Maharashtra Vidhan Sabha Election Results Highlights: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) राज्यात २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढला. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. मात्र महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. भाजपाने १३२, शिवेसना (शिंदे) ५७, राष्ट्रवादी (४१) जागा जिंकल्या आहेत. तर मविआमधील काँग्रेसने १६, राष्ट्रवादी (शरद पवार) १०, शिवसेना (ठाकरे) २० ठिकाणी विजय मिळविला. महायुती २३५, मविआ ४९ आणि इतरांनी ४ जागा जिंकल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव केला.

Live Updates

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal Highlights | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह

20:52 (IST) 23 Nov 2024
PM Narendra Modi on maharashtra Assembly election Result: महायुतीच्या विजयानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करत नरेंद्र मोदींचे मोठे विधान

बाळासाहेब ठाकरेंचे मोठे योगदान आहे. काँग्रेसने शिवसेनेच्या एका गटाला आपल्याबरोबर घेतले. पण त्यांनी बाळासाहेबांच्या धोरणांना कधीही पसंती दिली नाही. म्हणूनच मी त्यांना आव्हान दिले होते की, काँग्रेसच्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना आपल्या भाषणातून सांगावे. तसेच सावरकर यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचेही आवाहन मी केले होते. काँग्रेसच्या नेत्याने देशभर सावरकरांचा अवमान केला होता. माझ्या आव्हानानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सावरकरांवर बोलणे तात्पुरते टाळले होते, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

20:49 (IST) 23 Nov 2024
PM Narendra Modi on maharashtra Assembly election Result: भारतात फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच संविधान चालणार – नरेंद्र मोदी

“या देशात फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच संविधान चालणार. जो दोन संविधानाची भाषा करणार त्याला देशातील जनता धडा शिकविणार. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० ची भलामन काँग्रेसने केली होती. तिथेही काँग्रेसला नाकारले. मी आता पुन्हा आव्हान देतो की, जगाची कोणतीही शक्ती कलम ३७० पुन्हा लागू करत शकत नाही”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

20:45 (IST) 23 Nov 2024
PM Narendra Modi on maharashtra Assembly election Result: पुढच्या ५ वर्षात महाराष्ट्र वेगाने प्रगती करणार – नरेंद्र मोदी

पुढच्या वर्षात महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग वाढणार आहे, असा मला विश्वास वाटतो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशातील मतदारांना आता अस्थिर सरकार नकोय. ज्यांना फक्त खुर्ची हवी असते, त्यांना देशातील जनता पसंत करत नाही, असेही ते म्हणाले.

20:42 (IST) 23 Nov 2024
PM Narendra Modi on maharashtra Assembly election Result: छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावरकर आमचे आदर्श – नरेंद्र मोदी

आम्ही विकास आणि वारसा या दोहोंना एकत्र घेऊन चालतो. महाराष्ट्रात अनेक महापुरूषांचा जन्म झाला. त्यांना आम्ही आदर्श मानतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

20:39 (IST) 23 Nov 2024
PM Narendra Modi on maharashtra Assembly election Result: ‘एक है तो सेफ है’ हा नारा विकसित भारताचा नारा झाला आहे – नरेंद्र मोदी

भारतात आज ‘एक है तो सेफ है’ हा नारा महत्त्वाचा बनला आहे. काँग्रेसने ओबीसी, छोटे-छोटे जातसमूह यांना विखुरण्याचा प्रयत्न केला होता. पण महाराष्ट्राने या जातीवादी राजकारणाला भीक न घालता छाती ठोकपणे ‘एक है तो सेफ है’ असा नारा दिला. जे विभाजन करतात, त्यांना त्यांची जागा दाखवली गेली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

20:36 (IST) 23 Nov 2024
PM Narendra Modi on maharashtra Assembly election Result: महाराष्ट्रातील मागच्या ५० वर्षांतील सर्वात मोठा विजय – नरेंद्र मोदी

महाराष्ट्रातील जनतेने विचार करून सुशासनाला स्वीकारून, विभाजनवादी राजकारणाला नाकारले आहे. मागच्या ५० वर्षांत मिळाला नाही, असा मोठा विजय यंदा महायुतीला मिळाला आहे. याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

20:33 (IST) 23 Nov 2024
PM Narendra Modi on maharashtra Assembly election Result: तुष्टीकरणाच्या राजकारणाला महाराष्ट्राने थारा दिला नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या मतदारांचे आभार मानले आहेत. राज्यातील जनतेने ध्रुवीकरणाच्या राजकारणाला थारा दिला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

19:40 (IST) 23 Nov 2024

Gopichand Padalkar Assembly Result: भाजपा नेते गोपीचंद पडळकरांचा जतमधून विजय

भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळविला आहे. पडळकर यांनी १ लाख १३ हजार ७३७ मते मिळविली. तर काँग्रेसच्या विक्रमसिंह सावंत यांना ७५ हजार ४९७ मते मिळाली. पडळकर यांचा ३८ हजारांच्या मताधिक्क्याने विजय मिळाला.

