Maharashtra Exit Live Updates : गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून चालू असलेल्या नेत्यांच्या प्रचारतोफा सोमवारी (१८ नोव्हेंबर) थंडावल्या. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला (बुधवार) पार पडणार आहे. ही निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. कारण यावेळी सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. इतरही लहान पक्ष या निवडणुकीत असून त्यांची भूमिका देखील महत्त्वाची असली तरी मविआ व महायुतीत सत्तेसाठीची चुरस आहे. या निवडणुकीत काय होणार? मतदान किती टक्के होणार? जनता कुणाला झुकतं माप देणार? या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं २३ नोव्हेंबरला (निवडणुकीचा निकाल) मिळणार आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होईल. यावेळी मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळतं ते बुधवारी सायंकाळी स्पष्ट होईल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ६१.४% मतदानाची नोंद झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Live Updates, महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार? काय आहेत एक्झिट पोल?

11:46 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : गायक राहुल देशपांडे

गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला.

11:45 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मतदानाचा हक्क बजावला

लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेत्री दिग्दर्शिका स्नेहल तरडे, अभिनेता अक्षय टांकसाळे, अभिनेता रमेश परदेशी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

11:43 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : अभिनेत्री प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

11:42 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : ईव्हीएम मशिन पाऊण तास बंद

कोथरूडमधील अण्णासाहेब पाटील शाळेतील ईव्हीएम मशिन पाऊण तास बंद

11:41 (IST) 20 Nov 2024

पुणे जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.६४ टक्के मतदान झाले आहे.

11:41 (IST) 20 Nov 2024

संगमनेर तालुक्यामध्ये अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांच्या रांगा

संगमनेर तालुक्यामध्ये अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी मतदार तास दीड तासापासून रांगेत उभे असल्याने संताप व्यक्त करत आहेत.

11:40 (IST) 20 Nov 2024

हडपसरमध्ये मतदानासाठी थंड प्रतिसाद, पहिल्या दोन तासांत केवळ ४.४५ टक्के मतदान

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून सकाळपासून या मतदार संघात संथ गतीने मतदान सुरू आहे. मतदानाला सुरुवात झाल्यापासून पहिल्या दोन तासात या हडपसर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे.

वाचा सविस्तर…

11:26 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावला मतदानाचा अधिकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावला मतदानाचा अधिकार

11:25 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोथरूडमध्ये पहिल्या दोन तासात मतदानासाठी उत्साह

भारतीय जनता पक्षाचा सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोथरूड विधनसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात मतदानाला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन तासात ६.५० टक्के मतदान झाले.

वाचा सविस्तर…

11:24 (IST) 20 Nov 2024

उरणमध्ये पहिल्या दोन तासात ८.१५ टक्के मतदान ग्रामीण भागात मतदानासाठी सकाळीच रांगा

11:18 (IST) 20 Nov 2024

Kasba Assembly Constituency Voting live: कसब्यात शांततेत मतदान; दोन तासांमध्ये ७.४४ टक्के मतदारांनी बजावले कर्तव्य

पुणे : शहराच्या मध्यवर्ती असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात बुधवारी मतदान प्रक्रिया शांततेमध्ये सुरू झाले. उत्साही मतदारांनी सकाळी उन वाढण्यापूर्वी मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यास प्राधान्य दिले. पहिल्या दोन तासांमध्ये ७.४४ टक्के मतदान झाले.नारायण पेठेतील वा. ब. गोगटे प्रशालेत ३१ क्रमांकाचे मशीन काहीवेळ बंद होते. मॉक पोलिंग नंतर अड्रेस टॅग व्यवस्थित न बांधले गेल्याचे आढळून आले.

सविस्तर वाचा

11:14 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

दादर – माहीम विधानसभेतील महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.

10:52 (IST) 20 Nov 2024

पुणेकरांनो, कमी मतदानाची परंपरा आज इतिहासजमा करा!

निवडणुकीच्या राजकारणात रस घेणारे पुणेकर हे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडत नसल्याने मतटक्का हा कायम कमी होत आला आहे. पुण्यातील मतदारांची ही सवय जुनी आहे. अगदी पुणे ही नगरपालिका असल्यापासून काही अपवाद वगळता सरासरी ५० ते ५५ टक्केच मतदार मतदानाचा हक्क बजावत आले आहेत.

वाचा सविस्तर…

10:42 (IST) 20 Nov 2024

पिंपरी-चिंचवड, मावळमध्ये पहिल्या दोन तासात किती टक्के मतदान?

पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी आज (बुधवारी) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघासाठी १४५४ मतदान केंद्रांवर मतदान पार पडत आहे. तिन्ही मतदार संघात ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून १६ लाख ६३ हजार ६५४ मतदार तीन आमदार निवडणार आहेत.

वाचा सविस्तर…

10:42 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : धुळ्यातील मुलींचं अहमदनगरमध्ये मतदान, विखेंच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची लोणी बुद्रूकमध्ये नोंद? VIDEO व्हायरल

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा मेडिकल कॉलेजमधे शिकणाऱ्या धुळ्याच्या मुलींचे लोणीत मतदान, काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांनी विचारपूस केल्यावर मुली पळून गेल्या.

https://twitter.com/ivaibhavk/status/1859086023654830550

10:28 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : लोणी बुद्रूकमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थांकडून मतदान, काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

लोणी बुद्रूकमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदान केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. याबाबत काँग्रेस नेते व आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, मला त्याबाबत माहिती मिळाली. त्यांनी नेमकं काय केलंय ते समजू शकलो नाही. मात्र चुकीच्या पद्धतीने मतदार व मतदान वाढवण्याचा हा प्रयत्न दिसतोय. सत्ताधाऱ्यांचे असे उद्योग चालू असून आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. दुर्दैवाने निवडणूक आयोग व त्यांच्या अधिकाऱ्यांवर दबाव आहे, असं पाहायला मिळतंय.

10:08 (IST) 20 Nov 2024

बीडमध्ये बोगस मतदान? CCTV चं कनेक्शन काढून मतदान होत असल्याचा दा

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live:बीडमध्ये बोगस मतदान? CCTV चं कनेक्शन काढून मतदान होत असल्याचा दावा; Video व्हायरल!

सविस्तर वाचा

10:06 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : नारायण पेठेतील वा. ब. गोगटे प्रशाला येथे मुलांसाठी पाळणाघर

नारायण पेठेतील वा. ब. गोगटे प्रशाला येथे मुलांसाठी पाळणाघर साकारण्यात आले असून पालकांचे मतदान होईपर्यंत मुले खेळत आहेत.

10:05 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे निवडणूक प्रक्रियेवर लक्ष

जिल्हा नियंत्रण कक्षातून जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

10:03 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : गायिका आर्या आंबेकर हिने केले मतदान

पर्वती विधानसभा मतदारसंघात गायिका आर्या आंबेकर हिने केंद्र क्रमांक ६८ सरिता नागरी (सिंहगड रस्ता ) येथे मतदान केले.

10:03 (IST) 20 Nov 2024

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

आज मतदानाचा हक्क बजावला, आपल्या घटनेनं दिलेला तो अधीकार आहे, तो बजावला पाहिजे, आम्ही तिघांनी मी पत्नी आणि माझ्या मुलीने मतदान केलं. गेली १० वर्ष केंद्रात मोदीजींचे सरकार आहे आणि अडीच वर्ष राज्यात महायुतीचे सरकार आहे, राज्याची जनता विकासाला प्राधान्य देते, राज्यात महायुतीचे सरकार येईल हे नक्की, मुख्यमंत्री महायुतीचे होतील. कोथरूडकरांनी लोकसभेला ७४ हजाराचं लीड दिलं होतं, यावेळेला देखील लीड घेवू. – मुरलीधर मोहोळ

10:02 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : अभिनेते सुबोध भावे यांनी केले मतदान

प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातील नूतन समर्थ विद्यालयात मतदान केले.

09:59 (IST) 20 Nov 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी बजावला

09:57 (IST) 20 Nov 2024

पुणे जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.५३ टक्के मतदानाची नोंद.

09:56 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : संतोष शेट्टी यांनी परिवारासह बजावला मतदानाचा अधिकार

भिवंडी पूर्व विधानसभेतील शिंदे गटाचे उमेदवार संतोष शेट्टी यांनी आपल्या परिवारासह बजावला मतदानाचा अधिकार

09:55 (IST) 20 Nov 2024
Belapur Assembly Constituency voting live: गजानन काळे यांनी बजावला मतदान हक्क

बेलापूर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार गजानन काळे मतदान हक्क बजावला

09:54 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : केंद्रावर मतदारांची रांग

नारायण पेठेतील वा. ब. गोगटे प्रश्नाला येथे एका केंद्रावर मतदारांची रांग लागली होती.

09:52 (IST) 20 Nov 2024

मुंबईत मतदानाला सुरुवात; कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला

मुंबई : प्रचारफेरी व प्रचारसभांचा धडाका, घरोघरी जाऊन संवाद साधण्यावर भर आणि आरोप – प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा दिवस अखेर उजाडला आहे.

सविस्तर वाचा…

09:51 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : हेमंत रासने यांनी पत्नीसमवेत मतदान केले.

कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी पत्नीसमवेत थोरले बाजीराव पथावरील नूतन मराठी विद्यालयात मतदान केले.

09:40 (IST) 20 Nov 2024
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी केले मतदान

बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी बारामतीत काटेवाडी येथे मतदान केले. त्यावेळी त्यांच्यासोबत वडील श्रीनिवास पवार आणि आई शर्मिला पवार.

यंदाची विधानसभा निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांपेक्षा थोडी वेगळी आहे. कारण यावेळी सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत.

एका बाजूला काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी (शरद पवार) हे तीन पक्ष, तर दुसऱ्या बाजूला भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) हे तीन पक्ष एकमेकांसमोर उभे आहेत.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार असला तरी इतरही लहान पक्ष या निवडणुकीत असून त्यांची भूमिका देखील महत्त्वाची असली तरी मविआ व महायुतीत सत्तेसाठीची चुरस आहे.