पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टाने मध्य प्रदेशासह राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. भाजपाने मध्य प्रदेशातील सत्ता कायम राखत राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन नवीन राज्य आपल्या आपल्या ताब्यात घेतली. काँग्रेसला केवळ तेलंगणा राज्यात यश मिळालं आहे. तेलंगणात काँग्रेसने ६५ जागा जिंकल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर आज मिझोराम विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या राज्यातही भाजपा काँग्रेसला वरचढ ठरली आहे. मिझोराममध्ये भाजपाने दोन जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं. भाजपाने सैहा आणि पलक मतदारसंघातून विजय मिळवला. तर काँग्रेसने लाँगटलाई वेस्ट मतदारसंघातून विजय संपादन केला.

विशेष म्हणजे मिझोराममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट, मिझो नॅशनल फ्रन्ट आणि काँग्रेस पक्षात त्रिशंकू लढत होण्याची अपेक्षा होती. पण या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सपशेल अपयश आलं आहे. २०१८ मधील खराब कामगिरीनंतर काँग्रेस पुनरागमन करेल, अशी आशा होती. पण मिझोराममध्ये तुलनेनं कमी राजकीय ताकद असलेल्या भाजपाने दोन जागा जिंकल्या. येथे झोरम पीपल्स मूव्हमेंटने (झेडपीएम) ४० पैकी २७ जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. राज्यातील सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रन्टला (एमएनएफ) केवळ १० जागांवर समाधान मानावं लागलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mizoram election result 2023 bjp won 2 seats and congress won 1 rmm