2024 Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संपल्यानंतर, संध्याकाळी सहा वाजता एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल? याचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल होय. अवघ्या काही वेळातच हे पोल्स सुरु होतील. एक्झिट पोल्स हे विशिष्ट प्रकारच्या सर्व्हेंवर अवलंबून असतात. कुठल्या मतदारसंघात कसा कल आहे? लोकांना काय वाटतं? याबाबतचा अंदाज घेऊन हे पोल्स जाहीर केले जातात. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल आहे. या दरम्यान २० नोव्हेंबरला हे एक्झिट पोल्स जाहीर झाले आहेत. यासाठीचा सर्व्हे थेट मुलाखती घेऊन, टेलिफोनवरुन बोलून किंवा ऑनलाइन प्रश्नावलीला मिळालेल्या उत्तरांमधून काढलेल्या निष्कर्षांवर आधारित असतो. जाणून घेऊ सगळे अपडेट्स एका क्लिकवर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 Exit Poll Highlights महाराष्ट्र एक्झिट पोल्सचा कौल महायुतीला, मविआला किती जागा?/strong>

19:27 (IST) 20 Nov 2024

Vidhan Sabha Election Exit Poll 2024 : PMARQ च्या पोलनुसार महायुतीला १५७ जागा मिळणार

PMARQ चा एक्झिट पोल सांगतो आहे की महायुतीला १३७ ते १५७ जागा मिळतील तर महाविकास आघाडीला १२६ ते १४६ जागा मिळतील.

19:24 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Exit Poll 2024 एसएएस ग्रुपच्या पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीची सत्ता, १५५ जागा मिळण्याचा अंदाज

एसएएसच्या पोलनुसार महाराष्ट्रात मविआचं सरकार येईल. मविआला १४७ ते १५५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महायुतीला १२७ ते १३५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

19:21 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Assembly Exit Poll : महायुतीला १२२ पेक्षा जास्त जागा, तर मविआला किती? एक्झिट पोलचे अंदाज समोर!

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीची प्रतिक्षा अवघ्या राज्याला होती, ती अखेर संपली आहे. मतदानाची वेळ आता संपली असून राज्यात पुन्हा कोण सत्ता स्थापन करणार याचे अंदाज आता येऊ लागले आहे. विविध माध्यम आणि संस्थांकडून एक्झिट पोल जाहीर केले जात असून पोल डायरीने दिलेल्या अंदाजानुसार यंदाच्या निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपाच्या महायुतीला मतदारांना कौल दिल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त वाचा

19:05 (IST) 20 Nov 2024

Vidhan Sabha Election Exit Poll Result : पी मार्कचा एक्झिट पोल काय सांगतो?

पी मार्क आणि मनी कंट्रोलच्या पोलनुसार महायुतीला १३७ ते १५७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला १२६ ते १४६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इतर पक्षांना, अपक्षांना २ ते ८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

19:01 (IST) 20 Nov 2024
VidhanSabha Election Exit Poll 2024 : पिपल्स पल्सचा पोल काय सांगतो?

पिपल्स पल्सचा अंदाज हे सांगतो आहे की महायुतीला १७५ ते १९५ जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला ८५ ते ११२ जागा मिळतील असा अंदाज आहे. या पोलनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल आणि ११३ जागा भाजपाला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५२ जागा मिळतील हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला ३५, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २७ जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ३५ जागा मिळतील, इतर आणि अपक्षांना ६ ते १२ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

18:54 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Exit Poll 2024 : चाणक्यचा पोलही सांगतो आहे महायुतीलाच सत्तास्थापनेची संधी, मविआला फक्त इतक्याच जागा

Maharashtra Exit Poll 2024 : चाणक्य स्ट्रॅटेजीचा एक्झिट पोल समोर आला आहे. महायुतीला १५२ ते १६० जागा मिळतील असं हा पोल सांगतो आहे. तर महाविकास आघाडीला १३० ते १३८ जागा मिळतील असं हा पोल सांगतो आहे. तर इतर सहा ते आठ जागा इतर आणि अपक्षांना मिळतील असा अंदाज वर्तवला गेला आहे.

18:39 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Exit Poll Results 2024 : मेघ अपडेट्सच्या अंदाजानुसार महायुतीला १५० ते १७० जागा

मेघ अपडेट्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपा महायुतीला १५० ते १७० जागा निवडणूक निकालात मिळतील तर काँग्रेससह महाविकास आघाडीला ११० ते १३० जागांपर्यंत मजल मारता येईल. तसंच अपक्ष आणि इतरांना ८ ते १० जागा मिळतील. असा अंदाज आहे.

