Manish Sisodia Janpura Assembly Election 2025 Results दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाची २७ वर्षांनी सत्ता येणार हे निश्चित झालं आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे महत्त्वाचे नेते मनिष सिसोदिया यांचा जंगपुरा मतदारसंघातून पराभव झाला आहे. या मतदारसंघात भाजपाच्या तरविंदर सिंग मारवाह यांचा विजय झाला आहे. तर मनिष सिसोदियांचा पराभव झाला आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या फरहाद सुरी उभे होते त्यांना तिसऱ्या क्रमांकाची म्हणजेच ६ हजार ८६६ मतं मिळाली आहेत. मनिष सिसोदिया यांना ३४ हजार ६० मतं मिळाली. तर भाजपाचे सिंग यांना ३४ हजार ६६६ मतं मिळाली आहेत. मी ६०६ मतांनी हरलो आहे. जे जिंकले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. काय घडलं त्याबाबत आत्मपरीक्षण करु असं मनिष सिसोदियांनी म्हटलं आहे.
आम आदमी पक्षाचे मनिष सिसोदिया यांचा पराभव
आम आदमी पक्षाचे मनिष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. तरविंदर सिंग मारवाह या ठिकाणाहून विजयी झाले आहेत. याआधी दोन निवडणुका मनिष सिसोदिया जिंकले होते. त्यांनी पटपडगंजमधून निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र सिसोदियांचा पराभव झाला आहे. त्यांना हरवणारे मारवा २०२२ भाजपात आले होते. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते तसंच माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते. मारवा हे भाजपाच्या शिख नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नेते आहेत.
दोन वेळा आपचा विजय पण..
२०१५ आणि २०२० या दोन्ही निवडणुका आपने जिंकल्या होत्या. २०१३ ला विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. पण ते सरकार ४९ दिवसांत पडलं होतं. त्यानंतर २०१५ आणि २०२० या दोन्ही निवडणुका आपने जिंकल्या होत्या. आता या निवडणुकीत आपचा पराभव झाला आहे. अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन या तिन्ही दिग्गजांचा पराभव झाला आहे.
सध्याच्या कलांनुसार भाजपने दिल्लीत जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आये . आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या हातातून दिल्ली निसटल्याचे चिन्ह दिसत आहे. सध्या दिल्लीत भाजपची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. दिल्लीत भाजप ४८, आप २२ जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस एकाही जागेवर आघाडीवर नाही. त्यामुळे दिल्लीत आपला मोठा धक्का बसला आहे यात शंका नाही