Maharashtra Vidhan Sabha Election Results Highlights: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) राज्यात २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढला. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. मात्र महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. भाजपाने १३२, शिवेसना (शिंदे) ५७, राष्ट्रवादी (४१) जागा जिंकल्या आहेत. तर मविआमधील काँग्रेसने १६, राष्ट्रवादी (शरद पवार) १०, शिवसेना (ठाकरे) २० ठिकाणी विजय मिळविला. महायुती २३५, मविआ ४९ आणि इतरांनी ४ जागा जिंकल्या आहेत.
महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव केला.
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal Highlights | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह
Maharashtra Vidhan Sabha Election Results: शहरी मतदारांनी केली निराशा
सुलभ मतदानासाठी आणि प्रोत्साहनपर मोहिमांसाठी आयोगाने अनेक उपाययोजना राबवूनही, राज्यातील शहरी मतदारांनी मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारख्या शहरांमध्ये कमी मतदानाची आपली निराशाजनक परंपरा कायम ठेवली. या उलट ग्रामीण भागात मतदारांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान केले.
Maharashtra VidhanSabha Nivadnuk Result: ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात सरासरी ६५ टक्के मतदान झाले. ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य सकाळी मतपेटीतून बाहेर येणार आहे. राज्यात विजयाचा गुलाल कोण उधळणार? याचा उलगडा काही तासांत होणार आहे.
Marathwada Vidhan Sabha Election Results 2024: मराठवाड्यात यंदा पुन्हा जरांगे फॅक्टरची चर्चा
लोकसभा निवडणुकीदरम्यान मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टर जोरदार चालला. आठपैकी सात मतदारसंघात महायुतीचा पराभव झाला. तर छत्रपती संभाजीनगर हा एकच लोकसभा मतदारसंघ महायुतीला मिळाला. यावेळी विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर पाहायला मिळणार का? हे आता निकालातून दिसून येईल.
Maharashtra Assembly Election Rebel Candidates Results: ‘या’ ३५ बंडखोरांनी महायुती-मविआची चिंता वाढवली, निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार?
बुधवारी जाहीर झालेल्या एकूण एक्झिट पोल्सपैकी प्रमुख १० संस्थांचे अंदाज (निवडणूक निकालाचे एक्झिट पोल) पाहिले तर त्यापैकी सहा अंदाज हे महायुतीच्या बाजूने आहेत, तर तीन संस्थांच्या मते राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळू शकतं. एका पोलमध्ये राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, अनेक एक्झिट पोल्समध्ये अपक्ष व इतर पक्षांच्या आमदारांची संख्या २० ते ३० च्या आसपास असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचाच अर्थ राज्यात त्रिशंकू स्थिती झाल्यास किंवा महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाड्या बहुमताच्या जवळ पोहोचल्या तर या अपक्षांची व छोट्या पक्षांची भूमिका खूप महत्त्वाची असेल. सविस्तर बातमी वाचा
Maharashtra Vidhan Sabha Election Live: निकालाच्या काही तास आधी राजकीय हालचालींना वेग
महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही सरकार स्थापनेबाबत दावे करण्यात येत आहेत. मात्र, काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती आणि महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी अपक्षाची मदत लागू शकते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाच्या आधीच अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांशी आणि छोट्या पक्षांबरोबर संपर्क सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सविस्तर वाचा
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk: सकाळी ८ वाजता मतपेटी उघडणार, मविआ की महायुती? राज्याचा कुणाचे सरकार लाभणार
शनिवारी (दि. २३ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी १२ वाजेपर्यंत साधारण आघाडीवर कोण असेल, याचे चित्र स्पष्ट होईल. मतमोजणी होणाऱ्या केंद्रावर सुरक्षा दलाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४