18:34 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Exit Poll Results 2024 महाराष्ट्रासाठी पोल डायरीचा एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो आहे?

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक संपली आहे. आता पोल डायरीने जो अंदाज वर्तवला आहे त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल. १२२ ते १८६ जागा महायुती जिंकेल असा विश्वास पोल डायरीने वर्तवला आहे. महाविकास आघाडीला १२१ जागा मिळतील असा त्यांचा अंदाज आहे.

18:08 (IST) 20 Nov 2024

Exit Poll Results 2024 – Live महायुतीला १४५ ते १५५ जागा काय सांगतोय न्यूज एक्सचा पोल?

महायुतीला १४५ ते १५५ जागा मिळतील असा अंदाज न्यूज एक्सच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे.

17:54 (IST) 20 Nov 2024
Maharashtra Assembly Election Exit Poll Results 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूुकीचे एक्झिट पोल्स थोड्याच वेळात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहेत. मात्र पुढच्या सात ते आठ मिनिटांत एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात होईल. एक्झिट पोल्स लवकरच जाहीर होणार आहेत. त्यामध्ये कुणाला कौल दिला जातो हे पाहणं हे महत्त्वाचं असणार आहे.

17:36 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024 एक्झिट पोल्स म्हणजे नेमकं काय?

एक्झिट पोल्स हे विशिष्ट प्रकारच्या सर्व्हेंवर अवलंबून असतात. कुठल्या मतदारसंघात कसा कल आहे? लोकांना काय वाटतं? याबाबतचा अंदाज घेऊन हे पोल्स जाहीर केले जातात. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल आहे. या दरम्यान २० नोव्हेंबरला हे एक्झिट पोल्स जाहीर होतील. यासाठीचा सर्व्हे थेट मुलाखती घेऊन, टेलिफोनवरुन बोलून किंवा ऑनलाइन प्रश्नावलीला मिळालेल्या उत्तरांमधून काढलेल्या निष्कर्षांवर आधारित असतो.

17:23 (IST) 20 Nov 2024
Maharashtra Election Exit Polls 2024 कुठले एक्झिट पोल्स जाहीर होतील?

मतदान संपलं की महत्त्वाचे चॅनल्स उदाहरणार्थ इंडिया टुडे, एनडीटीव्ही, रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ यांचे एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात होईल. तसंच सी व्होटर्स, पिपल्स पल्स, अॅक्सिस इंडिया या एजन्सींचेही पोल्स येतील.

17:01 (IST) 20 Nov 2024

अॅक्सिस माय इंडियाचे एक्झिट पोल्स इंडिया टुडेसह एकत्रित, प्रदीप गुप्ता यांची माहिती

अॅक्सिस आणि माय इंडियाचे एक्झिट पोल्स जाहीर केले जाणार आहेत अशी माहिती प्रदीप गुप्ता यांनी दिले आहेत. हरियाणा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. या निकालाआधी झालेल्या एक्झिट पोल्समध्ये हरियाणात काँग्रेसचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता महाराष्ट्र आणि झारखंड यांचा निकाल अंदाज काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रदीप गुप्ता यांनी सांगितलं आम्ही इंडिया टुडेसह एकत्रितपणे आमचे एक्झिट पोल्स जाहीर करणार आहोत.

16:58 (IST) 20 Nov 2024
Maharashtra Election Exit Poll एक्झिट पोल्समध्ये काँग्रेसचा सहभाग नाही

एक्झिट पोल्समध्ये काँग्रेसचे नेते सहभागी होणार नाहीत असं काँग्रेसने जाहीर केलं आहे. निवडणूक संपल्यानंतर एक्झिट पोल्स जाहीर केले जातात. यावर चर्चाही होते. मात्र या चर्चांमध्ये काँग्रेसचे नेते सहभागी होणार नाहीत असं पक्षाने स्पष्ट केलं आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र :

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संपल्यानंतर, संध्याकाळी सहा वाजता एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल? याचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल होय. अवघ्या काही वेळातच हे पोल्स सुरु होतील. एक्झिट पोल्स हे विशिष्ट प्रकारच्या सर्व्हेंवर अवलंबून असतात.