Manoj Jarange Patil Maharashtra Assembly Election 2024 : मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी व विरोधकांना मोठा धक्का दिला होता. मराठा आरक्षणाची लढाई आता त्यांनी अधिकृतपणे राजकीय पटलावर नेण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २० ते ३० जागांवर उमेदवार देऊ अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी राज्यातील २५ जागा निश्चित केल्या. या २५ जागांवर ते त्यांचे उमेदवार जाहीर करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यापैकी १५ मतदारसंघांची त्यांनी रविवारी (३ नोव्हेंबर) रात्री घोषणा केली होती. मनोज जरांगे सोमवारी या १५ जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर करतील असंही सांगण्यात आलं होतं. मात्र आज अचानक त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

बीड, केज, परतूर या विधानसभा मतदारसंघांसह १५ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली जाईल असं मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी आंतरवाली सराटी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केलं होतं. २५ मतदारसंघांबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही बीडची विधानसभा निवडणूक लढवायचं ठरवलं आहे. तसेच मंठा व परतूरमध्येही आमचे उमेदवार असतील. फुलंब्रीसह सध्या १५ मतदारसंघ आम्ही निश्चित केले आहेत. जिथे आमचे उमेदवार नसतील तिथे आम्ही मराठा आरक्षणात अडथळा निर्माण करणाऱ्यांना पाडायचं ठरवलं आहे.

Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
halba community candidates in three constituencies in nagpur against bjp and congress
हलबा समाजाच्या उमेदवारीचा फटका कुणाला? भाजप, काँग्रेसवर नाराजी तीन मतदारसंघात उमेदवार देणार 
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis?
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meet ? : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट? संजय राऊतांचा अमित शाह यांना फोन? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगे यांची माघार

मराठा समाज बांधवांशी आम्ही बरीच चर्चा केली. चर्चा करेपर्यंत पहाटे तीन वाजले. मित्रपक्षांची यादी येणार होती, यादी आली नाही. एका जातीवर लढणं शक्य नाही. अजूनही मित्रपक्षांची यादी आलेली नाही. नाईलाजाने आपण थांबलेलं बरं. आता पाडापाडी करावी लागेल. आपण १३-१४ महिने राजकारण पाहतोय फक्त. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे.

हे ही वाचा >> हलबा समाजाच्या उमेदवारीचा फटका कुणाला? भाजप, काँग्रेसवर नाराजी तीन मतदारसंघात उमेदवार देणार 

मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेले मतदारसंघ

क्र.मंतदारसंघजिल्हा
1बीडबीड
2केजबीड
3परतूरजालना
4फुलंब्रीछत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
5वसमतहिंगोली
6हिंगोलीहिंगोली
7धाराशिवधाराशिव
8कळंबधाराशिव
9भूम-परांडाधाराशिव
10पाचोराजाळगाव
11दौंडपुणे
12पर्वतीपुणेे
13पाथरीपरभणी
14मंठाजालना
15निलंगालातूर

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० ऑक्टोबर रोजी यासंदर्भात भूमिका जाहीर करण्याचे मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी सांगितले होते. परंतु आता यासंदर्भात ३१ ऑक्टोबर रोजी निर्णय घेण्यात येईल आणि या दिवशी निर्णय झाला नाही तर २ नोव्हेंबर रोजी शक्यतो निर्णय जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी बुधवारी आंतरवाली सराटी येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. त्यामुळे राज्यातील विविध मतदारसंघात निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मनात जरांगे यांच्या निर्णयाबाबतची उत्सुकता ताणली गेली होती. तसेच त्यांच्या निर्णयाबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था देखील होती. अखेर त्यांनी निश्चित केलेल्या १५ मतदारसंघांची रविवारी रात्री घोषणा केली.

हे ही वाचा >> Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

फडणवीस मराठा समाजात फूट पाडत आहेत : मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील शनिवारी माध्यमांसमोर म्हणाले की “अलीकडेच ओबीसीमध्ये नवीन सतरा जातींना आरक्षण दिले. मराठा आणि ओबीसी हिंदूच आहेत. त्यामध्ये अर्धे मराठा आहेत. परंतु फडणवीस यांनी मराठा समाजाची दखल घेणयाऐवजी त्यांच्यात आणि ओबीसींमध्ये फूट पाडली”.