Maharashtra Vidhan Sabha Election Result : महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. ही निवडणूक खूप चुरशीची झाली आहे. महाराष्ट्रात काय घडणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकसत्ता.कॉमवर तुम्ही सगळे क्षणाक्षणाचे अपडेट्स पाहू शकणार आहेत. निकालांकडे ( Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ) अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे.

Vidhan Sabha Election Result 2024 महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण कसं आहे?

महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना महत्त्वाचा आहे. कारण सत्तेत भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) असे तीन पक्ष आहेत. तर विरोधात म्हणजेच महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) असे तीन पक्ष आहेत. महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष फुटले आहेत. या पक्षांची दोन शकलं झाली आहेत. त्यामुळे यावेळी सहा प्रमुख पक्ष लढतीत आहेत. शिवाय मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि तिसरी आघाडीही मैदानात आहेत. अनेक अपक्ष आणि बंडखोरही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निकाल लागताना १९९५ सारखी परिस्थिती येऊ शकते असा अंदाज आहे. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंनी सरकार आम्ही स्थापन करणार असा दावा केला आहे. त्यामुळे काय घडतं त्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असणार आहे.

Ladki Bahin Yojana Next Installment Date
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये? आदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय?
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण? (फोटो सौजन्य @Dev_Fadnavis)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?

Maharashtra Assembly Election 2024 results महाराष्ट्रात २०१९ ला काय घडलं होतं?

महाराष्ट्रात २०१९ ला महायुतीला कौल मिळाला होता. भाजपाला १०५ जागा आणि शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या. महायुतीला जनतेने कौल दिला होता. मात्र मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरुन भाजपा आणि शिवसेना यांच्यातले वाद विकोपाला गेले आणि त्यानंतर महायुती तुटली. या घटनेनंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष येऊन सरकार उदयाला आलं आणि उद्धव ठाकरे अडीच वर्षे या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. त्यानंतर २०२२ ला हे सरकार पडलं. २०२३ ला अजित पवारही महायुतीच्या सत्तेत आले.

Election Result 2024 महायुती आणि महाविकास आघाडीचे दावे काय?

महायुतीने आम्ही १६० ते १७० जागा जिंकू ( Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ) असा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीने आम्ही १८० जागा जिंकू असा दावा केला आहे. तसंच एक्झिट पोल्सचे अंदाजही भाजपाच्या बाजूने आहेत. भाजपा-महायुतीचं सरकार राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्राचे निकाल आणि महत्त्वाच्या मतदारसंघाचे निकाल ( Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ) जाहीर होणार आहेत. त्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे-

Assembly Election Result 2024 -तुम्ही कुठे पाहू शकाल निकाल?

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates: अवघ्या काही मिनिटांत विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येणार

Mumbai Konkan Assembly Election Results 2024 Live Updates : मुंबईसह कोकणच्या जनतेचा कौल कोणाला? खऱ्या शिवसेनेचा फैसला होणार?

Marathwada Assembly Election Results 2024 Live Updates: मराठवाड्यात मविआ पुन्हा वर्चस्व मिळविणार? महायुतीला लोकसभेची हाराकिरी भरून काढता येईल?

Baramati Assembly Election Result 2024 Live Updates: बारामतीचा कारभारी कोण? काका गड राखणार की पुतण्या बाजी मारणार?

Story img Loader