Maharashtra Exit Live Updates : गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून चालू असलेल्या नेत्यांच्या प्रचारतोफा सोमवारी (१८ नोव्हेंबर) थंडावल्या. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला (बुधवार) पार पडणार आहे. ही निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. कारण यावेळी सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. इतरही लहान पक्ष या निवडणुकीत असून त्यांची भूमिका देखील महत्त्वाची असली तरी मविआ व महायुतीत सत्तेसाठीची चुरस आहे. या निवडणुकीत काय होणार? मतदान किती टक्के होणार? जनता कुणाला झुकतं माप देणार? या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं २३ नोव्हेंबरला (निवडणुकीचा निकाल) मिळणार आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होईल. यावेळी मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळतं ते बुधवारी सायंकाळी स्पष्ट होईल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ६१.४% मतदानाची नोंद झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Live Updates, महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार? काय आहेत एक्झिट पोल?

15:51 (IST) 20 Nov 2024

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंतची आकडेवारी

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंतची आकडेवारी.

कसबा पेठ ४३.०३, पुणे कॅन्टोन्मेंट ३५.८४, हडपसर ३३.७८, पर्वती ३७.६६, खडकवासला ४०.४०, कोथरूड ३७.८०, शिवाजीनगर ३३.८६ आणि वडगावशेरी ३८.८३

15:51 (IST) 20 Nov 2024

भोसरी विधानसभा मतदारसंघ दुपारी तीन वाजेपर्यंत ४३.१६ टक्के मतदान

पुरुष :- १४३४८२

स्त्री :- ११९१०५

इतर :-०९

एकूण :- २६२५९६

15:44 (IST) 20 Nov 2024

Uran Poll Percentage: उरण मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान नोंद झाली आहे

15:44 (IST) 20 Nov 2024

पुणे जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४१.७० टक्के मतदान

Panvel Assembly Elections Poll Percentage: पनवेल विधानसभा क्षेत्रात दुपारी तीन वाजेपर्यंत ४१.७९ टक्के मतदान झाले

15:39 (IST) 20 Nov 2024

Thane Vidhan Sabha Election 2024 Live Updates: ठाकरे गटाचे ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार राजन विचारे यांनी मतदानाचा हक्क बजावला

15:29 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Poll Percentage : मतदानची जिल्हानिहाय आकडेवारी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान

15:29 (IST) 20 Nov 2024

मतदान केंद्रांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नजर,भूषण गगराणी यांनी घेतला आढावा

मुंबई : विधानसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग कॅमेरे बसवण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, नियोजनपूर्ण व्हावी आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वेबकास्टिंगद्वारे विशेष काळजी घेतली जात आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी वेब कास्टिंग संनियंत्रण कक्षातून ३६ विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.

मुंबईत एकूण १० हजार ११७ मतदार केंद्रांवर मतदान होत आहे. यापैकी शहर भागात २ हजार ५३८ तर उपनगर भागात ७ हजार ५७९ मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

15:28 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी कुटुंबीयांसमवेत मतदान हक्क बजावला

पर्वती मतदारसंघातील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी कुटुंबीयांसमवेत मतदान हक्क बजावला. सहकारनगरमधील महात्मा गांधी अध्यापक विद्यालय येथे त्यांनी मतदान केले.

मी माझा मतदानाचा हक्क बजायवलाय… तुम्ही??

आज कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे भविष्य उज्वल करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावायला विसरू नका, असे आवाहन कदम यांनी मतदारांना केले.

15:25 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : वयाच्या शंभरीत पदार्पण केलेले ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांनी स्वतः जाऊन मतदान केले

15:22 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बजाविला मतदानाचा हक्क

15:21 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : चिंचवड विधानसभा मतदारसंघ- दुपारी तीन वाजेपर्यंत ४० टक्के मतदान

पुरुष :- १४५५१२

स्त्री :- १२२८०७

इतर :- ०४

एकूण :-२६८३२३

टक्केवारी :- ४०.४३

15:20 (IST) 20 Nov 2024
खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी व विश्राम कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

15:18 (IST) 20 Nov 2024
jay pawar: जय पवार यांनी बजाविला मतदानाचा हक्क बारामती शहरातील जळोची येथील मोरोपंत शाळेमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला..

15:17 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी मतदानाचा हक्क बजावला

प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील सरिता विद्यालय येथील मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला.

