Maharashtra Vidhan Sabha Election Results Highlights: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) राज्यात २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढला. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. मात्र महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. भाजपाने १३२, शिवेसना (शिंदे) ५७, राष्ट्रवादी (४१) जागा जिंकल्या आहेत. तर मविआमधील काँग्रेसने १६, राष्ट्रवादी (शरद पवार) १०, शिवसेना (ठाकरे) २० ठिकाणी विजय मिळविला. महायुती २३५, मविआ ४९ आणि इतरांनी ४ जागा जिंकल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव केला.

Live Updates

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal Highlights | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह

13:16 (IST) 23 Nov 2024
Maharashtra Vidhan Sabhe Election Result Live: भाजपा-काँग्रेसला मोठा धक्का; दोन्ही प्रदेशाध्यक्ष पिछाडीवर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साकोली विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर आहेत. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कामठी मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.

12:20 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Result Live: महायुतीच्या आघाडीवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, मुख्यमंत्रीपदाबाबत म्हणाले…

महायुतीने विधानसभा निवडणुकीत २१७ जागांवर आघाडी घेतली आहे. आता महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी शक्यता वाटत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिाय दिली असून महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानले आहे. लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय होत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना ते म्हणाले, संपूर्ण निकाल लागल्यानंतर आम्ही तीनही पक्ष एकत्र बसून पुढचा निर्णय घेऊ.

12:15 (IST) 23 Nov 2024

Baramati Assembly Election Result: अजित पवारांची निर्णायक आघाडी

अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली आहे. आठव्या फेरीअखेर अजित पवारांनी ७३,०२५ मते मिळवली आहेत. त्यांच्याकडे ३८ हजारांची आघाडी आहे. बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

12:08 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Live News : सत्तेच्या जवळ पोहोचताच भाजपाची उद्धव ठाकरेंना साद; मोठ्या नेत्याचं विधान चर्चेत!

राज्यात विधानसभा निवडणुकीचे अत्यंत धक्कादायक निकाल समोर येत आहेत. भाजपाने आतापर्यंत १२५ चा आकडा पार केला असून महायुतीने १२२ चा आकडा पार केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीची लाट आली आहे. दरम्यान, सत्तेच्या जवळ जात असतानाच भाजपाने आता त्यांचा जुना मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला साद घातली आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

सविस्तर वृत्त वाचा

12:01 (IST) 23 Nov 2024
Assembly Election Result Live: महायुतीची मोठी लाट; २१५ जागांवर विक्रमी आघाडी

महाराष्ट्रात महायुतीची लाट दिसत असून भाजपाने १२७ जागांवर आघाडी घेतली आहे. शिवसेना (शिंदे) ५६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ३८ जागांवर आघाडी कायम ठेवून आहे.

11:19 (IST) 23 Nov 2024
Maharashtra Assembly Election Result Live: “उद्धव ठाकरेंना महायुतीत यायचे असेल तर…”, भाजपा नेत्याचे मोठे विधान

भाजपाने १२८ जागांवर आघाडी घेतल्यानंतर आता भाजपाचे कार्यकर्ते जल्लोष व्यक्त करत आहेत. तर भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. महायुती स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे आम्हाला इतर पक्षांची गरज नाही. पण जर उद्धव ठाकरेंना महायुतीत यायचे असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

10:31 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Result Live: महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालात गडबड, संजय राऊत यांनी व्यक्त केली शंका

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येत असताना आता भाजपाप्रणीत महायुतीने मोठी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. भाजपाने १११ पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली असून महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांनी या निकालावर संशय व्यक्त केला आहे.

10:24 (IST) 23 Nov 2024

Nanded Bypoll Election Result 2024 ravindra chavan; सहानुभूतीचा फायदा काँग्रेसला होणार का ? अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला!

Nanded Bypoll Election Result 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणीला सुरुवात झाली आहे.तर दुसरीकडे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली आहे. या निकालानंतर मराठवाड्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघातील मतदार भाजप की काँग्रेस नेमकं कोणाच्या बाजूने कौल देते हे स्पष्ट होईल. (सविस्तर बातमी वाचा )

10:17 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Result Live: भाजपाने १११ जागांवर घेतली आघाडी

भाजपाने १११ जागांवर आघाडी घेतली आहे.