19:01 (IST) 23 Nov 2024
Raj Thackeray reaction on Assembly Election: विधानसभा निकालावर राज ठाकरेंची दोन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे याचाही पराभव झाला आहे. यानंतर राज ठाकरेंनी एक्सवर दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

18:49 (IST) 23 Nov 2024

Ajit Pawar vs Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटापैकी अजित पवारांनी बाजी मारली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट ४० मतदारसंघात आमनेसामने आले होते. यामध्ये अजित पवार गटाने बाजी मारली आहे. शरद पवारांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. सविस्तर वृत्त वाचा

18:30 (IST) 23 Nov 2024

Uddhav Thackeray : “हा टोमणा नाहीय, पण अस्सल भाजपाचा मुख्यमंत्री …”, महाविकास आघाडीचा पराभव स्वीकारत उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

राज्यात महायुतीची लाट आली असून भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे),राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांना स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं चित्र आहे. दरम्यान, या महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना मिळून ५५ जागांवर आघाडी घेता आली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून मतदारांना उपरोधिक प्रश्न विचारला आहे. तसंच, भाजपावरही टीका केली आहे.

वाचा सविस्तर

18:15 (IST) 23 Nov 2024

NCP Ajit Pawar Winner Candidate List: राष्ट्रवादी अजित पवारांचे किती उमेदवार जिंकले आणि कोण पराभूत झाले? पाहा संपूर्ण यादी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अनेक उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

18:14 (IST) 23 Nov 2024

Uddhav Thackeray on Assembly Election Result: “महायुतीचे अभिनंदन न करण्याएवढा कद्रूपणा..”, उद्धव ठाकरे काय म्हणाले?

महायुतीचा विजय झाला हे आता जाहीर झालेले आहेच. मी त्यांचे अभिनंदन न करण्याइतका कद्रूपणा दाखविणार नाही, मी त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

18:05 (IST) 23 Nov 2024

Uddhav Thackeray on Assembly Election Result: यावेळी तरी भाजपाचा नेता अस्सल नेता मुख्यमंत्री होईल का? उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आज टोमणा मारणार नाही. पण आतातरी अस्सल भाजपाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

18:04 (IST) 23 Nov 2024

Uddhav Thackeray on Assembly Election Result: विधानसभेचा निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय – उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्याचे समोर आले आहे. या पराभवानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे.

17:59 (IST) 23 Nov 2024

Amit Thackeray First Reaction: पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली पोस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमित ठाकरे यांचा माहीममध्ये पराभव झाला आहे. सदा सरवणकर यांनी माहीममधून माघार न घेतल्याने ही निवडणूक चर्चेत आली होती. यानंतर जो निकाल समोर आला त्यात अमित ठाकरेंचा पराभव झाला आहे. अमित ठाकरे यांनी यानंतर पोस्ट लिहिली आहे. सविस्तर वृत्त वाचा

17:58 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Results: निकाल लागेपर्यंत मी कुणावरही टीका केली – अजित पवार

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मी कुणावरही टीका केली नव्हती. लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी मीच पहिल्यांदा यात्रा काढली होती. तसेच विकास आणि सरकारचे काम घेऊन लोकांमध्ये गेलो. त्यामुळेच आम्हाला थम्पिंग मॅजोरिटी मिळाली आहे, असे अजित पवार म्हणाले.

16:44 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Results: ‘सीएम’चा अर्थ चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन – एकनाथ शिंदे

महायुतीतर्फे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जनतेने विकासाला प्राधान्य दिले असून काम करणाऱ्यांना पुन्हा निवडून दिले आहे. सीएम या नावाला मी चीफ मिनिस्टर म्हणत नसून ‘कॉमन मॅन’ समजतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

16:11 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Results: खरी शिवसेना, खरी राष्ट्रवादी कोणती? हे लोकांनी दाखवून दिले – एकनाथ शिंदे

महायुतीतर्फे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ यांनी सांगितले की, या निकालातून खरी शिवसेना कोणती? हे लोकांनी दाखवून दिले आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, खरी राष्ट्रवादी कोणती? हेदेखील लोकांनी दाखवून दिले आहे.

16:08 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Results: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी एकत्र बसून साजरा केला विजयाचा आनंद

महायुतीचा प्रचंड मोठा विजय झाल्यानंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र बसून विजयाचा आनंद व्यक्त केला.

