Premium

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध, जातनिहाय जनगणनेसह विविध घोषणांचा पाऊस

NCP Manifesto Release : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम असताना राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

NCP Manifesto
राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध (फोटो – अजित पवार/X)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज जाहीरनाम्याची आज घोषणा करण्यात आली आहे. कृषी, वीज, उद्योग आदी विविध क्षेत्रासाठी त्यांनी घोषणा केल्या आहेत. तसंच, जातनिहाय जनगणनेचाही प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. आज, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘राष्ट्रासोबत राष्ट्रवादी’ हे ब्रीदवाक्य घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या लोकसभा निवडणुकीत जनतेसमोर येत आहे, असं राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले तरीही जागावाटप आणि जाहीरनामा प्रसिद्ध झाला नव्हता. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम असताना राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस करणार असल्याचं या जाहीनाम्यात म्हटलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जाहीरनाम्याचे वाचन केले.

जाहीरनाम्यात काय घोषणा केल्या?

  • अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करणार
  • स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्यावा
  • शेतकऱ्यांना शेतमालाला हमीभाव मिळावा
  • अपारंपरिक वीज निर्मिती
  • अपारंपरिक वीज निर्मितीला चालना
  • उद्योगांना प्राधान्य
  • कृषी पिकविम्याच्या व्याप्तीत वाढ
  • शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ
  • मुद्रा कर्ज योजनेत मर्यादित वाढ
  • जातीनिहाय जनगणना
  • ऊर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा
  • वन क्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबा

“राष्ट्रवादी काँग्रेसची विकसित भारतासाठीची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहिरनामा आहे. यात सार्वजनिक सेवा, पायाभूत सुविधासह आर्थिक प्रगतीचा संकल्प व्यक्त करण्यात आलाय. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार ही ग्रामविकासाची पंचसूत्री सांगतानाच त्यानुसार आम्ही काम करणार आहोत असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या अमृतकाळातील लोकसभा २०२४ साठीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा आम्ही जनतेच्या हाती सोपवत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम विकास आणि विश्वासाने राज्यातील जनतेचा पसंतीचा पक्ष राहील आणि ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या भूमिकेचा जनता स्वीकार करेल असा आम्हाला विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manifesto published by ncp party caste wise census sgk

First published on: 22-04-2024 at 14:29 IST
Show comments