बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांची आज भेट झाली. या भेटीला राजकीय पातळीवर महत्व प्राप्त झालं आहे. कारण काही दिवसांपूर्वीच विजय शिवतारेंनी अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटले होते. विजय शिवतारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही भेट घेतली तरीही ते बंड करण्यावर ठाम होते. मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हा विजय शिवतारेंनी बंडाची तलवार म्यान केली.

आज सुनेत्रा पवारांनी घेतली विजय शिवतारेंची भेट

आज सासवड या ठिकाणी सुनेत्रा पवार यांनी विजय शिवतारेंची भेट घेतली. सुनेत्रा पवारांना आणि सुप्रिया सुळेंना दोघींनाही विजय शिवतारेंनी विरोध दर्शवला होता. तसंच विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधातच दंड थोपटले होते. काहीही झालं तरीही मी बारामतीची निवडणूक लढवणारच. बारामती ही कुणाची मक्तेदारी नाही, असं विजय शिवतारे म्हणाले होते. त्यानंतर त्यांचं बंड शमलं. अशात सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे यांची भेट घेतली. विजय शिवतारे यांना जेव्हा सुनेत्रा पवार भेटल्या तेव्हा राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्तेही होते. ही भेट महत्त्वाची ठरली आहे. या भेटीची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar Sharad Pawar Meet in Delhi
Ajit Pawar Sharad Pawar Meet: अजित पवारांची प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांशी भेट; कशावर झाली चर्चा? उत्तरादाखल म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्तार…”
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
anoushka kale cambridge
ऐतिहासिक केंब्रिज युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय विद्यार्थिनीची निवड; कोण आहेत अनुष्का काळे?
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Shabana Azmi Javed Akhtar
शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”

हे पण वाचा- शरद पवारांचं मिश्किल वक्तव्य, “मोदी म्हणाले मी शरद पवारांचं बोट धरुन राजकारणात, मला बोटाची काळजी..”

पार्थ पवार यांच्याकडूनही सुनेत्रा पवारांचा प्रचार

बारामती मतदारसंघात पार्थ पवार प्रचारात उतरले आहेत. विजय शिवतारे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असंही म्हटलं होतं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र प्रचारात विजय शिवतारे उतरणार असल्याने आता ही निवडणूक अजित पवारांसाठी डोकेदुखी ठरणार नाहीत हे नक्की.

१५ मार्चला काय म्हणाले होते विजय शिवतारे?

१५ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीका केली होती. विजय शिवतारे म्हणाले, “ताई आणि वहिनी ही लोकशाही चुकीची आहे. फक्त त्या कोणाच्या पत्नी आहेत, म्हणून त्यांना मते द्यायची हे चूक आहे. आम्ही किती वर्ष पुन्हा-पुन्हा त्यांनाच मतदान करणार आहोत. काय मिळाले आम्हाला? उद्या तुम्ही म्हणाल माझी पत्नी आहे मते द्या, ही माझी मुलगी आहे मते द्या, ही लोकशाहीची थट्टा आहे”, असे विजय शिवतारे म्हणाले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी त्यांचं बंड मागे घेतलं होतं. विजय शिवतारे हे अजित पवारांसाठी डोकेदुखी ठरणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र आता विजय शिवतारे सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांनी विजय शिवतारेंची भेट घेणं महत्त्वाचं मानलं जातं आहे.

Story img Loader