मतमोजणी अजूनही सुरू आहे. मात्र, निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात महायुती पुन्हा एकदा सरकार स्थापनेकडे वाटचाल करत आहे. महायुतीने लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना केला होता, मात्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत महायुतीने चित्र बदलले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी महायुतीने फक्त १७ जागा जिंकल्या होत्या. मतमोजणी अद्याप पूर्ण व्हायची असली तरी सत्ताधारी आघाडी मोठ्या जनादेशासह पुन्हा सत्तेवर येण्यासाठी सज्ज आहे.

लोकसभा आणि विधानसभेच्या विजयी जागांचे गणित

लोकसभा निवडणुकीत भाजपाने नऊ जागा जिंकल्या, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सात आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला फक्त एक जागा मिळाली, ज्यात विधानसभेच्या एकूण १२५ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. जो सभागृहातील १४५ च्या बहुमताच्या संख्येपेक्षा कमी आहे. महाविकास आघाडीने लोकसभेच्या ३० जागा जिंकल्या होत्या, ज्यात १३ काँग्रेसने, नऊ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आणि आठ जागा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या, ज्यात एकूण १५३ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता.

BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास

मात्र, लोकसभेचे हे कल विधानसभा निवडणुकीत बदलले आहेत. भाजपाचा या निवडणुकीतील स्ट्राइक रेट सर्वात उत्तम स्ट्राइक रेट आहे. भाजपाने यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत १३२ जागा जिंकल्या आहेत. २०१९ मध्ये हाच आकडा १०५ होता, त्यामुळे आकडेवारीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीनंतर याकडे महायुतीचे महराष्ट्रातील पुनरागमन म्हणून पाहिले जात आहे. शिवसेनेने ५५ विधानसभा क्षेत्र तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)ने ४१ विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. महायुतीला यावेळी लोकसभा निवडणुकीतील १२५ पैकी आठ वगळता सर्व जागा राखून ठेवण्यात यश आले आहे. महाविकास आघाडीने यातील सात तर अपक्षने एक जागा जिंकली आहे.

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का; महाराष्ट्रात निराशा अन् झारखंडमध्येही पक्ष कमकुवत, कारण काय?

दरम्यान, महाविकास आघाडीने आतापर्यंत ५६ विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत, ज्यात मित्रपक्ष समाजवादी पार्टी (सपा), सीपीआय (एम) आणि पीडब्ल्यूपीआय या पक्षांनी जिंकलेल्या जागांचा समावेश आहे. परंतु, या विजयांपैकी फक्त १० विभाग आहेत जे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जिंकण्यात अपयशी ठरले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागा जिंकल्या, त्या जागा राखण्यात महाविकास आघाडी अयशस्वी ठरली आणि सत्ताधारी महायुतीचे प्रचार मुद्दे प्रभावी ठरले आणि या जागांवर त्यांना विजय मिळवता आला.

Story img Loader