Congress Candidates List : महाविकास आघाडीतल्या शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसने यादी ( Congress Candidate List 2024 ) जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने नागपूर, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र यातील मतदारसंघांसह एकूण ४८ जागा जाहीर केल्या आहेत. आमचं ८५-८५-८५ जागांचं ठरलं आहे असं काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी बुधवारच्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. आता दोन पक्षांनी नावं जाहीर केल्यानंतर काँग्रेसची यादीही ( Congress Candidate List 2024 ) जाहीर झाली आहे.

id=66 dheight=282px mheight=417px]

Congress Candidate 2nd List
Congress Candidate 2nd List: मोठी बातमी! काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Congress Candidates List Nana Patole
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, कोल्हापूरचा उमेदवार बदलला! आतापर्यंत ‘इतके’ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात
uddhav thackeray
Maharashtra Vidhan Sabha : ठाकरे गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, पाहा सर्व ८३ शिलेदारांची नावं एकाच क्लिकवर
Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
Maharashtra Sharad Pawar NCP 1st candidate list 2024 for Legislative Assembly Election 2024 Declared in Marathi
Sharad Pawar NCP Candidate List 2024: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये अजित पवार वि. युगेंद्र पवार लढत निश्चित, रोहिणी खडसेही मैदानात
Sharad Pawar and Uddhav Thackeray candidate list for vidhan sabha Election
Sharad Pawar NCP Candidate List 2024: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर; शिवसेना उबाठा गटाच्या विरोधात दिला उमेदवार, वाद होण्याची शक्यता?
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fourth list of 7 candidates
Sharad Pawar NCP 4th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?

काँग्रेसच्या यादीत कुणाला कुठून संधी?

१) के.सी. पाडवी, अक्कलकुवा
२) राजेंद्र गावित, शहादा
३) किरण दामोदर, नंदुरबार
४) शिरीशकुमार नाईक, नवापूर
५) प्रवीण चौरे, साक्री
६) कुणाल पाटील, धुळे, ग्रामीण
७) धनंजय चौधरी, रावेर
८) राजेश एकाडे, मलकापूर
९) राहुल बोंद्रे, चिखली
१०) अमित झनक, रिसोड
११) वीरेंद्र जगताप, धामगाव रेल्वे
१२) सुनील देशमुख, अमरावती<br>१३) यशोमती ठाकूर, तिवसा
१४) अनिरुद्ध देशमुख,अचलपूर
१५) रणजीत कांबळे, देवळी
१६) प्रफुल्ल गुडधे, नागपूर-दक्षिण पश्चिम
१७) बंटी शेळके, नागपूर, मध्य
१८) विकास ठाकरे, नागपूर पश्चिम
१९) नितीन राऊत, नागपूर उत्तर
२०) नाना पटोले, साकोली
२१) गोपालदास अग्रवाल, गोंदिया
२२) सुभाष धोटे, राजुरा
२३) विजय वडेट्टीवार, ब्रह्मपुरी
२४) सतीश वारजुकर, चिमूर
२५) माधवराव पवार-पाटील, हदगाव
२६) तिरुपती कोंडेकर, भोकर
२७) मीनल पाटील खदगावकर, नायगाव
२८) सुरेश वरपुडकर, पाथरी
२९) विलास औताडे, फुलंब्री
३०) मुझ्झफर हुसैन, मीरा भाईंदर
३१) अस्लम शेख, मालाड-पश्चिम
३२) नसीम खान, चांदिवली
३३) ज्योती गायकवाड, धारावी
३४) अमिन पटेल, मुंबादेवी
३५) संजय जगताप, पुरंदर
३६) संग्राम थोपटे, भोर
३७) रवींद्र धंगेकर, कसबा
३८) बाळासाहेब थोरात, संगमनेर
३९) प्रभावाती घोगरे, शिर्डी
४०) धीरज देशमुख, लातूर ग्रामीण
४१) अमित देशमुख, लातूर, शहर
४२) सिद्धराम मेहेत्रे, अक्कलकोट
४३) पृथ्वीराज चव्हाण, कऱ्हाड, दक्षिण
४४) ऋतूराज पाटील, कोल्हापूर दक्षिण
४५) राहुल पाटील, करवीर
४६) राजू आवळे, हातकणंगले
४७) विश्वजीत कदम, पलूस कडेगाव
४८) विक्रमसिंग सावंत, जत

हे पण वाचा- Political Nepotism: राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीतही घराणेशाहीची झलक; सर्वपक्षीय पॉलिटिकल नेपोटिझमला उत

काँग्रेसच्या यादीची खासियत काय?

काँग्रेसच्या यादीत ( Congress Candidate List 2024 ) महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे विद्यमान आमदारांना दिलेली संधी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दिलेला उमेदवार. काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून प्रफुल्ल गुडधे यांना संधी दिली आहे. तसंच पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान, रवींद्र धंगेकर या सगळ्या दिग्गजांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

काँग्रेसच्या यादीतले प्रमुख चेहरे ( Congress Candidate List 2024 )

उमेदवाराचं नावपक्षमतदारसंघ
प्रफुल्ल गुडधेकाँग्रेसनागपूर-दक्षिण पश्चिम
बाळासाहेब थोरातकाँग्रेससंगमनेर
पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसकऱ्हाड दक्षिण
रवींद्र धंगेकर काँग्रेसकसबा
अमित देशमुखकाँग्रेसलातूर शहर
नसीम खानकाँग्रेसचांदिवली

महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन २७० जागांवर एकमत झाल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यानंतर आधी शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन पक्षांनी याद्या जाहीर केल्या. त्यानंतर आता काँग्रेसने एकूण ४८ जणांना उमेदवारी दिली आहे. आगामी काळात आणखी काय काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader