देशभरातील १०२ लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया सुरू असून सर्वठिकाणी कायदा सुव्यस्था राखण्यासाठी निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था केली आहे. परंतु, तरीही काही ठिकाणी मतदानाला गालबोट लागत आहे. उत्तर प्रदेशात आज आठ ठिकाणी मतदान असून कैराना येथील मतदान केंद्रात मस्लिम महिला मतदारांबरोबर गैरव्यवहार झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजवादी पक्षाने पोलिसांवर आरोप केला आहे. मुस्लिम महिलांना मतदान करण्यापासून पोलीस रोखत असल्याचं समाजवादी पक्षाने म्हटलं आहे. कैराना मतदारसंघातील शामली येथील बूथ क्रमांक ४४७ मध्ये पोलीस मुस्लीम मतदारांशी गैरवर्तन करत असून त्यांना मतदान करण्यापासून रोखत आहेत, असं सपाच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे निष्पक्ष मतदान व्हावे यासाठी पक्षाने निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली.

याव्यतिरिक्त, सपाने सांगितले की कैराना नगर इस्लामिया इंटर कॉलेजमध्ये मतदान संथ गतीने सुरू आहे, जाणीवपूर्वक मतदान प्रक्रिया मंदावली असल्याचाही सपाने प्रशासनावर आरोप केला. पक्षाने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये बुरखा घातलेल्या मुस्लिम महिला कैराना नगर इस्लामिया इंटर कॉलेजमध्ये मतदान करण्यासाठी येत आहेत. व्हिडिओमध्ये महिला पोलिस कर्मचारी मुस्लिम महिलांची ओळख तपासतानाही दिसत आहेत, काही अधिकारी तपासणीसाठी महिलेचा बुरखा उचलताना दिसत आहेत.

हेही वाचा >> Lok Sabha Election 2024 Phase 1 Live : मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार, बचावासाठी मतदारांची धावाधाव

उत्तर प्रदेशमधील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील सहारनपूर, कमाना, मुझफ्फरनगर, बिजनौर, नगीना, मुरादाबाद, रामपूर आणि पिलीभीत या आठ मतदारसंघांमध्ये सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. विविध ठिकाणांहून ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mistreatment of muslim voters in kairana constituency sp alleges sharing video sgk