2024 Marathwada Region Assembly Election Result Highlights Updates: मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली असे आठ जिल्हे आहेत. या आठ जिल्ह्यात विधानसभेचे ४६ मतदारसंघ आहेत. आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त मराठा मते मिळण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळाली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठपैकी सात जागा महायुतीला गमवाव्या लागल्या. महायुतीला छत्रपती संभाजीनगरमधील एकच जागा जिंकण्यात यश आले. मराठवाड्यातून आतापर्यंत चार मुख्यमंत्री राज्याला लाभले आहेत. काँग्रेसचे शिवाजीराव पाटील-निलंगेकर, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण (आता भाजपामध्ये आहेत) हे मुख्यमंत्री झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विधानसभा निवडणुकीत लोकसभेपेक्षा उलट निकाल पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीचे दिग्गज नेते पराभूत झाले आहेत.

Live Updates

Marathwada Assembly Election Results Live Updates | मराठवाडा विधानसभा निवडणूक २०२४ लाईव्ह निकाल अपडेट्स

23:48 (IST) 22 Nov 2024

Marathwada Assembly polls 2024 Result Live: मराठवाड्याचा इतिहास काय?

मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग मानला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाड्यात १३ महिने हैदराबादच्या निझामाची राजवट होती. १७ सप्टेंबर १९४८ साली मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. आजही मराठवाड्यात सिंचनाची कमतरता आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. ६५ टक्के लोकसंख्या आजही शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. २०२३ साली महाराष्ट्रातील २,८५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी १,०८८ आत्महत्या एकट्या मराठवाड्यातील होत्या. त्यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवारांकडून विकासाचा मुद्दा पुढे करून निवडणूक लढली जाण्याची शक्यता आहे. पण, त्याला मतदार कसा प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल.

23:23 (IST) 22 Nov 2024

Marathwada Vidhan Sabha Election Results 2024: मराठवाड्यात आठपैकी सात लोकसभा मतदारसंघात मविआचा विजय

मराठवाड्यातील आठपैकी सात जागा महायुतीला गमवाव्या लागल्या. काँग्रेसने तीन (लातूर, जालना, नांदेड) तर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने तीन (धाराशिव, परभणी, हिंगोली), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने एका (बीड) जागेवर विजय मिळविला; तर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने छत्रपती संभाजीनगर या एकाच जागेवर विजय मिळविला.

22:55 (IST) 22 Nov 2024

Marathwada Vidhan Sabha Election Results 2024: मराठवाड्यात यंदा पुन्हा जरांगे फॅक्टरची चर्चा

लोकसभा निवडणुकीदरम्यान मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टर जोरदार चालला. आठपैकी सात मतदारसंघात महायुतीचा पराभव झाला. तर छत्रपती संभाजीनगर हा एकच लोकसभा मतदारसंघ महायुतीला मिळाला. यावेळी विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर पाहायला मिळणार का? हे आता निकालातून दिसून येईल.

विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात कोणता पक्ष बाजी मारणार? (Photo – Loksatta Graphics)<br />