Mizoram Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023: मिझोराम विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. झोरम पीपल्स मूव्हमेंटने (झेडपीएम) मोठा विजय संपादन करत ४० पैकी २७ जागांवर विजय मिळवला आहे. राज्यातील सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रन्टला (एमएनएफ) केवळ १० जागांवर समाधान मानावं लागलं. दुसरीकडे, भाजपालाही २ जागांवर यश मिळालं आहे. तर काँग्रेसला केवळ एकच जागा मिळवता आली. राज्यस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडनंतर काँग्रेसला मिझोराममध्येही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे मिझोराममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट, मिझो नॅशनल फ्रन्ट आणि काँग्रेस पक्षात त्रिशंकू लढत होण्याची अपेक्षा होती. पण या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सपशेल अपयश आलं आहे. २०१८ मधील खराब कामगिरीनंतर काँग्रेस पुनरागमन करण्याची आशा होती. मिझोराममध्ये तुलनेनं कमी राजकीय ताकद असलेल्या भाजपाने दोन जागा जिंकल्या आहेत.

झेडपीएमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार लालदुहोमा यांनी सेरछिप मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. तर दक्षिण तुइपुई मतदारसंघात राज्याचे विद्यमान आरोग्य मंत्री आणि MNF चे उमेदवार आर लालथांगलियाना यांचा झेडपीएमच्या जेजे लालपेख्लुआ पराभव केला आहे. झेडपीएमचे लालनघिंग्लोवा ह्मर हे ऐझॉल पश्चिम-२ मतदारसंघात विजयी झाले. याशिवाय तुईचांगमध्ये झेडपीएमचे उमेदवार डब्लू. छुआनवमा यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री तवन्लुइया यांचा पराभव केला.

१९८७ मध्ये मिझोरामला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर राज्यात काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रन्टने (MNF) राजकीय वर्चस्व गाजवलं. १९९८ च्या विधानसभा निवडणुकीत एमएनएफने काँग्रेसचा पराभव केला. मिझोराममधील १० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवून लावत झोरमथांगा हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. सलग दहा वर्षे सत्ता राखल्यानंतर २००८ आणि २०१३ च्या निवडणुकीत काँग्रेसने एनएफएफचा पराभव केला. त्यानंतर २०१८ मध्ये मिझो नॅशनल फ्रन्टने पुन्हा काँग्रेसचा पराभव करत सत्ता मिळवली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mizoram election result 2023 zpm won 27 seats out of 40 mnf won 10 seats rmm