2024 Marathwada Assembly Election Result Live Updates: मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली असे आठ जिल्हे आहेत. या आठ जिल्ह्यात विधानसभेचे ४६ मतदारसंघ आहेत. आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त मराठा मते मिळण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळाली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठपैकी सात जागा महायुतीला गमवाव्या लागल्या. महायुतीला छत्रपती संभाजीनगरमधील एकच जागा जिंकण्यात यश आले. मराठवाड्यातून आतापर्यंत चार मुख्यमंत्री राज्याला लाभले आहेत. काँग्रेसचे शिवाजीराव पाटील-निलंगेकर, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण (आता भाजपामध्ये आहेत) हे मुख्यमंत्री झाले होते.
यंदा मराठवाड्यात कोणत्या पक्षाची सरशी होणार? महायुतीला अधिक जागा मिळणार की मविआ लोकसभेप्रमाणेच पुन्हा एकदा मोठा विजय मिळविणार? हे आजच्या निकालावरून समजू शकेल.
Marathwada Assembly Election Results Live Updates | मराठवाडा विधानसभा निवडणूक २०२४ लाईव्ह निकाल अपडेट्स
Marathwada Vidhan Sabha Nivadnuk Result Live: मराठवाड्यातील जातीची गणिते काय आहेत?
मुस्लीम मतदारांच्या रांगा ‘मशाल’ चिन्ह लावलेल्या शिवसेनेच्या शामियानाबाहेर दिसून येत होत्या. याला संभाजीनगर शहरातील औरंगाबाद पूर्व आणि मध्य हे दोन विधानसभा मतदारसंघ अपवाद. संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघात मराठा मतपेढी एकवटली होती. मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांत धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, तसेच नांदेड जिल्ह्यातील चार मतदारसंघांत जातीची गणिते अधिक मजबूत होती, असा दावा केला जात आहे. लातूर जिल्ह्यात काँग्रेस नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांच्यामागे राहिलेली लिंगायत मतपेढी अर्चना पाटील-चाकूरकर यांच्याबरोबर भाजपकडे वळल्याचे दावे केले जात आहेत.
Marathwada Election Results 2024 Live: महाविकास आघाडी मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्यावर विसंबून
लाडकी बहीण योजनेतून मिळणारी रक्कम हा निवडणुकीतील खऱ्या अर्थाने अधिकृत ‘पैसे’ हाच मुद्दा होता. याच काळात उमेदवार देण्यापासून मतदान होईपर्यंत मराठवाड्यात ‘जाती’चे ध्रुवीकरण किती हे मोजले जात होते. महाविकास आघाडी जरांगे यांच्या खांद्यावर विसंबून होती.
Vidhan Sabha Results Live 2024 Maharashtra: विविध सेलिब्रिटींनी स्वतःहून मतदान करत इतरांनाही केले आवाहन
मुंबईमध्ये सेलिब्रेटींनी म्हणजेच विविध क्षेत्रांमध्ये लोकप्रिय-प्रसिध्द असलेल्या व्यक्तींनी मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे आणि सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडावी, यासाठी प्रोत्साहन दिले. क्रिकेटपटू आणि निवडणूक आयोगाचा ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ असलेल्या सचिन तेंडुलकर यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केले आणि इतरांनीही घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. मुंबईतील काही मतदान केंद्रांवर ज्येष्ठ मतदारांचे प्रमाणपत्र आणि रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
Marathwada Election Results 2024: मराठवाड्यातील महत्त्वाचे मुद्दे कोणते?
कृषी समस्येमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी ‘जाती’चा चेहरा पुढे करून आरक्षण आंदोलनात जरांगे यांना नायक केले. जरांगे यांनी आंदोलनातून भरलेला भाजपविरोधी रोष काही मतदारसंघांत विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकला. त्याला सोयाबीनच्या न वाढलेल्या दराची जोड होती. त्याबरोबरच पैसेवाटपाच्या घटनांनी ‘कॅश’ हादेखील मतदानाचा मुद्दा बनवला. ‘कॅश’, ‘कास्ट’ आणि ‘क्रॉप’ हे तिन्ही मुद्दे मराठवाड्यात मतदारांसाठी महत्त्वाचे होते.
Marathwada Assembly polls 2024 Result Live: मराठवाड्याचा इतिहास काय?
मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग मानला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाड्यात १३ महिने हैदराबादच्या निझामाची राजवट होती. १७ सप्टेंबर १९४८ साली मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. आजही मराठवाड्यात सिंचनाची कमतरता आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. ६५ टक्के लोकसंख्या आजही शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. २०२३ साली महाराष्ट्रातील २,८५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी १,०८८ आत्महत्या एकट्या मराठवाड्यातील होत्या. त्यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवारांकडून विकासाचा मुद्दा पुढे करून निवडणूक लढली जाण्याची शक्यता आहे. पण, त्याला मतदार कसा प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल.
Marathwada Vidhan Sabha Election Results 2024: मराठवाड्यात आठपैकी सात लोकसभा मतदारसंघात मविआचा विजय
मराठवाड्यातील आठपैकी सात जागा महायुतीला गमवाव्या लागल्या. काँग्रेसने तीन (लातूर, जालना, नांदेड) तर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने तीन (धाराशिव, परभणी, हिंगोली), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने एका (बीड) जागेवर विजय मिळविला; तर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने छत्रपती संभाजीनगर या एकाच जागेवर विजय मिळविला.
Marathwada Vidhan Sabha Election Results 2024: मराठवाड्यात यंदा पुन्हा जरांगे फॅक्टरची चर्चा
लोकसभा निवडणुकीदरम्यान मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टर जोरदार चालला. आठपैकी सात मतदारसंघात महायुतीचा पराभव झाला. तर छत्रपती संभाजीनगर हा एकच लोकसभा मतदारसंघ महायुतीला मिळाला. यावेळी विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर पाहायला मिळणार का? हे आता निकालातून दिसून येईल.