MVA Seat Sharing : केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करून आता आठवडा लोटेल. उमेदवार अर्ज प्रक्रियाही सुरू झालेली आहे. परंतु, महाविकास आघाडीचे जागा वाटप काही होत नव्हते. गेल्या काही दिवसांपसाून तिन्ही प्रमुख पक्षांतील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, या चर्चांना पूर्णविराम मिळत नव्हता. त्यातच शिवेसना आणि काँग्रेस यांच्यातील मुंबई आणि विदर्भातील काही जागांवर वाद असल्याचं समोर आलं. त्यामुळे जागा वाटप रखडले असल्याचंही सांगण्यात आलं. परंतु, आता जागावाटप झालं असून महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला आज पत्रकार परिषद घेऊन सांगितला.
महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय?
महाविकास आघाडीतील नाना पटोले, संजय राऊत यांनी आज मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत जागा वाटपाबाबत शेवटची चर्चा झाल्याची माहिती संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी ८५ जागा देण्यात आल्या आहेत. म्हणजेच, २७० जागांचं जागावाटप झालेलं आहे. २८८ पैकी २७० जागांची यादीही तयार झाली असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. तसंच, उर्वरित जागा इतर मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात उद्या सकाळापासून चर्चा सुरू होईल, असं संजय राऊत म्हणाले.
MVA allies to contest 85 seats each in Maharashtra assembly polls; consensus on 270 constituencies: Sanjay Raut
— Press Trust of India (@PTI_News) October 23, 2024
काँग्रेस आणि शिवसेनेत (ठाकरे) जागावाटपावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या बैठकीत कोणी किती जागा लढवायच्या याचे सूत्र निश्चित करण्यात आले. यानुसार काँग्रेस ८५, शिवसेना (ठाकरे) ८५ तर राष्ट्रवादी (शरद पवार) ८५ जागा लढविण्यावर सहमती झाली आहे. आज मुंबईत शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत हे सूत्र ठरवण्यात आले. तसंच, उर्वरित जागा इतर मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत.
हेही वाचा >> मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरेंचा हुकमी एक्का!
विदर्भातील काही जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील काही जागांवरही दोन्ही बाजूने ताणले गेल्याने पुन्हा चर्चा करण्यात आली. जागावपाटपात काँग्रेस ८५, शिवसेना ८५ तर राष्ट्रवादीला ८५ जागा लढविण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. डावे पक्ष, समाजवादी पार्टी व अन्य छोट्या पक्षांना तिन्ही पक्षांनी आपापल्या कोट्यातून जागा सोडाव्यात, असा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, महाविकास आघाडीत कोण लहान भाऊ आणि कोण मोठा भाऊ यावरून वाद सुरू होता. परंतु, या जागा वाटपामुळे आता हा वादच संपुष्टात आला असून महविकास आघाडीत सर्वच समसमान आहेत.
o