Mizoram Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023: मिझोराम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. येथे झोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम), मिझो नॅशनल फ्रन्ट आणि काँग्रेस अशा तीन पक्षांत त्रिशंकू लढतीची अपेक्षा होती. पण मिझोराममध्ये काँग्रेसला अद्याप भोपळाही फोडता आला नाही. काँग्रेसचा एक उमेदवार आघाडीवर आहे. तर झोरम पीपल्स मूव्हमेंटने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा गाठला आहे. झेडपीएमने २५ जागांवर विजय संपादन केला असून २ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे राज्यात सत्तापालट होणार हे निश्चित झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या विजयाच्या पार्श्वभूमीवर झेडपीएमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार लालदुहोमा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येत्या दोन दिवसांत मी सत्तास्थापनेसाठी दावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवरही भाष्य केलं. शिवाय राज्यातील आले, हळद, मिरची आणि बांबू अशा पिकांसाठी किमान आधारभूत किंमत लागू करणार असल्याचा मानसही बोलून दाखवला.

‘एनआयए’ला दिलेल्या प्रतिक्रियेत लालदुहोमा म्हणाले, “जसं आपल्याला माहीत आहे की, मिझोराम हे आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आर्थिक स्थिती खूपच वाईट आहे. सत्तेबाहेर जाणाऱ्या सरकारकडून आम्हाला हेच मिळणार आहे. पण आम्ही आमची वचनबद्धता पूर्ण करणार आहोत. राज्यात आर्थिक सुधारणा आवश्यक आहेत. आले, हळद, मिरची आणि बांबू अशा पीकांसाठी आम्ही किमान अधारभूत किंमत लागू करणार आहोत.”

“राज्याची आर्थिक स्थिती बिकट असली तरी आतापासूनची आम्ही आमच्या पक्षाने दिलेल्या आश्वसनांची पूर्तता करणं सुरू करणार आहोत. हेच आमचं पहिलं प्राधान्य आहे. तसेच आर्थिक सुधारणा करण्यासाठी आम्ही ‘रिसोर्स मोबिलायझेशन टीम’ बनवणार आहोत”, असंही लालदुहोमा म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mizoram election result 2023 zpm crossed majority chief minister candidate lalduhoma first reaction rmm