Maharashtra Vidhan Sabha Election Voting Live Updates : गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून चालू असलेल्या नेत्यांच्या प्रचारतोफा सोमवारी (१८ नोव्हेंबर) थंडावल्या. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला (बुधवार) पार पडणार आहे. ही निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. कारण यावेळी सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. इतरही लहान पक्ष या निवडणुकीत असून त्यांची भूमिका देखील महत्त्वाची असली तरी मविआ व महायुतीत सत्तेसाठीची चुरस आहे. या निवडणुकीत काय होणार? मतदान किती टक्के होणार? जनता कुणाला झुकतं माप देणार? या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं २३ नोव्हेंबरला (निवडणुकीचा निकाल) मिळणार आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होईल. यावेळी मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळतं ते बुधवारी सायंकाळी स्पष्ट होईल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ६१.४% मतदानाची नोंद झाली होती.
Live
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live : महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? विधानसभेसाठी काही तासांत मतदानाला सुरुवात होणार
2024 Maharashtra Assembly Polling Live Updates : सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होईल.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-11-2024 at 22:58 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSनिवडणूक २०२४Electionमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024महाविकास आघाडीMahavikas Aghadiविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 live updates mahayuti vs maha vikas aghadi voting percentage eknath shinde shivsena vs uddhav thackeray bjp ncp ajit sharad pawar mns asc