Youngest Candidates from Tasgaon Kavathe Mahankal Assembly Election 2024 : सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पण, अखेर या मतदारसंघातील निकाल जाहीर झाला असून राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत आता सर्वात कमी वयाचा उमेदवार लोकांचे प्रश्न मांडताना दिसणार आहे.

रोहित पाटील यांनी शरद पवार गटाकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण, रोहित पाटील मतमोजणीच्या २० व्या फेरीत एक लाख २६ हजार मताधिक्याने विजयाच्या दिशेने आघाडी घेतली आहेत, तर संजयकाका पाटील यांंना ९९ हजार मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहेत, यामुळे रोहित पाटील यांना मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे ते तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आता सर्वात कमी वयाचा उमेदवार ठरले आहेत.

Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Revenue Secretary Sanjay Malhotra to be the new RBI Governor for a period of 3 years!
RBI Governer : संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर, पुढील तीन वर्षे असेल कार्यकाळ
Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण

३ राोहित आर पाटीलांचा पराभव

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षफुटीच्या राजकारणानंतर ही पहिलीच निवडणूक होती. यात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील शरद पवार गटाकडून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, त्यांच्या विरोधात संजयकाका पाटील निवडणूक लढवत होते. यावेळी रोहित आर पाटील यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्या नावासारखेच तीन इतर उमेदवारही निवडणूक लढवत होते. मात्र, रोहित आर. पाटील यांनी भाजपासह विरोधकांचा सुपडा साफ केला आहे.

Sharad Pawar NCP Young Candidate rohit patil
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ रोहित पाटील

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील सर्वात कमी वयाचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून रोहित आर पाटील यांना उमेदवारी दिली होती, त्यांचे वय २५ वर्ष आहे. रोहित पाटील हे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर रोहित पाटील आणि त्यांच्या मातोश्री सुमनताई पाटील यांनी शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. पण, या मतदारसंघातून रोहित यांच्यासमोर माजी खासदार संजयकाका पाटील यांचे आव्हान होते. संजयकाका पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत.

Chembur Assembly Election Results 2024 : चेंबूरमध्ये मतांसाठी शेकड्यांवर घासाघीस; सहा फेऱ्यांनंतरही गाडी पुढे जाईना

तासगाव मतदारसंघात १९९० पासून पाटील यांच्या कुटुंबाचे वर्चस्व आहे. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुमनताई पाटील २०१४ च्या पोटनिवडणुकीत आणि २०१९ च्या निवडणुकीत जिंकल्या होत्या, त्यामुळे सुमनताई पाटील यांच्यानंतर आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार रोहित पाटील जिंकले असून ते २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत.

रोहित पाटील यांच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा उल्लेख केल्याप्रमाणे, त्यांच्याकडे ३६ हजारांची रोख रक्कम आहे. त्यांच्या नावावर एकही गाडी नाही. तसेच त्यांच्या नावे एक लाख ६० हजार रुपयांचे दागिने आहेत. त्याचबरोबर २८ लाख ४२ हजार रुपये चल मालमत्ता आणि ८६ लाख ८० हजार रुपयांची अचल मालमत्ता आहे.

रोहित पाटील यांना तिकिट देण्यामागची राजकीय पार्श्वभूमी काय?

रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायीत १७ पैकी १० जागांवर विजय मिळवत विजयाचा गुलाल उधळला होता. नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचं श्रेय रोहित पाटील यांना जातं कारण या निवडणुकीत त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. १९ जानेवारी २०२२ ला हे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर विधानसभेला रोहित पाटील यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं. त्यानुसार शरद पवार यांनी रोहित पाटील यांना निवडणुकीचं तिकिट दिलंय. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतले हे दोन तरुण उमेदवार ( Sharad Pawar NCP Young Candidate ) चर्चेचा विषय ठरले आहेत.

Story img Loader