धाराशिव: महाविकास आघाडी-महायुती बरोबरीत; शिंदे सेना, भाजपा प्रत्येकी एक, तर उबाठाला दोन जागा

धाराशिव जिल्ह्यातील एकूण चार विधानसभा मतदारसंघांपैकी दोन जागांवर उबाठा गटाला यश मिळाले आहे. तर शिंदे सेना आणि भाजपाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.

maha vikas aghadi mahayuti win equal assembly seats dharashiv district
(संग्रहित छायचित्र) फोटो : लोकसत्ता टीम

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील एकूण चार विधानसभा मतदारसंघांपैकी दोन जागांवर उबाठा गटाला यश मिळाले आहे. तर शिंदे सेना आणि भाजपाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे ज्ञानराज चौगुले यांना पराभूत करत नवख्या प्रवीण स्वामी यांनी ठाकरेंचा गड राखला आहे. तर अटीतटीच्या लढतीत शरद पवारांचे शिलेदार राहुल मोटे यांचा पालकमंत्री तानाजी सावंत यांनी निसटता पराभव केला आहे. सलग दुसर्‍यांदा राणाजगजितसिंह पाटील यांच्या रूपाने भाजपाला तुळजापुरात यश मिळाले आहे. तर उबाठा गटाच्या कैलास पाटील यांनी उस्मानाबाद मतदारसंघ राखला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातून उबाठा गटाचे कैलास पाटील 36 हजार 566 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिंदे सेनेचे उमेदवार अजित पिंगळे यांना 94 हजार 7 मते मिळाली. तर कैलास पाटील यांनी एक लाख 30 हजार 573 मतदारांचे समर्थन मिळविले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत कैलास पाटील यांना 87 हजार 488 मतदान मिळाले होते. तर 13 हजार 467 मतांनी विजय झाला होता. यंदा त्यांचे मताधिक्य दुपटीपेक्षा अधिक मतांनी वाढले आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभेत १० मोठ्या नेत्यांचा पराभव; काँग्रेस, भाजपा, प्रहारसह राष्ट्रवादीतील दिग्गजांचा पराभवात समावेश

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे ज्ञानराज चौगुले आणि उबाठा गटाचे प्रवीण स्वामी यांच्यात दुरंगी मुकाबला होता. तीन हजार 965 मतांनी स्वामी यांनी चौगुले यांना विजयी चौकारापासून रोखले. प्रवीण स्वामी यांना 96 हजार 206 तर ज्ञानराज चौगुले यांना 92 हजार 241 जणांचे समर्थन लाभले. वंचित बहुजन आघाडीच्या राम गायकवाड यांना चार हजार 87 मते मिळाली.

हेही वाचा >>> Devendra Fadnavis : विधानसभेचा निकाल पाहून फडणवीसांना विश्वास बसेना, ‘त्या’ वक्तव्याची चर्चा, मुख्यमंत्रिपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी 50.82 टक्के मतदान घेत काँग्रेसचे धीरज पाटील यांचा 36 हजार 879 मतांनी दारूण पराभव केला. राणाजगजितसिंह पाटील यांना एक लाख 31 हजार 863 तर काँग्रेसचे धीरज पाटील यांना 94 हजार 984 मते मिळाली आहेत. समाजवादी पार्टीकडून निवडणूक रिंगणात उतरलेले देवानंद रोचकरी यांना 16 हजार 335 मतांवर समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांना 99 हजार 34 मतदान मिळाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी मधुकरराव चव्हाण यांना 73 हजार 865 मते मिळाली होती. मागीलवेळी 23 हजार 169 मताधिक्याने राणाजगजितसिंह पाटील विजयी झाले होते.  परंडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. मागील वेळी 32 हजार 902 मताधिक्याने विजयश्री मिळविलेल्या तानाजी सावंत यांना यंदा विजय मिळविण्यासाठी खडतर प्रवास करावा लागला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांनी सावंत यांना कडवी झुंज दिली. अवघ्या एक हजार 510 मतांनी तानाजी सावंत यांनी विजयश्री मिळविली आहे. सावंत यांचा हा सलग दुसरा विजय आहे. मोटे यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्यामुळे निकालाची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 maha vikas aghadi mahayuti win equal assembly seats in dharashiv district zws

First published on: 23-11-2024 at 20:59 IST