सहा ते सात टक्के महिला उमेदवार निवडणुकीच्या रिगंणात आहेत.

23:11 (IST) 19 Nov 2024

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : अशी आहे निवडणूक प्रक्रिया

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates

२९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले.

३० ऑक्टोबर २०२४ रोजी उमेदवारी अर्ज पडताळणी करण्यात आली.

४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

१८ नोव्हेंबर २०२४ - प्रचाराचा शेवटचा दिवस

२० नोव्हेंबर २०२४ (आज) मतदानाचा दिवस

२३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल जाहीर होणार

२५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार

23:07 (IST) 19 Nov 2024

Mumbai Assembly Election 2024 Live Updates : कुठे, किती मतदान केंद्रे क्रिटीकल

Mumbai Assembly Election 2024 Live Updates :

कुलाबा – ९

वांद्रे पूर्व – ९

चांदिवली – ७

दहिसर – ७

बोरिवली – ६

मागाठाणे – ५

विलेपार्ले – ६

घाटकोपर पश्चिम – ५

मानखुर्द शिवाजी नगर – ५

23:06 (IST) 19 Nov 2024

Mumbai Assembly Election 2024 Live Updates : मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर १० टक्क्यांपेक्षा कमी मतदान होतं

मुंबईतील ७३ क्रिटीकल मतदान केंद्रे असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. मतदान केंद्रावर १० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान होत असल्यास किंवा एखाद्या मतदान केंद्रावर एकाच उमेदवाराला ९० टक्क्यापेक्षा अधिक मतदान होत असल्यास ते मतदान केंद्र क्रिटीकल समजले जाते. याकरीता सहा विविध निकष आहेत. मात्र मुंबईत १० टक्क्यांपेक्षा कमी मतदान या एकाच निकषानुसार तब्बल ७६ मतदान केंद्रे ही क्रिटिकल असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

23:05 (IST) 19 Nov 2024

Mumbai Assembly Election 2024 Live Updates : मुंबईत ७६ क्रिटीकल मतदान केंद्र

Mumbai Assembly Election 2024 Live Updates : मुंबईत यंदा कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीकोनातून एकही संवेदनशील मतदान केंद्र नसले तरी तब्बल ७६ मतदान केंद्रे ही क्रिटीकल (दखलपात्र) स्वरुपाची आहेत. या मतदान केंद्रावर १० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान नोंदवले गेले आहे. अशी शहर भागात १३, तर उपनगरात ६३ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सर्वाधिक ९ मतदान केंद्रे ही कुलाब्यातील नेव्हीनगर परिसरात आहेत.

23:02 (IST) 19 Nov 2024

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल्स कधी येणार?

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : मतदान संपल्यानंतर म्हणजेच २० नोव्हेंबरला संध्याकाळी ६ नंतर एक्झिट पोल्स जाहीर होतील. विविध न्यूज चॅनल्स आणि एजन्सी या एक्झिट पोल्स जाहीर करत असतात. विशिष्ट प्रकारे सर्व्हे करुन हे एक्झिट पोल्स जाहीर केले जात असतात. आता या पोल्समध्ये काय अंदाज समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. २० नोव्हेंबरच्या संध्याकाळी ६ नंतर हे पोल्स ( Maharashtra Exit Poll ) येण्यास सुरुवात होईल.