कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवार देऊन सर्वांनाच धक्का दिला. मात्र महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनीही प्रचारासाठी आता कंबर कसली असून शाहू महाराज आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. शाहू महाराजांना उमेदवारी दिल्यानंतर कुणीही त्यांच्याविरोधात प्रचारासाठी उतरणार नाही, असा विचार मविआने केला असावा. त्यामुळे माझ्याबाबतही कांगावा करण्यात येत होता. काल-परवा पर्यंत माझे कौतुक करणारे, आज माझ्यावर टीका करत आहेत, असा आरोप संजय मंडलिक यांनी केला.

छत्रपती शाहू महाराज यांचा बळीचा बकरा

संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयचे उदघाटन आज करण्यात आले. यानिमित्त झालेल्या छोटेखानी सभेत संजय मंडलिक यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, “स्वतःचा पराभव टाळण्यासाठी माझ्या विरोधकांनी छत्रपती शाहू यांना बळीचा बकरा बनविले आहे. महाराजांना निवडणुकीत उतरवले असले तरी आम्ही गादीचा सन्मान करतो. पण निवडणूक निवडणुकीसारखीच लढली जाईल. निवडणूक म्हणजे कुस्तीचा आखाडा आहे. आखाड्यात कोण छोटा, कोण मोठा याला काही अर्थ नसतो. कुस्तीत डाव टाकावाच लागतो. त्यामुळेच हसन मुश्रीफ यांनी महाराजांना निवडणुकीत न उतरण्याची विनंती केली होती. पण महाराजांनी ही विनंती स्वीकारली नाही. कदाचित त्यांची राजकीय महत्त्वकांक्षा असावी. ते जसे कोल्हापूरच्या गादीवर आले, तसे त्यांना कदाचित लोकसभेतही जायचे असेल. पण त्यांचा हा ‘राटहट्ट’ आहे. त्यांचा राजहट्ट कोल्हापूरची जनता पूर्ण करणार नाही.”

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
leader Rahul Gandhi vs AAP supremo Arvind Kejriwal
काँग्रेस, आपच्या आरोपांनी ‘इंडिया’त विसंवाद
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
Will the post of CIDCO Board Chairman be changed soon
सिडको मंडळाच्या अध्यक्षपदाचा लवकरच खांदेपालट?
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’
Mahavikas Aghadi News
MVA : काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”

“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन 

पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीने मला उेमदवारी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी मला साथ द्यावी, असे आवाहनही संजय मंडलिक यांनी केले. तसेच त्यांनी आपल्या भाषणात काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे नाव न घेता टीका केली. महाराज निवडून आल्यानंतर प्रत्येक तालुक्यात जनसंपर्क कार्यालय उघडून महाराजांच्या सहिचे पत्र तिथे ठेवणार असल्याचे ते म्हणाले. याचा अर्थ सतेज पाटील यांना अजिंक्य ताराच्या वेगवेगळ्या शाखा काढायच्या असतील. त्यांना खासदारकी आपल्या घरी वापरायची असेल, असा आरोप मंडलिक यांनी केला.

“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”

कालपर्यंत आम्ही पुरोगामी होतो, पण आज अचानक आम्हाला प्रतिगामी म्हटले जात आहे. पण मी सांगू इच्छितो की, कोल्हापूरचा डीएनए हा शाहू विचारांचा आहे. कोल्हापूर जिल्हा समतेचा पुरस्कर्ता आहे. त्यामुळे पुरोगामित्व इतल्य जनतेच्या रक्ता रक्तात आहे.

Story img Loader