2024 Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संपल्यानंतर, संध्याकाळी सहा वाजता एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल? याचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल होय. अवघ्या काही वेळातच हे पोल्स सुरु होतील. एक्झिट पोल्स हे विशिष्ट प्रकारच्या सर्व्हेंवर अवलंबून असतात. कुठल्या मतदारसंघात कसा कल आहे? लोकांना काय वाटतं? याबाबतचा अंदाज घेऊन हे पोल्स जाहीर केले जातात. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल आहे. या दरम्यान २० नोव्हेंबरला हे एक्झिट पोल्स जाहीर झाले आहेत. यासाठीचा सर्व्हे थेट मुलाखती घेऊन, टेलिफोनवरुन बोलून किंवा ऑनलाइन प्रश्नावलीला मिळालेल्या उत्तरांमधून काढलेल्या निष्कर्षांवर आधारित असतो. जाणून घेऊ सगळे अपडेट्स एका क्लिकवर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 Exit Poll Highlights महाराष्ट्र एक्झिट पोल्सचा कौल महायुतीला, मविआला किती जागा?/strong>
महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येईल, नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार हे काँग्रेसच्या नेतृत्वात सरकार येणार आहे असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस व्होट जिहाद म्हणतात, मग ब्राह्मणांनी भाजपाला मतदान केलं तर आम्ही काय त्याला ब्राह्मणांचा जिहाद म्हणायचं का? असा सवाल नाना पटोलेंनी केला आहे.
महाविकास आघाडीला १६०-१६५ जागा मिळणार, संजय राऊतांचा विश्वास
संजय शिरसाट यांचा पराभव होणार
आम्ही आणि आमचे सर्व मित्रपक्षांकडे बहुमताचा आकडा पार करणार.
Exit Polls Live Update : एक्झिट पोल्सनुसार महायुतीला बहुमत; ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते म्हणतात…
एक्झिट पोल्स पाहिले. पण ज्याप्रमाणे आम्ही जमिनीशी जोडलो गेलो आहोत, मविआला पूर्ण बहुमत येईल. सर्वेतून काहीही येवो, जनतेने उठाव केला आहे. महायुतीचा सुपडा साफ होणार आहे – अंबादास दानवे</p>
Exit Poll Live Updates : “सामान्य जनतेसाठी…”, एक्झिट पोल्सवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया
साईबाबांनी मला प्रत्येक गोष्ट दिली आहे. आमची इच्छा आहे की महायुती पुन्हा एकदा सत्तेत यावी. सामान्य जनतेसाठी आम्ही पुन्हा सत्तेत यावं – दीपक केसरकर
Exit poll live Update : एक्झिट पोलच्या अंदाजावर छगन भजुबळांची प्रतिक्रिया, म्हणाले…
एक्झिट पोलनुसार महायुतीचं सरकार येईल. मलाही खात्री आहे की महायुतीचंच सरकार येणार – छगन भुजबळ
Maharashtra Assembly Elections 2024 Exit Poll : अजित पवारांची राष्ट्रवादी सहाव्या क्रमांकावर?
अजित पवार यांनी बंड करुन महायुतीत येण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत त्यांची जादू फार चालली नाही. कारण त्यांच्या पक्षाचा एकच खासदार निवडून आला. आता अजित पवारांची राष्ट्रवादी सहाव्या क्रमांकावर जाईल असा अंदाज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ४२ हून अधिक जागांवर यश मिळेल असं विविध एक्झिट पोल्स सांगत आहेत. तर दुसरीकडे हेच एक्झिट पोल्स अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २२ ते २५ जागा मिळतील असा अंदाजही वर्तवत आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Exit Polls: मनोज जरांगे फॅक्टरचं काय ? काय म्हणतात एक्झिट पोल?
१० ते ११ एक्झिट पोल्समध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल हा अंदाज आहे. तर अनेक पोल्सनी मनोज जरांगे फॅक्टर फार काम करणार नाही असं म्हटलं आहे. ११ पैकी सात एक्झिट पोल्स महायुतीची सत्ता येईल असं म्हणत आहेत. त्यामुळे एक प्रकारे जरांगे फॅक्टर काम करणार नाही असाच अंदाज आहे. नेमकं काय होतं ते २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.
मतदानोत्तर चाचण्यांची सरासरी पाहिली तर राज्यात भाजप ४५ जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला आहे.
Maharashtra Exit Poll Updates: मतदानोत्तर चाचण्या गोंधळलेल्या, विविध संस्थांच्या अंदाजांत विसंगती
लोकसभा आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे अंदाज साफ चुकले असताना राज्य विधानसभा निवडणुकीतही विविध संस्थांनी संमिश्र अंदाज वर्तविले आहेत.
