Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. महाराष्ट्रात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कोण सरकार स्थापन करणार? कुणाला मतं मिळून सरकार स्थापन होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ जागांची गरज आहे. मात्र महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे. त्यामुळे काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Vidhan Sabha Election Result 2024 बारामतीची लढत चर्चेत

विधानसभा निवडणुकीत चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती. बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत आहे. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत. बारामतीची लढत ( Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ) चर्चेत आहे. कारण युगेंद्र पवारांना निवडून द्या असं भावनिक आवाहन शरद पवार यांनी केलं होतं. शरद पवारांच्या आवाहनाला बारामतीकर प्रतिसाद देतात की अजित पवारांना प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान श्रीनिवास पवार यांनी युगेंद्र पवार विजयी होतील याचा १०० टक्के विश्वास आहे असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
महाराष्ट्रातील तो फॉर्म्युला बिहारमध्येही चालणार? भाजपा नितीश कुमार यांना का सांभाळून ठेवतंय? (फोटो सौजन्य पीटीआय )
महाराष्ट्रात जे घडलंय, ते बिहारमध्येही घडणार? भाजपासाठी नितीश कुमार इतके महत्वाचे का?
Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Amol Mitkari : छगन भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट, राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “ही राजकीय भेट…”
Maharashtra Breaking News Live Updates
Maharashtra News : “छगन भुजबळांची समजूत कशामुळे काढायची?”, माणिकराव कोकाटे यांचा सवाल
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Chandrakant Patil On Pune Guardian Minister
Chandrakant Patil : पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं तर स्वीकारणार का? चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “माझं नेतृत्व मला…”

हे पण वाचा- Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक निकालाआधी सुषमा अंधारेंची एकनाथ शिंदेंविरोधात खोचक पोस्ट! “सहज आठवण करुन द्यावी…”

Election Result श्रीनिवास पवार काय म्हणाले?

“१०० टक्के युगेंद्र जिंकेल मला विश्वास आहे. शहर आणि ग्रामीण दोन्हीकडून आम्हाला मतं मिळतील. बारामतीचा मतदार सूज्ञ आहे. आत्मविश्वास कुणाला कितीही असूद्या. युगेंद्र विजयी होईल मला विश्वास आहे. मी लाखाच्या गोष्टी करणार नाही पण विजय हा विजय असतो. युगेंद्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात होता त्यामुळे तो लोकांना भेटला. अजित दादा तीस वर्षांपासून राजकारणात ( Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ) आहेत त्यामुळे ते लोकांना भेटले नसतील. शरद पवारांशी आमची फोनवरुन चर्चा झाली. त्यांनी काही सूचना दिल्या आहेत पण त्या मी सांगणार नाही. बारामती शरद पवारांचीच आहे लक्षात ठेवा. आमची लढाई विचारांची आहे. अजित पवारांना काही आम्ही फार मोठं समजत नाही. अजित पवार किंगमेकर वगैरे काहीही होणार नाहीत. नवाब मलिक किती राजकीय तज्ज्ञ आहेत मला माहीत नाही. बारामतीचा मतदार बोलत नाही तो करुन दाखवतो.” अशी प्रतिक्रिया श्रीनिवास पवार यांनी दिली आहे.

MVA Vs Mahayuti महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

महाविकास आघाडीने यावेळी अनेक ठिकाणी तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. तर महायुतीने प्रस्थापितांना संधी दिली आहे. आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader