लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात देशात १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये आज (१९ एप्रिल) मतदान पार पडत आहे. यामध्ये मणिपूरच्या दोन मतदारसंघात (मणिपूर आणि मणिपूर बाह्य) मतदान होत आहे. या मतदानादरम्यान मणिपूरमधील मोइरांग विभागातील थामनपोकपी येथील एका मतदान केंद्रावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

थामनपोकपी येथील मतदान केंद्रावर गोळीबार झाल्यामुळे मतदान करण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये मोठी घबराट पसरली असून व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ गोळीबाराचा आवाज येत आहे. तसेच मतदान केंद्राबाहेर लोक पळत असल्याचे दिसत आहे. २५ सेकंदांचा हा व्हिडीओ असून यामध्ये गोळीबाराचा आवाज येण्याआधी मोठा गोंधळ सुरु असल्याचे दिसत आहे. या गोळीबारात तीनजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Narendra Modi
Delhi Election Result : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्याहून परतल्यानंतर दिल्लीत होणार नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Delhi Assembly Election Results 2025
Delhi Election Video: आठवा वेतन आयोग, प्राप्तिकर घोषणा ते न झालेली युती; गिरीश कुबेर यांच्या शब्दांत ‘आप’च्या पराभवाची कारणमीमांसा!
Northeast Delhi Assembly Election Result
दंगलग्रस्त भागातही भाजपाचा डंका; तीन जागा जिंकून आघाडी, तर ‘आप’ला एकच ठिकाणी यश
Delhi election results today
दिल्लीत कोणाची सत्ता?
Delhi Election 2025
Delhi Elections : मसाज पार्लरच्या कंपन्या एग्झिट पोल्स घेतायत की काय? आपच्या खासदाराची टिप्पणी
Delhi assembly elections 2025 news in marathi
दिल्ली’साठी आज मतदान; तिरंगी सामन्यात मतटक्क्यावर सत्तेचे गणित
काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार? (फोटो सौजन्य)
Political News : काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार?

हेही वाचा : पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी

मोइरांग विभागातील थामनपोकपी येथील गोळीबाराच्या घटनेनंतर याठिकाणी अधिक प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याबरोबरच मणिपूरच्या इम्फाळ पूर्व येथील एका मतदान केंद्रावर ईव्हीएमची तोडफोड झाल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये गेल्या वर्षीपासून हिंसाचार सुरु असल्याचे पाहायला मिळते.

पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर दगडफेक

पश्चिम बंगालच्या कूच बिहारमधील एका मतदान केंद्रावर दगडफेक झाली असून यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. यानंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. त्यामुळे येथेही काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Story img Loader