Maharashtra Exit Poll Result Congress : काँग्रेस ठरणार दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष?
महाराष्ट्रात भाजपा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पार पडला आहे. यानंतर आलेल्या एक्झिट पोल्समध्ये भाजपा क्रमांक एकचा तर काँग्रेस क्रमांक दोनचा पक्ष असणार असा अंदाज आहे. टीव्ही ९ रिपोर्टर पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसला ५० हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Assembly Exit Polls BJP : भाजपाला ८० हून जास्त जागा मिळणार, या पोलचा अंदाज
महाराष्ट्रात भाजपाला ८० हून जास्त जागा मिळणार असा अंदाज टीव्ही ९ रिपोर्टर पोलने वर्तवला आहे. तसंच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला २५ हून जास्त जागा मिळतील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Assembly Election Exit Polls Result: १० संस्थांच्या एक्झिट पोलचा एकत्रित अंदाज काय?
तीन पोल्सनी महाविकास आघाडी पुढे असेल सरकार स्थापन करेल असं म्हटलंय. तर दहाही पोल्समध्ये भाजपा क्रमांक एकचा पक्ष असेल असा अंदाज आहे. भाजपाला सरासरी ७८ ते ११० जागा मिळण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Vidhan Sabha Exit Polls Result 2024: कोकणात कुणाला किती जागा? काय सांगतात एक्झिट पोलचे अंदाज?
कोकणात एकूण ३९ जागा आहेत. SAS च्या पोलनुसार कोकणात महाविकास आघाडीला १४ ते १५ जागा आणि महायुतीला २२ ते २३ जागा मिळतील हा अंदाज आहे. झी AI च्या पोलनुसार महायुतीला कोकणात २३ ते २८ जागा आणि मविआला ९ ते १४ जागा मिळतील हा अंदाज आहे.
पुणे शहरातील आठ मतदारसंघापैकी चार जागा महाविकास आघाडीला मिळतील तर चार जागा या महायुतीला मिळतील अशी शक्यता आहे. तर जिल्ह्यातील एकूण २१ मतदारसंघापैकी बोलायचं झाल्यास, ११ जागा या महाविकास आघाडीला जाण्याची शक्यता आहे. तर १० जागा या महायुतीला जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra Exit Polls Result NCP Ajit Pawar : एक्झिट पोलनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा?
चाणक्यच्या पोलनुसार २२ पेक्षा जास्त जागा, पोल डायरीच्या पोलनुसार १८ ते २८ जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतात. लोकशाही रुद्रने २२ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Exit Polls : विदर्भात भाजपाचं कमबॅक होणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदलणार असल्याचा अंदाज आहे. Zeenia AI च्या पोलनुसार महायुतीला विदर्भात ३७ जागा तर मविआला २९ जागा मिळू सकतात. त्यामुळे विदर्भात महायुतीचं कमबॅक होईल अशी शक्यता आहे.
Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024 : मुंबईत महायुती विरुद्ध मविआची काँटे की टक्कर
एसएएस ग्रुपच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला मुंबईत १८ ते १९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीला १७ ते १८ जागा मिळू शकतात. म्हणजेच मुंबईत काँटे की टक्कर असणार आहे.
Maharashtra Exit Poll 2024 : राज ठाकरेंना कुठल्या एक्झिट पोलने किती जागा दिल्या?
सगळ्याच प्रमुख एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार राज ठाकरेंना फार यश मिळणार नाही अशीच शक्यता आहे. दैनिक भास्करच्या पोलनुसार ( Maharashtra Exit Poll 2024 ) मनसेला २ ते ४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. इलेक्ट्रोल एजच्या पोलनुसार मनसे, वंचित, एमआयएम आणि अपक्ष मिळून २० जागांचा अंदाज आहे. तर चाणक्यच्या पोलनुसार ( Maharashtra Exit Poll 2024 ) मनसे आणि वंचितच्या उमेदवारांना ६ ते ८ जागा मिळतील असा अंदाज आहे. राज ठाकरेंनी एक घोषणा एका मुलाखतीत केली होती की मनसेच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन होईल. मात्र एक्झिट पोल्सच्या अंदाजात तरी तसं होताना दिसत नाहीये. आता २३ तारखेला काय होईल याची उत्सुकता कायम आहे. तूर्तास तरी राज ठाकरे किंग मेकर होणार नाहीत अशीच शक्यता या एक्झिट पोल्सनी ( Maharashtra Exit Poll 2024 ) वर्तवली आहे.