10:10 (IST) 23 Nov 2024
Sangamner Vidhan Sabha Election Result Live: बाळासाहेब थोरात तिसऱ्या फेरी अखेर पिछाडीवर

संगमनेर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजले जाणारे बाळासाहेब थोरात तिसऱ्या फेरी अखेर ६०८१ मतांनी पिछाडीवर गेले आहेत. शिंदे सेनेचे अमोल खताळ यांनी तेथे आघाडी घेतली आहे.

09:53 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Result Live: महायुती बहुमताच्या दिशेने; मतमोजणी सुरू असतानाच घेतली मोठी आघाडी

महायुतीने तब्बल १६० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर मविआने अद्याप १०० चा आकडाही पार केलेला नाही. त्यामुळे महायुतीने बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे दिसत आहे.

09:29 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Result Live: काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि विश्वजित कदम हे पिछाडीवर असल्याचे सुरुवातीच्या फेरीतून समोर आले आहे.

09:15 (IST) 23 Nov 2024
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल कुठे पाहू शकाल? जाणून घ्या

महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. ही निवडणूक खूप चुरशीची झाली आहे. निवडणुकीचा निकाल पाहा एका क्लिकवर

09:00 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Result Live: मोठी बातमी! महायुतीने शतक गाठले, तब्बल इतक्या जागेवर घेतली आघाडी

महायुतीने १४९ जागांवर आघाडी घेतली असून मविआने सध्या १२२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर १४ आमदार आघाडीवर आहेत.

08:44 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Result Live: ईव्हीएमची मोजणी सुरू झाल्यानंतर महायुती ३१ जागांवर आघाडीवर

ईव्हीएममशीनची मोजणी सुरू झाल्यानंतर महायुती ३१ जागांवर तर महाविकास आघाडी १८ जागांवर आघाडीवर आहे.

08:37 (IST) 23 Nov 2024
Maharashtra Vidhan Sabha Election Result: ‘कुटुंबप्रमुखच होणार पुन्हा मुख्यमंत्री ‘ मातोश्री बाहेर बॅनरबाजी

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत असतानाच मुंबईत मातोश्रीबाहेर ‘कुटुंबप्रमुखच होणार पुन्हा मुख्यमंत्री’, असे बॅनर लागले आहेत.

08:24 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal Live: महायुती ५२ आणि महाविकास आघाडी ४० जागांवर आघाडीवर, पाहा कोणकोणत्या जागांवर घेतली आघाडी

महायुती ५२ आणि महाविकास आघाडी ४२ जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील पाचही विभागीय प्रदेशात भाजपाचे उमेदवार पुढे दिसत आहेत. एक्झिट पोलमध्ये जे कल दिसले, ते प्रत्यक्षात येणार का? याची उत्सुकता आहे.

08:01 (IST) 23 Nov 2024

Vidhan Sabha Nivadnuk Nikal Live: मतमोजणी सुरु, पहिला कल भाजपाच्या बाजूने; या मतदारसंघात भाजपा आघाडीवर

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून भाजपा आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील शिवेंद्रराजे भोसले आणि नागपूर दक्षिण पश्चिममधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत.

07:55 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal Live: अवघ्या पाच मिनिटांत राज्याच्या २८८ मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात

अवघ्या पाच मिनिटांत राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आधी पोस्टल मतदानाची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतमोजणीला सुरुवात होईल.

07:47 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Result: नंदुरबार विधानसभा मतदारसंघात काय निकाल लागणार

नंदुरबार विधानसभा मतदारसंघ नंदुरबार जिल्ह्यात असून तो अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. भाजपा नेते विजयकुमार गावित हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. नंदुरबार विधानसभेत कुणाचा विजय होणार, हे थोड्याच वेळात कळेल… सविस्तर बातमी वाचा

07:30 (IST) 23 Nov 2024
Vidhan Election Result 2024: महायुतीची सत्ता आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? शिवसेना नेत्यांची मोर्चेबांधणी

मात्र, राज्यात महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे? त्यावर महायुतीमधील नेत्यांनी वेगवेगळ्या नेत्यांची नावं घेतली आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच चालू आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सविस्तर बातमी वाचा

07:04 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Live: सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार

आज सकाळी ८ वाजता महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात सुरुवात होणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणी केंद्राबाहेर आता कार्यकर्ते जमू लागले आहेत.

