महाराष्ट्र निवडणूक निकाल लागणार आहे. सत्ता कुणाला मिळणार? अपक्ष किंवा राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? कुणाला किती जागा मिळणार? या सगळ्याची उत्तरं आज मिळणार आहेत. याआधी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून खोचक पोस्ट केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
२०२२ मध्ये काय घडलं होतं?
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेनी बंड केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. महाराष्ट्रात २०१९ ला महायुतीला कौल मिळाला होता. भाजपाला १०५ जागा आणि शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या. महायुतीला जनतेने कौल दिला होता. मात्र मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरुन भाजपा आणि शिवसेना यांच्यातले वाद विकोपाला गेले आणि त्यानंतर महायुती तुटली. या घटनेनंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष येऊन सरकार उदयाला आलं आणि उद्धव ठाकरे अडीच वर्षे या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. त्यानंतर २०२२ ला हे सरकार पडलं. २०२३ ला अजित पवारही महायुतीच्या सत्तेत आले.
निकालापूर्वी एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न
निकालापूर्वीच एकमेकांना डिवचण्याचा देखील उद्योग सुरू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांचे जुने वक्तव्य समोर आणलं असून त्या वक्तव्यावरून त्यांना सहज आठवण करून द्यावी, असं म्हटलं आहे. बाकी काही नाही असे म्हणत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत असलेल्या ५० आमदारांपैकी एकही जण पडणार नाही, तसे झाल्यास मी राजकारण सोडेन असं म्हटलं होतं. याच वक्तव्याची सुषमा अंधारे यांनी आठवण ट्विट करून दिली आहे. त्यामुळे निकालापूर्वीच सुषमा अंधारे यांनी शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
मविआ आणि महायुतीची रणनीती सुरु
राज्यामध्ये एक्झिट पोलमध्ये बरीच संभ्रमावस्था असली तरी महायुतीला कौल दिला आहे. मात्र. यामध्ये शिंदे यांच्या अपेक्षेनुसार जागा येत नसल्याचे चित्र एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. दुसरीकडे अजित पवार गटालाही अपेक्षेप्रमाणे जागा मिळत नसल्याचे चित्र समोर येत आहे. एक्झिट पोलमध्ये काही जरी असले तरी महाविकास आघाडीकडून सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यात आली. निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर तातडीने मुंबईला येण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.