Maharashtra Assembly Election 2024 Date Announced : ठरलं! महाराष्ट्र निवडणुकीची तारीख जाहीर, नोव्हेंबर महिन्यातल्या ‘या’ तारखेला निवडणूक, तर निकाल ‘या’ तारखेला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Schedule : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखेची आणि निकालाची घोषणा

Election Commission of India holds a press conference in Delhi. Dates for Assembly elections in Jharkhand and Maharashtra
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद (फोटो-ANI)

ECI on Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Dates : जम्मू आणि काश्मीर येथील मतदारांनी निवडणुकीचा उत्सव उत्तम प्रकारे साजरा झाला. याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांचे आभार मानले. आज आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election )कार्यक्रम जाहीर करत आहोत. महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार आहेत, त्यापैकी ४.९८ कोटी पुरुष मतदार आहेत तर ४.६६ कोटी महिला मतदार आहेत. अशी माहितीही राजीव कुमार यांनी दिली.

राजीव कुमार यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

आम्ही काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्या दौऱ्यादरम्यान आम्ही निवडणुकीची तयारी योग्य प्रकारे झाली आहे की नाही? याची माहिती आम्ही घेतली. लोकसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election ) वेळी काही गोष्टी घडल्या होत्या त्या टाळण्यासाठी आम्ही आता पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. लोकांची मतदानासाठी रांग लागते त्यावेळी काही अंतरावर खुर्ची किंवा बाक रचण्याचा सल्ला आम्ही दिला आहे. ८५ वर्षे आणि त्यावरच्या मतदारांना घरुन मतदान करता येणार आहे. तसंच या मतदारांच्या गोपनीयतेची काळजी आम्ही घेऊ त्यासंदर्भातली पूर्ण व्यवस्था आम्ही केली आहे असंही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.

sharad pawar suggestion for seat sharing in three constituencies in nashik
नाशिकमधील जागावाटप तिढ्यावर शरद पवार यांचा तोडगा मान्य होणार का ?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Paranda Assembly Constituency MLA Tanaji Sawant Rahul Mote
Paranda Assembly Constituency: परंडा विधानसभेत तानाजी सावंताबरोबरच मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिष्ठा पणाला; राष्ट्रवादी (दोन्ही) काय करणार?
mahavikas aghadi
महाविकास आघाडीला निकालातून सूचक इशारा
haryana election results maharashtra impact
Haryana Election Result: हरियाणामधील विजयाचा महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीवर काय परिणाम होईल?
Dhule Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Dhule Vidhan Sabha Constituency : अल्पसंख्याकांची मते ठरू शकतात निर्णायक, शाह फारुक अनवर यांच्यासमोर ‘ही’ मोठी आव्हाने
Niphad News
Niphad : निफाडला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्षाची पार्श्वभूमी, वाचा काय आहे खासियत?
Sharad Pawar Maharashtra Elections
Sharad Pawar : “महाराष्ट्रात या दिवशी मतदान होईल”, शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज; आचारसंहिता व अर्ज प्रक्रियेबाबत म्हणाले…

आम्ही महाराष्ट्रात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांची पार्श्वभूमी तीनवेळा वृत्तपत्रात द्यावी लागेल. आम्ही जेव्हा महाराष्ट्रात बैठका घेतल्या तेव्हा आम्ही त्यासंदर्भातले कठोर निर्देश आम्ही राज्य निवडणूक आयोग आणि इतर अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. असंही राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. त्यात सर्व मतदारांचा सहभाग आवश्यक आहे.

महाराष्ट्रात कधी होणार निवडणूक?

महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. २० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. गॅझेट नोटिफिकेशनची तारीख २२ ऑक्टोबर असेल तर २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.

अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आणि निकाल या दोन्हीची तारीख जाहीर झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात निवडणूक कधी जाहीर होणार? याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतल २६ नोव्हेंबरच्या आधी निवडणूक घेतली जाईल असं म्हटलं होतं. आज अखेर या निवडणुकीची आणि निकालाच्या दिवसाची घोषणा झाली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra vidhansabha election eci chief rajiv kumar announced dates of maharashtra election scj

First published on: 15-10-2024 at 15:52 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या