Mahayuti Candidates List Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर २८८ जागांसाठी सुमारे ७,९९५ जणांनी १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन प्रमुख आघाड्यांमधील सर्वच पक्षांमध्ये अनेकांनी बंडखोरी केली असून मनसे, वंचित बहुजन आघाडी, स्थानिक आघाड्या, छोटे पक्ष हे देखील मैदानात उतरले आहेत. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून तत्पूर्वी नाराजांचं मन वळवण्याचं खडतर आव्हान नेतेमंडळींना पार पाडावं लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळेल अशा अपेक्षेत असलेल्या इच्छुकांनी मंगळवारी, अखेरच्या दिवशी बंडखोरीचा मार्ग पत्करला. त्यामुळे या एकाच दिवशी ४,९९६ उमेदवारांनी एकूण ६,४८४ अर्ज दाखल केले. बुधवारी या अर्जांची छाननी केली जाणार आहे. सोमवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवारांची नेमकी संख्या स्पष्ट होईल.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांच्या चर्चा व बैठकांनंतरही महाविकास आघाडी योग्य समन्वय साधू शकली नाही. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचे उमेदवार निश्चित झाले नव्हते. तर कित्येक मतदारसंघांमध्ये दोन-दोन उमेदवार जाहीर केले आहेत. यांच्यापैकी काहीजण ४ नोव्हेंबरपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात. मात्र, सध्या तरी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीच्या पक्षांची दोस्तीत कुस्ती पाहायला मिळू शकते. तर, चार मतदारसंघांमध्ये महायुतीचे पक्ष आमने-सामने आहेत. महायुतीचे नेते देखील काही मतदारसंघांमधील संघर्ष रोखू शकली नाही.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
badnera assembly constituency tushar bhartiya file nomination as in independent candidate for maharashtra assembly election
भाजप बंडखोर उमेदवार म्हणतात, आमची ‘ निष्‍ठावंत भारतीय जनता पार्टी…’ !  …
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
ashish shelar Nawab malik
Nawab Malik : भाजपा नवाब मलिक व सना मलिक यांचा प्रचार करणार? आशिष शेलार म्हणाले, “राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे…”
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे ही वाचा >> Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: दाऊदचा उल्लेख करत ठाकरे गटानं शेअर केला फडणवीसांचा ‘तो’ व्हिडीओ!

देवळालीत दोस्तीत कुस्ती

नाशिकमधील देवळाली मतदारसंघात महायुतीच्या दोन पक्षांची दोस्तीत कुस्ती पाहायला मिळणार आहे. येथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) सरोज अहिरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर, शिवसेनेने (शिंदे) राजश्री अहिरराव यांना येथून विधानसभेचं तिकीट दिलं आहे.

हे ही वाचा >> महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटेंनी दिली वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी; पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

दिंडोरी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – नरहरी झिरवाळ
शिवसेना (शिंदे) – धनराज महाले

अणूशक्तीनगर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – सना मलिक
शिवसेना (शिंदे) – अविनाश राणे

हे ही वाचा >> “कॅनडातील फुटीरतावाद्यांविरोधातील हिंसेमागे अमित शाह”, ट्रुडो सरकारचे गंभीर आरोप

मानखुर्द-शिवाजीनगर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – नवाब मलिक<br>शिवसेना (शिंदे) – शिवाजी पाटील

देवळाली

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – सरोज अहिरे
शिवसेना (शिंदे) – राजश्री अहिरराव

Story img Loader