Mahayuti Candidates List Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर २८८ जागांसाठी सुमारे ७,९९५ जणांनी १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन प्रमुख आघाड्यांमधील सर्वच पक्षांमध्ये अनेकांनी बंडखोरी केली असून मनसे, वंचित बहुजन आघाडी, स्थानिक आघाड्या, छोटे पक्ष हे देखील मैदानात उतरले आहेत. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून तत्पूर्वी नाराजांचं मन वळवण्याचं खडतर आव्हान नेतेमंडळींना पार पाडावं लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळेल अशा अपेक्षेत असलेल्या इच्छुकांनी मंगळवारी, अखेरच्या दिवशी बंडखोरीचा मार्ग पत्करला. त्यामुळे या एकाच दिवशी ४,९९६ उमेदवारांनी एकूण ६,४८४ अर्ज दाखल केले. बुधवारी या अर्जांची छाननी केली जाणार आहे. सोमवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवारांची नेमकी संख्या स्पष्ट होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा