2024 Marathwada Region Assembly Election Result Highlights Updates: मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली असे आठ जिल्हे आहेत. या आठ जिल्ह्यात विधानसभेचे ४६ मतदारसंघ आहेत. आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त मराठा मते मिळण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळाली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठपैकी सात जागा महायुतीला गमवाव्या लागल्या. महायुतीला छत्रपती संभाजीनगरमधील एकच जागा जिंकण्यात यश आले. मराठवाड्यातून आतापर्यंत चार मुख्यमंत्री राज्याला लाभले आहेत. काँग्रेसचे शिवाजीराव पाटील-निलंगेकर, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण (आता भाजपामध्ये आहेत) हे मुख्यमंत्री झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विधानसभा निवडणुकीत लोकसभेपेक्षा उलट निकाल पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीचे दिग्गज नेते पराभूत झाले आहेत.
Marathwada Assembly Election Results Live Updates | मराठवाडा विधानसभा निवडणूक २०२४ लाईव्ह निकाल अपडेट्स
Rajesh Tope Assembly Election result: करोना वॉरिअर मंत्री राजेश टोपे पराभूत; शरद पवारांना धक्का
करोना काळात आरोग्य मंत्री म्हणून चांगले काम केल्यामुळे राजेश टोपे यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. राजेश टोपे गेल्या अनेक टर्मपासून जालना जिल्ह्याच्या घनसावंगी मतदारसंघात विजय मिळवत होते. मनोज जरांगे पाटील यांचाही त्यांना पाठिंबा होता. मात्र तरीही राजेश टोपे यांना पराभव सहन करावा लागला आहे.
Marathwada Manoj Jarange Factor: मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचं काय झालं? मविआचा मोठा पराभव
लोकसभेला मनोज जरांगे पाटील यांच्या फॅक्टरमुळे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात महाविकास आघाडीचा विजय झाला होता. आठ लोकसभा मतदारसंघापैकी सात मतदारसंघात मविआचा विजय झाला होता. मात्र यावेळी मराठवाड्यात जरांगे पाटील यांचा फॅक्टर चालला की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
Ashti Patota Vidhansabha Election Result: बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा विधानसभेतील भाजपा उमेदवार सुरेश धस विजयी
बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा विधानसभेतील भाजपा उमेदवार सुरेश धस विजयी झाले आहेत. त्यांनी अजित पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब आजबे, अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे आणि शरद पवार गटाचे उमेदवार महेबूब शेख यांचा पराभव झाला आहे.
Marathwada Latur Rural Constituency Dhiraj Deshmukh: मोठी बातमी, धीरज विलासराव देशमुख यांचा पराभव
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा धीरज देशमुख यांचा मोठा पराभव झाला आहे. भाजपाच्या रमेश कराड यांचा विजय झाल्याची माहिती समोर येत आहे.
Nanded Loha Assembly constituency: लोहा विधानसभा मतदारसंघात दोन गटात दगडफेक
नांदेड जिल्ह्याच्या लोहा विधानसभा मतदारसंघात दोन गटात मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक झाली आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी १० हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. तर शिवसेनेचे एकनाथदादा पवार पिछाडीवर आहेत.
Dhiraj Deshmukh : लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख पिछाडीवर
लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे धीरज देशमुख पिछाडीवर आहेत.
औरंगाबाद पूर्व मतदार संघ अपडेट
1. भाजप – अतुल सावे : 34531
2. एमआयएम- इम्तियाज जलील : 72979
3. समाजवादी पार्टी- गफार कादरी : 4844
4. काँग्रेस : लहू शेवाळे : 3999
5. वंचीत: अफसार खान : 1418
13 फेरीनंतर एमआयएमचे इम्तियाज जलील 38,448 मतांनी आघाडीवर
Marathwada Assembly Election Results Live: धनंजय मुंडे यांना मोठी आघाडी मिळाली असून शरद पवार यांचे उमेदवार पिछाडीवर आहेत
धनंजय मुंडे यांना ५० हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाली असून शरद पवार यांचे उमेदवार राजेसाहेब देशमुख पिछाडीवर आहेत.
Marathwada Assembly Election Results Live: लातूरमध्ये देशमुख बंधू पिछाडीवर
लातूरमध्ये देशमुख बंधू पिछाडीवर आहेत. लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख आणि लातूर शहरातून अमित देशमुख पिछाडीवर आहेत. देशमुख कुटुंबियांना हा मोठा धक्का मानला जातो.
Marathwada Assembly Election Results Live: राष्ट्रवादी काँग्रेसची हाराकिरी, राजेश टोपेंसह मोठे नेते पिछाडीवर
मराठवाड्यात महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसत आहे. राज्यभरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केवळ १३ जागांवर आघाडी घेतली आहे.
Nanded Bypoll Election Result 2024 : सहानुभूतीचा फायदा काँग्रेसला होणार का ? अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला!
Nanded Bypoll Election Result 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणीला सुरुवात झाली आहे.तर दुसरीकडे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली आहे. या निकालानंतर मराठवाड्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघातील मतदार भाजप की काँग्रेस नेमकं कोणाच्या बाजूने कौल देते हे स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर पोटनिवडणुकीत मतदार भाजपा उमेदवाराला संधी देतात की पुन्हा काँग्रेसचा उमेदवार निवडणुक आणतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (वाचा सविस्तर बातमी)
Marathwada Assembly Election Results Live: धनंजय मुंडे, तानाजी सावंत, इम्तियाज जलील यांची आघाडी; मविआचे उमेदवार पिछाडीवर
धनंजय मुंडे, तानाजी सावंत, इम्तियाज जलील यांनी मराठवाड्यातून आघाडी घेतली आहे. तर मविआचे उमेदवार पिछाडीवर आहेत. अमित देशमुखही पिछाडीवर आहेत.
Marathwada Assembly Election Results Live: कालीचरण यांचे विधान भोवले, शिंदे गटाचे संजय शिरसाट पिछाडीवर
स्वयंघोषित महाराज यांनी संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात वादग्रस्त विधान केले होते. आता संजय शिरसाट पिछाडीवार आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल कुठे पाहू शकाल? जाणून घ्या
महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. ही निवडणूक खूप चुरशीची झाली आहे. निवडणुकीचा निकाल पाहा एका क्लिकवर
Marathwada Region Election Results Live: मराठवाड्यातून तानाजी सावंत, धनंजय मुंडे आणि संतोष दानवे
मराठवाड्यातून आता ताजे कल समोर आले असून तानाजी सावंत, धनंजय मुंडे आणि संतोष दानवे हे आघाडीवर आले आहेत.
Marathwada Assembly Election Results Live: भूम-परंडामधून शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत पिछाडीवर, मविआचे राहुल मोटे आघाडीवर
धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा विधानसभा मतदारसंघातील कॅबिनेट मंत्री आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते तानाजी सावंत पिछाडीवर आहेत.
Parli Vidhansabha Election Live: परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे जागा राखणार का?
परळी विधानसभेत अटीतटीचा लढा होत आहे. महायुतीचे धनंजय मुंडे आणि महाविकास आघआडीचे राजेसाहेब देशमुख यांच्यात संघर्ष होत आहे. सविस्तर बातमी वाचा
Marathwada Assembly Election Results Live: औरंगाबादमध्ये अतुल सावे आघाडीवर, इतर जागांवर चित्र काय आहे?
औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार अतुल सावे हे आघाडीवर आहेत.
Marathwada Assembly Election Results Live: अवघ्या पाच मिनिटांत राज्याच्या २८८ मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात
अवघ्या पाच मिनिटांत राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आधी पोस्टल मतदानाची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतमोजणीला सुरुवात होईल.
Marathwada Assembly Election Results Live: घनसावंगी विधानसभा मतदासंघात राजेश टोपे पुन्हा एकदा विजय मिळविणार?
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात असलेला घनसावंगी विधानसभा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) नेते राजेश टोपे यांच्या कुटुंबियांचे वचर्स्व राहिलं आहे. सविस्तर बातमी वाचा
Maharashtra Assembly Election Result Live: महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर
महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातील मतमोजमीच्या निकाल पाहा एका क्लिकवर
Marathwada Vidhan Sabha Election Result Live: थोड्याच वेळात सुरू होणार मतमोजणी
मराठवाड्यात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मराठवाड्यात कोण बाजी मारणार? हे थोड्याच वेळात कळेल.