15:16 (IST) 20 Nov 2024

Parli Polling Booth Hijack: परळीत मतदानकेंद्रावर तोडफोड, ईव्हीएम यंत्र फोडले

परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदूर गावात मतदान केंद्र उधळून लावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस आणि इतर विरोधकांनी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल केला असून कारवाईची मागणी केली आहे.

15:15 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : आबा बागुल यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला

पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी सपत्नीक कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला.

15:14 (IST) 20 Nov 2024

Pune Cantonment Constituency: पुणे कँटोन्मेंट मतदारसंघात सावित्रीबाई फुले शाळा भवानी पेठ येथे सपत्नीक मतदान करताना भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुनील कांबळे

15:14 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : उमेदवार रमेश बागवे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी सपत्नीक गोल्डन ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट, भवानी पेठ येथे मतदानाचा हक्क बजावला.

15:13 (IST) 20 Nov 2024

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी २१० कोथरूड विधानसभा मतदार संघांतर्गत सक्सेस टॉवर, पंचवटी, पाषाण येथील मतदान केंद्र क्र. १२२ येथे मतदानाचा हक्क बजावला; तसेच अधिकारी, कर्मचारी आणि मतदारांशी संवाद साधला.

15:12 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : दत्ता बहिरट यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला

शिवाजीनगर विधानसभा महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट , काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्ता बहिरट यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला..

15:11 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Elections 2024 : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी शिवाजी नगर, पुणे येथे आज मतदानाचा हक्क बजावला. नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे आणि आपला हक्क बजावा, असे आवाहन त्यांनी केले.

15:09 (IST) 20 Nov 2024

Mumbai Voting Percentage: “गर्भश्रीमंत मतदार आज मतदान करणार नाहीत कारण…”, उद्योगपती हर्ष गोयंकाची खोचक पोस्ट

अब्जाधीश उद्योगपती आणि आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी मुंबईतील उच्चभ्रू भागात होत असलेल्या अल्प मतदानावरून गर्भश्रीमंत मतदारांना खोचक टोला लगावला आहे. सविस्तर वृत्त वाचा

15:03 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Elections 2024 : घाटकोपरमध्ये तीन पिढ्यांनी केले एकत्रित मतदान

मतदानाकडे तरुणाईचा कल कमी असताना घाटकोपरमध्ये तीन पिढ्यांनी एकत्रित मतदान केले. राज्याच्या विकासासाठी सर्वांनी मतदान करायलाच हवे, असे आवाहन त्यांनी केले.

सविस्तर वाचा…

14:42 (IST) 20 Nov 2024

बारामतीत दुपारी दोन वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान.

14:34 (IST) 20 Nov 2024

Kedar Dighe: ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल; मद्य आणि पैशांचे पाकिट सापडल्याचा आरोप

ठाणे : कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांच्याविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विदेशी मद्य आणि पैशांनी भरलेली २६ पाकिटे आढळून आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परंतु हे प्रकरण खोटे असल्याचा आरोप दिघे यांनी केला.

सविस्तर वाचा

14:33 (IST) 20 Nov 2024

Ambadas Danve on Sanjay Shirsat: “मस्ती आली का तुला…”, अंबादास दानवेंकडून शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा शिविगाळ करतानाचा व्हिडीओ जाहीर

शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी काही नागरिकांना शिवीगाळ केली असल्याचा एक व्हिडीओ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्स या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. शिरसाट हे दमदाटी करत असून पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.

14:23 (IST) 20 Nov 2024

Shankar Mahadevan: शंकर महादेवन यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह वाशी येथे मतदान केले

(फोटो सौजन्य: नरेंद्र वास्कर)

14:15 (IST) 20 Nov 2024

Panvel Assembly Elections Poll Percentage पनवेल विधानसभा क्षेत्रात दुपारी एक वाजेपर्यंत ३०.५६ टक्के मतदान झाले असून रायगड जिल्ह्यात ३४. ८४ टक्के मतदान झाले आहे

14:13 (IST) 20 Nov 2024

Uran Poll Percentage उरण मध्ये ३७ टक्के मतदान

यंदाची विधानसभा निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांपेक्षा थोडी वेगळी आहे. कारण यावेळी सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत.

एका बाजूला काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी (शरद पवार) हे तीन पक्ष, तर दुसऱ्या बाजूला भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) हे तीन पक्ष एकमेकांसमोर उभे आहेत.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार असला तरी इतरही लहान पक्ष या निवडणुकीत असून त्यांची भूमिका देखील महत्त्वाची असली तरी मविआ व महायुतीत सत्तेसाठीची चुरस आहे.