16:05 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Results: पुढची निवडणूक बॅलेटवर घेऊ पण त्यावरही त्यांचा विश्वास नसेल – संजय शिरसाट

विधानसभा निवडणुकीत मविआचा पराभव झाल्यानंतर मविआमधील नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. आम्ही पुढची निवडणूक बॅलेट पेपरवर घेतली तरी त्यांचा त्यावर विश्वास नसेल, पुढच्या वेळी ते हात वर करून निवडणूक घेण्यास सांगतील.

15:56 (IST) 23 Nov 2024

Mahayuti Press Conference: ‘अजित पवार पिछाडीवर’, अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल

आमचा विजय होत आहे. पण माध्यमे खोट्या बातम्या देतात त्याचे दुःख वाटते. कारण मी सकाळी पोस्टल बॅलेटमध्ये पुढे होते. तरीही काही वृत्तवाहिन्यांनी मी पिछाडीवर असल्याची बातमी बिनधोकपणे दाखवली. माध्यमांनी जबाबदारीने बातम्या देणे गरजेचे आहे, असे अजित पवार म्हणाले.

15:50 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Results: महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार – अजित पवार

काल टीव्हीवरील चर्चा पाहून असे वाटत होते की, आम्हाला काही जागा मिळणार की नाही? पण आज निकाल जाहीर झाल्यानंतर आपले काहीतरी आहे, असे वाटत आहे. यासाठी आम्ही जनतेचे मनोमन आभार मानत आहोत. जनतेने स्वतःच्या हातात निवडून घेतली, असे अजित पवार म्हणाले.

15:42 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Results: देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊत यांना टोला, म्हणाले…

संजय राऊत यांच्यावर मी प्रतिक्रिया देत नाही. पण आज त्यांच्यावर मी प्रतिक्रिया देणार आहे. झारखंडमध्ये अतिशय कमी फरकाने झारखंड मुक्ती मोर्चाचा विजय झाला म्हणजे तिथले ईव्हीएम चांगले होते. पण जर महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणजे इथले ईव्हीएम खराब होते. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतो, इथे लोकशाहीचा खून झाला आहे, असे ते बोलत असतात. पण त्यांनी आत्मचिंतन करावे. जे आत्मचिंतन करत नाहीत, ते संपून जातात.

15:37 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Results: महायुतीचा मोठा विजय, वानखेडेवर होणार शपथविधी

महायुतीने स्पष्ट बहुमत प्राप्त केल्यानंतर आता महायुती सरकारचा शपथविधी वानखेडे मैदानावर होणार असल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे.

15:00 (IST) 23 Nov 2024

Sanjay Raut on Vidhansabha Nivadnuk: “निवडणुकीत इतका फ्रॉड…”, संजय राऊत यांचा मोठा आरोप

“महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही. बॅलेट पेपरवर (मतपत्रिका) पुन्हा निवडणूक घ्या! जगाच्या पाठीवर निवडणुकीत इतका फ्रॉड झाला नसेल. हा निकाल मान्य नाही! नाही! त्रिवार नाही! लोकशाही आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई सुरूच राहील!”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

14:34 (IST) 23 Nov 2024

Karad South Prithviraj Chavan मोठी बातमी! पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव; भाजपाचे अतुल भोसले विजयी

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण विधानसभेत पराभव झाला आहे. भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांचा विजय झाला आहे.

14:03 (IST) 23 Nov 2024
Maharashtra Vidhansabha Results 2024 Live Updates : सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग, महायुती ‘या’ दिवशी शपथविधी घेण्याची शक्यता

महायुतीकडून सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. महायुतीने शपथविधीसाठी २५ नोव्हेंबरचा विचार सुरू केला आहे. येत्या २६ नोव्हेंबर रोजी विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपणार असल्याने त्याआधीच सत्तास्थापन करण्याचा महायुतीचा मानस असल्याची चर्चा आहे.

13:35 (IST) 23 Nov 2024

Amit Thackeray Dadar Mahim Vidhan Sabha Constituency : ‘राज’पुत्र पिछाडीवर; उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला जायंट किलर!

दादर – माहीम विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या हाती येत असलेल्या कलांनुसार अमित ठाकरे प्रचंड पिछाडीवर आहेत. सविस्तर बातमी वाचा

13:24 (IST) 23 Nov 2024

Bacchu Kadu Achalpur Election Result: बच्चू कडू यांना मोठा धक्का, महायुतीला भिडणारे कडू पराभवाच्या छायेत

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहेत. महायुतीला आव्हान देणारे बच्चू कडू यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४