Marathwada Vidhan Sabha Nivadnuk Result Live: मराठवाड्यात महिला मतदारांनी केले सर्वाधिक मतदान
मराठवाड्यात सर्वाधिक मतदान सिल्लोड मतदारसंघात ८०.०१ टक्के एवढे नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे या मतदारसंघात एक लाख ३६ हजार ९५ महिलांनी मतदानाचा हक्क बजावत सर्वाधिक ७९.४१ टक्के मतदान नोंदवले. पैठण, वैजापूर या शिवसेनेतील फूट पडलेल्या मतदारसंघातील महिला मतदारांचे प्रमाण अनुक्रमे ७५.७६ व ७४.१४ टक्के असल्याचे दिसून आले आहे.
Marathwada Vidhan Sabha Nivadnuk Result Live: छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची शिविगाळ
संभाजीनगर शहरातील पश्चिमचे उमेदवार संजय शिरसाट यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या शहराध्यक्षांना धमकी दिल्याचे छायाचित्रण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समाजमाध्यमांमध्ये प्रसारित केले.
Marathwada Vidhan Sabha Nivadnuk Result Live: बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाच्या दिवशी राडे
मराठवाड्यातील बीड व संभाजीगर जिल्ह्यात बाचाबाची, कार्यकर्त्यांच्या दोन गटांत हाणामारींबरोबर बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथे मतदान यंत्र फोडण्याचा प्रयत्न झाला. तसेच परळी मतदारसंघातील धर्मापुरी येथे ओबीसी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येऊच दिले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला. बीड जिल्ह्यातील हाणामाऱ्यांच्या प्रकारामुळे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हेही सत्ताधाऱ्यांना मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला.
Marathwada Vidhan Sabha Nivadnuk Result Live: मराठवाड्यातील जातीची गणिते काय आहेत?
मुस्लीम मतदारांच्या रांगा ‘मशाल’ चिन्ह लावलेल्या शिवसेनेच्या शामियानाबाहेर दिसून येत होत्या. याला संभाजीनगर शहरातील औरंगाबाद पूर्व आणि मध्य हे दोन विधानसभा मतदारसंघ अपवाद. संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघात मराठा मतपेढी एकवटली होती. मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांत धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, तसेच नांदेड जिल्ह्यातील चार मतदारसंघांत जातीची गणिते अधिक मजबूत होती, असा दावा केला जात आहे. लातूर जिल्ह्यात काँग्रेस नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांच्यामागे राहिलेली लिंगायत मतपेढी अर्चना पाटील-चाकूरकर यांच्याबरोबर भाजपकडे वळल्याचे दावे केले जात आहेत.
Marathwada Election Results 2024 Live: महाविकास आघाडी मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्यावर विसंबून
लाडकी बहीण योजनेतून मिळणारी रक्कम हा निवडणुकीतील खऱ्या अर्थाने अधिकृत ‘पैसे’ हाच मुद्दा होता. याच काळात उमेदवार देण्यापासून मतदान होईपर्यंत मराठवाड्यात ‘जाती’चे ध्रुवीकरण किती हे मोजले जात होते. महाविकास आघाडी जरांगे यांच्या खांद्यावर विसंबून होती.
Vidhan Sabha Results Live 2024 Maharashtra: विविध सेलिब्रिटींनी स्वतःहून मतदान करत इतरांनाही केले आवाहन
मुंबईमध्ये सेलिब्रेटींनी म्हणजेच विविध क्षेत्रांमध्ये लोकप्रिय-प्रसिध्द असलेल्या व्यक्तींनी मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे आणि सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडावी, यासाठी प्रोत्साहन दिले. क्रिकेटपटू आणि निवडणूक आयोगाचा ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ असलेल्या सचिन तेंडुलकर यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केले आणि इतरांनीही घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. मुंबईतील काही मतदान केंद्रांवर ज्येष्ठ मतदारांचे प्रमाणपत्र आणि रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
Marathwada Election Results 2024: मराठवाड्यातील महत्त्वाचे मुद्दे कोणते?
कृषी समस्येमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी ‘जाती’चा चेहरा पुढे करून आरक्षण आंदोलनात जरांगे यांना नायक केले. जरांगे यांनी आंदोलनातून भरलेला भाजपविरोधी रोष काही मतदारसंघांत विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकला. त्याला सोयाबीनच्या न वाढलेल्या दराची जोड होती. त्याबरोबरच पैसेवाटपाच्या घटनांनी ‘कॅश’ हादेखील मतदानाचा मुद्दा बनवला. ‘कॅश’, ‘कास्ट’ आणि ‘क्रॉप’ हे तिन्ही मुद्दे मराठवाड्यात मतदारांसाठी महत्त्वाचे होते.