Exit Poll Results 2024: एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार राज्यात भाजपा ठरणार सर्वात मोठा पक्ष
एक्झिट पोल्सचे जे अंदाज समोर आले आहेत त्यानुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. तर काँग्रेस सर्वाधिक फायदा होणारा पक्ष ठरणार आहे. भाजपाला ८० ते ११० जागा मिळतील असे अंदाज आहेत. त्यापाठोपाठ ५८ ते ७० जागांचा अंदाज काँग्रेसला वर्तवण्यात आला आहे. नेमकं काय होणार ते २३ नोव्हेंबरला ठरणार आहे.
Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024 : पिपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती?
एकनाथ शिंदे यांना ३५.८ टक्के लोकांनी पहिली पसंती दर्शवली आहे. तर २१.७ टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे. देवेंद्र फडणवीस यांना ११.७ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे तर अजित पवार यांना २.३ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. नाना पटोले यांना १.२ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. अर्थात पीपल्स पल्सचा ( Maharashtra Exit Poll 2024 ) हा अंदाज आहे. प्रत्यक्षात नेमकं काय होणार हे २३ नोव्हेंबरला निकाल काय लागतो आणि जनमताचा कौल कुणाला आहे हे चित्र स्पष्ट झाल्यावरच कळणार आहे.
Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024 : दहापैकी सहा एक्झिट पोल्स महायुतीच्या बाजूने
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली आहे. २३ तारखेला मतमोजणी होईल आणि सरकार कुणाचं येणार? हेदेखील स्पष्ट होईल. दरम्यान एक्झिट पोल ( Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024 ) जाहीर झाले आहेत. १० पैकी सहा एक्झिट पोल्सनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. तर एका तीन एक्झिट पोल महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. एक एक्झिट पोल (Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024) म्हणतोय की त्रिशंकू अवस्था होईल. नेमकं काय घडणार? ते चित्र २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.
Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024 विदर्भात भाजपाचं कमबॅक, ३७ जागा मिळणार?
विदर्भात भाजपाचं कमबॅक होणार? Zeenia AI च्या एक्झिट पोलनुसार भाजपाला विदर्भात ३२ ते ३७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला २४ ते २९ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
Exit Poll Results 2024: महाविकास आघाडीला १५० जागा मिळणार कुठला पोल सांगतोय?
इलेक्ट्रोल एजच्या पोलनुसार महाविकास आघाडीला १५० जागा मिळणार, तर महायुतीला ११८ जागा मिळतील आणि इतरांना २० जागा मिळतील.
Exit Poll Results 2024: जनतेनं कोणत्या शिवसेनेला निवडलं? एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पसंती कुणाला?
एक्झिट पोल्सनी पक्षनिहाय जे अंदाज व्यक्त केले आहेत. त्यावरून बऱ्याच एक्झिट पोल्सनुसार शिवसेना (शिंदे) पक्षाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. सविस्तर बातमी वाचा
Exit Poll Results 2024 : मतदानाची टक्केवारी वाढली की भाजपाला फायदा होतो-देवेंद्र फडणवीस
मतदानाची टक्केवारी वाढली की भाजपाला फायदा होतो हे आपण पाहिलं आहे. आताही महाराष्ट्रात टक्केवारी वाढली आहे. याचा फायदा महायुतीला होईल असं मला वाटतं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024 : सुषमा अंधारे म्हणतात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार
सुषमा अंधारे म्हणल्या महाविकास आघाडीला १४७ ते १५८ जागा मिळतील. तसंच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ४७ ते ५५ जागा मिळतील.
Maharashtra Election Exit Poll : झी न्यूज ICPL चा पोल काय?
झी न्यूज ICPL च्या पोलनुसार महाराष्ट्रात काहीही घडू शकतं असा अंदाज आहे. त्यांच्या अंदाजानुसार महाविकास आघाडीला १२४ ते १५६ जागा मिळतील. तर महायुतीला १२९ ते १५९ जागा मिळतील. तसंच इतरांना ० ते १० जागा मिळतील.
Maharashtra Exit Poll Results 2024 : लोकशाही रुद्रचा पोल म्हणतोय राज्यात त्रिशंकू अवस्था
महायुतीला १२८ ते १४२ जागा मिळतील आणि १२५ ते १४० जागा मविआला मिळतील. तर इतरांना १८ ते २३ जागा मिळतील
Exit Poll Results 2024 : रिपब्लिकच्या पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला १५७ जागा मिळणार
रिपब्लिकच्या पोलनुसार महायुतीला १३७ ते १५७ जागा, मविआला १२६ ते १४६ जागा मिळणार
CNBC Matriz चा पोल सांगतो की महायुतीला १५० ते १७० जागा मिळतील आणि मविआला ११० ते १३० जागा मिळतील असा अंदाज आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संपल्यानंतर, संध्याकाळी सहा वाजता एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल? याचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल होय. अवघ्या काही वेळातच हे पोल्स सुरु होतील. एक्झिट पोल्स हे विशिष्ट प्रकारच्या सर्व्हेंवर अवलंबून असतात.