06:50 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live: दादर-माहीमच्या जनतेचा कौल कुणाला? इंजिन-धनुष्यबाणाच्या लढाईत मशाल बाजी मारणार?

माहीम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन्ही गट इथे कमकुवत झाले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटांनी गेल्या काही महिन्यांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. आज माहीमचा निकाल काय लागणार हे वाचा एका क्लिकवर

06:30 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: “किंग आणि किंगमेकर सुद्धा अजित पवार असतील”, निकालाआधीच राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा; चर्चांना उधाण

मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती आणि महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी अपक्षाची मदत लागू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे राजकीय हालचाली वाढल्या आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. “किंग आणि किंगमेकर सुद्धा अजित पवार असतील”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते. सविस्तर बातमी वाचा

06:24 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Result: अवघ्या काही तासांत विधानसभेचे चित्र स्पष्ट होणार

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल अवघ्या काही तासांत लागणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

05:35 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीची सत्ता

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतच मुख्य लढत झाली आहे. महायुतीत भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांमध्ये अटीतटीचा सामना रंगला. ज्यामध्ये भाजपने १४९ निवडणूक लढवली, शिंदेंच्या शिवसेनेने ८१ जागांवर उमेदवार उतरवले तर अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून ५९ उमेदवार रिंगणात होते. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने १०१ जागांवर निवडणूक लढवली, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ९५ ठिकाणी निवडणूक लढवली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ८६ जागांवर आपले उमेदवार उतरवले होते.

05:05 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Live 2024: राज्यात पुरुष मतदारांपेक्षा महिलांचे अधिक मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरुषांनी तर ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिलांनी आणि १,८२० अन्य जणांनी मतदान केले. राज्यात महिला मतदारांच्या तुलनेत पुरुष मतदारांची संख्या जास्त आहे. पुरुष मतदारांची संख्या महिला मतदारांच्या तुलनेत ३०,२६,४६० ने जास्त आहे. मात्र राज्यातील १२ विधानसभा मतदारसंघ असे होते जिथे पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान जास्त झाले.

04:00 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: निवडणुकांचे निकाल कुठे पाहता येणार?

निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी तयारी पूर्ण केली असून तब्बल २८८ मतदार संघाचे निकाल हे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपडेट केले जाणार आहे. त्यामुळे निकालाची अधिकृत आकडेवारी ही निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर पाहता येणार आहे.

02:45 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Election Results 2024: निवडणूक काळात १००० कोटींपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये आचारसंहितेच्या काळात रोकड, अंमली पदार्थ आणि इतर प्रलोभने दाखवली जाऊ नयेत, यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सतत सुरू होते. देशभरामध्‍ये एकूण ११३९ कोटी रूपये जप्‍त करण्‍यात आले. झारखंड आणि महाराष्ट्रात, जप्‍त करण्‍यात आलेली एकत्रित रक्कम ९१४.१८ कोटी रूपये आहे. ही रक्कम २०१९ मधील मागील निवडणुकांमध्ये नोंदवण्यात आलेल्या आकड्यांच्या ७.५ पट पेक्षा अधिक आहे.

00:38 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election 2024 Results Live: नक्षलग्रस्त भागात मतदान सुरळीत पार पडले

महाराष्ट्रातील गडचिरोली आणि झारखंडमधील गिरिडीहसह दोन्ही राज्यांतील डाव्या विचारसरणीने (LWE) प्रभावित भागात मतदान सुव्यवस्थितपणे पार पडले. पहिल्यांदाच मतदानासाठी पात्र ठरलेले मतदार, वृद्ध मतदार, आदिवासी मतदार, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी काम करणारे कामगार मतदार, महिला मतदार, हातात मुले घेऊन आलेले मतदार, तृतीयपंथी मतदार, मतदारांची संपूर्ण कुटुंबे आणि वलयांकित मान्यवर मतदार यांसह समाजातील विविध घटकांतील मतदारांच्या लांबलचक रांगांनी मतदान केंद्रांवरील वातावरण वैशिष्ट्यपूर्ण बनले होते.शौचालय, रॅम्प, शेड, पिण्याचे पाणी यासह खात्रीशीर किमान सुविधांनी (AMF), मतदारांना कोणत्याही अडथळ्याशिवाय आरामात मतदान करता येईल याची हमी दिली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४