कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला धोबीपछाड दिला असून संपूर्ण बहुमताने विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने १३६ जागा जिंकल्या असून भाजपाला केवळ ६५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या पराजयामुळे दक्षिण भारतातील एकमेव राज्य भाजपाच्या हातून निसटलं आहे. दक्षिण भारतातील एकाही राज्यात आता भाजपाची सत्ता उरली नाही.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी टोलेबाजी केली आहे. भारतीय जनता पार्टीला ‘काँग्रेसमुक्त भारत’ करायचा होता. पण कर्नाटकच्या निकालामुळे ‘भाजपामुक्त दक्षिण भारत’ झाला आहे, असा टोला खरगे यांनी लगावला.
हेही वाचा- “कर्नाटकमध्ये दलित मुख्यमंत्री हवा असेल, तर…”, काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान!
कर्नाटकमधील विजयानंतर भावना व्यक्त करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “हा मोठा विजय आहे. यातून संपूर्ण देशात एक नवी ऊर्जा निर्माण झाली. भाजपा आम्हाला टोमणे मारायचा की, आम्ही ‘काँग्रेस मुक्त भारत’ करू. पण आता सत्य हे आहे की ते ‘भाजपा मुक्त दक्षिण भारत’ झाला आहे.”
हेही वाचा- काँग्रेस की भाजपा? कर्नाटक निवडणुकीच्या इतिहासात कोणत्या पक्षाने जिंकल्या सर्वाधिक जागा? जाणून घ्या
“अहंकार फार काळ टिकत नसतो. ही लोकशाही आहे आणि आपल्याला लोकांचं म्हणणं ऐकावंच लागतं. आपल्याला योग्य मार्ग दाखवणार्या जनतेसमोर आपलं डोकं टेकवावं लागंतं. हा कुणा एकाचा विजय नसून राज्यातील जनतेचा विजय आहे. त्यांनी ठरवलं आणि त्यांनी निवडलं आहे. त्यामुळेच आम्हाला १३६ जागा जिंकता आल्या. गेल्या ३६ वर्षातील हा सर्वात मोठा विजय आहे,” असंही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
खरगे पुढे असंही म्हणाले की, “आम्ही ‘मेकेदाटू’ (पदयात्रा) पासून सुरुवात केली. राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो यात्रा’ केली. राहुल गांधी ज्या मार्गावर चालले होते, त्या मार्गावरील जवळपास ९९ टक्के जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचे (राहुल गांधी) आभार मानतो.”