Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Updates : महाराष्ट्र विधानसभेसाठी आज (२० नोव्हेंबर) मतदान पार पडले आहे. महाराष्ट्रात आज २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडलं आहे. आता मतदानाची वेळ संपली असून उमेदवारांचं भवितव्य मतदारपेटीत बंद झालं आहे. या निवडणुकीचा निकाल आता २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे.

दरम्यान, आता महाराष्ट्राच्या जनतेचा कौल नेमकी कुणाला? महाविकास आघाडीला की महायुतीला? तसेच कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात? किती अपक्ष उमेदवार निवडून येतात? या यासंदर्भातील एक्झिट पोल आता समोर आले आहेत. समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये नेमकी काय अंदाज व्यक्त करण्यात आला आहे? जाणून घेऊयात.

What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : महायुतीला बिगर मराठा मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!
Supriya Sule On Mahayuti
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “भाजपमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतभेद, फडणवीस एक सांगतात तर…”, सुप्रिया सुळेंची खोचक टिप्पणी!
Vidhan Sabha Election 2024
Vidhan Sabha Election 2024 : राज्यातल्या निवडणुका कोणत्या मुद्यांभोवती फिरत आहेत?
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जोरगेवारांनी थेट फडणवीसांसमोरच व्यक्त केली मुनगंटीवारांवरील नाराजी; म्हणाले, “उमेदवारी मिळू नये म्हणून…”
maharashtra vidhan sabha election 2024, chandrapur district, congress, bjp
लोकसभेतील मताधिक्य कायम राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान, भाजपला चिंता
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : “महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते लाडकी बहीण योजना..”, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

महायुतीला जास्त जागा मिळतील?

सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती विजय मिळवून महाराष्ट्रात सत्ता कायम ठेवेल असा अंदाज काही एक्झिट पोल्सनुसार वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मॅट्रीक्स, पोल डायरी, चाणक्य, पी-एमएआरक्यू या एक्झिट पोल्सने महायुतीला जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा : महायुतीला १२२ पेक्षा जास्त जागा, तर मविआला किती? एक्झिट पोलचे अंदाज समोर!

कोणत्या एक्झिट पोल्सचा अंदाज काय?

पी-एमएआरक्यू पोल्सचा अंदाज काय?

पी-एमएआरक्यूने महायुती १३७ ते १५७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर महाविकास आघाडीला १२६ ते १४६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे, तसेच इतर २ ते ८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

चाणक्यचा एक्झिट पोल काय?

महायुती १५२ ते १६० : भाजप-९०, शिवसेना शिंदे-४८, राष्ट्रवादी (अजित पवार) २२
महाविकास आघाडी १३० ते १३८ : काँग्रेस-६३, शिवसेना (ठाकरे) ३५, राष्ट्रवादी (शरद पवार) ४० आणि इतर ६ ते ८

मॅट्रीक्सचा एक्झिट पोल काय?

महायुती १५० ते १७० : भाजप-८९ ते१०१, शिवसेना शिंदे-३७ ते ४५, राष्ट्रवादी (अजित पवार) १७ ते २६

महाविकास आघाडी ११० ते १३० : काँग्रेस-३९ ते ४७, शिवसेना (ठाकरे) २१ ते ३९, राष्ट्रवादी (शरद पवार) ३५ ते ४३

पोल डायरीचा अंदाज काय?
महायुतीच्या पोल्सनुसार महायुतीला १२२ ते १८६ आणि महाविकास आघाडीला ६९ ते १२१ जागा मिळण्याचा अंदाज. यामध्ये महायुतीत भाजपाला ७७ ते १०८, शिवसेना (शिंदे) २७ -५०, राष्ट्रवादी (अजित पवार) १८ ते २८. तसेच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस २८-४७, शिवसेना (ठाकरे) १६ ते ३५, राष्ट्रवादी (शरद पवार) २५ ते ३९ जागा मिळतील असा अंदाज.

पीपल्स पल्स एक्झिट पोलचा अंदाज काय?

पीपल्स पल्स एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपाच्या नेतृत्वाखालील युती १७५ ते १९५ जागा जिंकेल. तसेच महाविकास आघाडी ८५ ते ११२ जागा जिंकेल. तसेच अपक्ष आणि इतर पक्ष ७ ते १२ जागा जिंकतील.

पोलस्टर एक्झिट पोलचा अंदाज काय?

भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती महाराष्ट्रात १५० ते १७० जागा जिंकेल. तसेच महाविकास आघाडी ११० ते १३० जागा जिंकेल आणि अपक्ष आणि इतर पक्ष ८ ते १० जागा जिंकतील.

टाईम्स नाऊ एक्झिट पोलचा अंदाज काय?

महायुतीला १०५ ते १२६, महाविकास आघाडीला ६८ ते ९१ आणि इतर पक्ष आणि अपक्षाला ८ ते १२ जागा मिळतील असा अंदाज आहे.

लोकशाही-मराठी रुद्र एक्झिट पोलचा अंदाज काय?

महायुतीला १२८ ते १४२ आणि महाविकास आघाडीला १२४ ते १४० जागा मिळतील असा अंदाज आहे. तसेच इतर पक्ष आणि अपक्षाला १८ ते २३ जागा मिळतील असा अंदाज आहे.