इम्फाळ :  मणिपूरमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६७.४६ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी गोळीबार आणि धमकावण्याच्या घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  राज्यातील ६० पैकी ३२ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या इनर मणिपूर लोकसभा मतदारसंघात ७१.०१ टक्के मतदानाची नोंद झाली, तर २८ पैकी १५ विधानसभा मतदारसंघ मिळून बनलेल्या आउटर मणिपूर मतदारसंघात ६१.१२ टक्के मतदान झाले.

इनर मणिपूरअंतर्गत येणाऱ्या थौबल जिल्ह्यातील वांगखेम येथे सर्वाधिक ८२.४१ टक्के मतदान नोंदवले गेले. नागा व कुकी अशा दोन्ही समुदायांचे मतदार असलेल्या आउटर मणिपूरमधील चंदेल येथे ८५.५४ टक्के मतदान झाले.

maharashtra vidhan sabha election 2024 sanjay kelkar avinash jadhav rajan vichare thane assembly constituency
लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
mumbai This election polling stations increased and started in housing societies to avoid evening crowding
साडेसहाशे गृहनिर्माण संस्थांमध्ये होणार मतदान, मुंबईत प्रथमच मोठ्या स्तरावर प्रयोग, मतदान वाढण्याची अपेक्षा
65 percent voter turnout recorded in first phase of jharkhand assembly polls
पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष
Kalyan Dombivli assembly election campaign wage rates labour
कल्याण-डोंबिवलीत प्रचार टिपेला, मजुरीचे दर शिगेला; प्रचारासाठी लागणाऱ्या मजुरांचे दर २५० ते १२०० रूपये
Vote Karega Kulaba campaign to increase voter turnout print politics news
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘व्होट करेगा कुलाबा’ मोहीम; सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त अधिकाऱ्यांचा पुढाकार
Rajan Vikhare, demands CCTV system
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची मागणी
Chandrapur marathi news
एकदाच मतदान करण्याचा अधिकार…पण, या गावात मात्र दोन वर्षांत चौथ्यांदा…

हेही वाचा >>> अल्पवयीन बलात्कारपीडितेची गर्भपातासाठी याचिका; सर्वोच्च न्यायालयाचे तातडीने, वैद्यकीय तपासणीचे निर्देश

इनर मणिपूर मतदारसंघात अनेक ठिकाणी गोळीबार आणि धमकावण्याच्या घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. इम्फाळ पूर्व जिल्ह्यात खुराई मतदारसंघातील मोइरांगकाम्पू साजेब येथील एका मतदान केंद्राजवळ उभ्या असलेल्या ६५ वर्षांच्या एका इसमावर अनोळखी सशस्त्र लोकांनी गोळया झाडल्या. यात जखमी झालेल्या या इसमाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

बिष्णुपूर जिल्ह्यात मोइरांग विधनसभा मतदारसंघात येणाऱ्या थमनापोक्पी येथील एका मतदान केंद्राजवळ सशस्त्र लोकांनी हवेत गोळीबाराच्या अनेक फैरी झाडल्यामुळे मतदारांना पळून जावे लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा कुमक तेथे पाठवण्यात आली. अनोळखी सशस्त्र लोकांनी निरनिराळया ठिकाणी एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या निवडणूक एजंटना धमक्या दिल्या आणि त्यांना मतदान केंद्रातून निघून जायला सांगितले.