Who is next cm of Maharashtra: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. कारण, विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजप महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. तब्बल २०० पेक्षा जास्त जागांवर महायुतीला आघाडी असून अनेक उमेदवार विजयी देखील झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपला १२० पेक्षा जास्त जागांवर आघाडी दिसत असून भाजपच राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण, महायुतीत पुढचा मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुती बाजी मारणार, हे स्पष्ट झाल्यानंतर आता राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणतात, “गेल्या दोन सव्वा दोन वर्षात एकनाथ शिंदे यांनी दिवस-रात्र एक करुन जनतेच्या सेवेसाठी १८, १८ तास काम केलं आहे. आता मुख्यमंत्री पदाबाबत वरचे नेते म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे बसतील अन् ठरवतील काय करायचं ते आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकरच कळतील. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत श्रीकांत शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Delhi Election 2025 Arvind Kejriwal (1)
दिल्लीत दुकानदार भाजपा, तर फेरीवाले ‘आप’च्या बाजूने, कारण काय?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Delhi Assembly Election 2025
मविआचा ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा चेहरा केजरीवालांच्या मदतीला, दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा
भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार?
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra News Updates : “अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपाकडे पक्ष प्रवेशाची मोठी यादी”, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
Rahul Gandhi
Bihar Politics : बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग; राहुल गांधींनी घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट, काँग्रेस- आरजेडीच्या आघाडीला बळ मिळणार?

हेही वाचा >> Rohit Patil Won Tasgaon Kavathe Mahankal Election : महाराष्ट्राला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार; एकेकाळी वडील होते गृहमंत्री, आज लेकाने मारली बाजी

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“तमाम मतदारांचे मी आभार मानतो. मी सर्व मतदारांचे आभार मानतो. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळेल हे मी याआधीही सांगत होतो की, महायुतीला मोठा विजय मिळेल. त्याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार व्यक्त करतो. माझ्या लाडक्या बहि‍णींचे आभार मानतो. लाडक्या बहि‍णींनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं. लाडक्या भावांनी मतदान केलं. लाडक्या शेतकऱ्यांनी मतदान केलं. तसेच ज्येष्ठ मतदारांनीही मतदान केलं. समाजातील प्रत्येक घटकांनी मतदान केलं. लोकांनी महायुतीला भरभरून मतदान केलं. गेली दोन ते अडीच वर्ष महायुतीने जे काम केलं. त्या कामाची पोचपावती या निवडणुकीत जनतेनी दिली. त्यामुळे जनतेचे आभार मानतो”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Story img Loader