Maharashtra Exit Live Updates : गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून चालू असलेल्या नेत्यांच्या प्रचारतोफा सोमवारी (१८ नोव्हेंबर) थंडावल्या. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला (बुधवार) पार पडणार आहे. ही निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. कारण यावेळी सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. इतरही लहान पक्ष या निवडणुकीत असून त्यांची भूमिका देखील महत्त्वाची असली तरी मविआ व महायुतीत सत्तेसाठीची चुरस आहे. या निवडणुकीत काय होणार? मतदान किती टक्के होणार? जनता कुणाला झुकतं माप देणार? या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं २३ नोव्हेंबरला (निवडणुकीचा निकाल) मिळणार आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होईल. यावेळी मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळतं ते बुधवारी सायंकाळी स्पष्ट होईल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ६१.४% मतदानाची नोंद झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Live Updates, महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार? काय आहेत एक्झिट पोल?

09:38 (IST) 20 Nov 2024
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केले मतदान

सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने ज्ञानप्रबोधिनी विद्यालय निगडी येथे बजावला मतदानाचा हक्क…

09:37 (IST) 20 Nov 2024
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : अजितदादा पवार यांचे चिरंजीव जय पवार मतदानापूर्वी कुटुंबाबरोबर

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव जय पवार मतदानापूर्वी आजी आशाताई पवार, आई खासदार सुनेत्रावहिनी पवार आणि आत्या विजयाताई पाटील यांच्याबरोबर.

09:36 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदानाची नोंद

सुरुवातीच्या अडीच तासांत राज्यात अवघ्या ६.६१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

दुर्गम गडचिरोलीत (१२.३३) सर्वाधिक मतदान

धाराशिवमध्ये सर्वात कमी मतदान (४.८५ टक्के)

09:34 (IST) 20 Nov 2024
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : अजित गव्हाणे यांनी बजावला मतदानाचा हक्क

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी भोसरी, दिघी रोड येथील मतदान केंद्रामध्ये त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी वैशाली गव्हाणे, पुष्पाताई गव्हाणे, विराज गव्हाणे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

09:33 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : महायुतीचे उमेदवार गिरीश महाजन यांनी त्याच्या कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला

भाजपचे मंत्री तथा जामनेर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गिरीश महाजन यांनी त्याच्या कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला

गिरीश महाजन यांनी जामनेर शहरातील न्यू इंग्लिश हायस्कूल या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

पत्नी साधना महाजन व त्यांच्या दोन्ही मुलींसोबत मंत्री गिरीश महाजन यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल, तसेच माझा या मतदारसंघांमध्ये गेल्या वेळेपेक्षाही विक्रमी मताधिक्याने विजय होईल असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

09:33 (IST) 20 Nov 2024

आदर्श मतदान केंद्रांचा लूक लक्षवेधी, नागपूरमध्ये ५० विशेष मतदान केंद्र

नागपूर : मतदारांचा मतदान प्रक्रियेत अधिकाधिक सहभाग वाढावा यासाठी नागपूर जिल्ह्यात ५० विशेष मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत.

सविस्तर वाचा…

09:33 (IST) 20 Nov 2024
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : बापू भेगडे यांनी बजाविला मतदानाचा हक्क

मावळचे अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांनी कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजाविला.

09:30 (IST) 20 Nov 2024
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : चंद्रकांतदादा पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा २१० कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरूड मधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

09:27 (IST) 20 Nov 2024
Ajit Pawar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : अजित पवार यांनी बारामतीत बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला.

09:26 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी मतदान केलं.

09:25 (IST) 20 Nov 2024
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : प्रशांत जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क

हडपसर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

09:23 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : अमित ठाकरे यांनी मतदानाचा अधिकार बजावला

09:16 (IST) 20 Nov 2024

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला..

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला.

सविस्तर वाचा…

08:55 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला

08:52 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आज महामतपरीक्षा, ९.७० कोटी एकूण मतदार, एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे

08:08 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवार काय म्हणाले?

मतदानानंतर अजित पवारांनी एएनआयशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही सर्व निवडून आलेले आमदार व नेते एकत्र बसून चर्चा करू. या चर्चेतून मुख्यमंत्र्याची निवड करू.

07:59 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : शायना एनसी यांनी मतदानाचा हक्क बजावला

शिवसेना (शिंदे) उमेदवार शायना एनसी व त्यांची मुलगी शनाया मुनोत यांनी मतदानाचा हक्क बजावला.

07:33 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : पहाटे मतदान केल्यानंतर अजित पवारांचं मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी सात वाजताच मतदान केलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं. तसेच ते म्हणाले, राज्यात महायुतीचं बहुमताचं सरकार येईल. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? यावर अजित पवार म्हणाले, आम्हाला बहुमत मिळाल्यानंतर आम्ही तुझ्याशी (प्रसारमाध्यमाचा प्रतिनिधी) चर्चा करून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेऊ.

07:16 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी सकाळी सात वाजता मतदान केलं.

07:14 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कुलाबा मतदारसंघातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

07:10 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates :महाराष्ट्रात मतदानाला सुरुवात, अजित पवारांनी बजावला हक्क

अजित पवार व त्यांच्या पत्नी सकाळी सात वाजता मतदान केद्रावर दाखल

07:05 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : सांगलीतील मतदान केंद्र सज्ज

06:49 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: पंतप्रधान मोदींकडून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन

06:45 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : मतदानापूर्वी कुलाब्यातील सुरक्षा व्यवस्था वाढवली

कुलाबा येथील शाळेत उभारण्यात आलेल्या मतदान केंद्राबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

06:43 (IST) 20 Nov 2024

मतदानाला सुरुवात होण्याआधी शायना एनसी मुंबादेवीच्या दर्शनाला

06:40 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: कराडमधील मतदान केंद्रावरील अधिकारी-कर्मचारी सज्ज

२६० कराड दक्षिण मतदारसंघाचे कर्मचारी मंगळवारी सायंकाळी नेमून दिलेल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले. पहाटे मतदान केंद्र सज्ज झालं.

06:37 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates : छत्रपती संभाजीनगर मतदानासाठी सज्ज

छत्रपती संभाजीनगर विधानसभा निवडणूक २०२४ साठी बुधवार दि.२० रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी मंगळवारी रात्री मतदान चमू साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले. १०९-औरंगाबाद पूर्व मतदार संघातील ही दृष्ये आहेत.

06:35 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महानगरांमध्ये मतटक्का वाढणार?

राज्यात सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत ६६ टक्के मतदान झाले होते.

९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क बजाविणार असले तरी मुंबई, ठाणे आणि पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे.

सविस्तर वाचा…

06:31 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates:बोईसर मतदारसंघात मतदार केंद्राचं साहित्य बोटीने पोहोचलं

बोईसर येथील २२७ – वाढीव व २२८ वैती मतदार केंद्राचे साहित्य बोटिद्वारे सुखरूपपणे मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले.

यंदाची विधानसभा निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांपेक्षा थोडी वेगळी आहे. कारण यावेळी सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत.

एका बाजूला काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी (शरद पवार) हे तीन पक्ष, तर दुसऱ्या बाजूला भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) हे तीन पक्ष एकमेकांसमोर उभे आहेत.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार असला तरी इतरही लहान पक्ष या निवडणुकीत असून त्यांची भूमिका देखील महत्त्वाची असली तरी मविआ व महायुतीत सत्तेसाठीची चुरस आहे.