Shivsena UBT Letter to Election Commission Agaisnt Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दीपोत्सव साजरा केला जातो. या पार्कवर रोषणाई करून सेल्फी पॉइंट्स उभारले जातात. येथे फोट शूट करण्याकरता आणि स्नेहभेट घेण्याकरात अवघी मुंबापुरी उपस्थित राहते. परंतु, आता आचारसंहिता काळातही हा दीपोत्सव साजरा होत असल्याने शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठवून कारवाई करण्याच आवाहन केले आहे.

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उपसचिव सचिन परसनाईक यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त पत्र लिहिलंय. त्या पत्रात म्हटलंय की, “महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक २०२४ ची घोषणा झाली आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असतानाही बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क या महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक स्थळावर निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून ‘दीपोत्सव’ साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे सर्वत्र बॅनर, गेट व कंदिल लावण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक मालमत्ता विरूप करण्याच्या कलमाखाली हा सरळसरळ नियमभंग आहे.”

Pimpri Vidhan Sabha, Sharad Pawar candidate,
पिंपरी विधानसभा : ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बंडाचा इशारा दिल्यानंतर शरद पवारांच्या उमेदवार काय म्हणाल्या? वाचा..
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
What Kiran Pavasakar Said About Uddhav Thackeray?
Shivsena Vs MNS : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबरचं नातं जपायला हवं होतं आणि…”, ‘या’ नेत्याची बोचरी टीका!
Maharashtra elections
अमित ठाकरेंविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमदेवारी; माहीममध्ये होणार तिरंगी लढतं!
Know About Amit Thackeray political Career
Amit Thackeray : ‘राज’पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच लढवणार निवडणूक, जाणून घ्या कसा आहे राजकीय प्रवास ?
MNS Second List Announced
MNS List : मनसेने जाहीर केली उमेदवारांची यादी, अमित ठाकरे माहीममधून, तर वरळीतून आदित्य ठाकरेंना ‘हा’ उमेदवार देणार आव्हान
shivsena uddhav Thackeray
‘चिंचवड’ची जागा शिवसेना ठाकरे पक्षाला? तर, पिंपरी आणि भोसरी….
shivsena Thackeray faction
सांगोल्याचे राजकारण ‘सांगली पॅटर्न’च्या दिशेने! शेकापच्या बालेकिल्ल्यावर ठाकरे गटाचा दावा

हेही वाचा >> Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!

“तसेच या कार्यक्रमाच्या उद्घटनावेळी स्थानिक माहिम विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार अमित राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे नियमानुसार उमेदवाराच्या निवडणूक खर्चात अंतर्भूत करणारी बाब ठरत असल्याने संपूर्ण दीपोत्सवाचा खर्च हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहिम विधानसभा उमेदवार अमित राज ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा”, अशी मागणीही शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने केली. “तसेच आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक जागांवर पक्षाच्या प्रचारात बेकायदेशीर परवानगी देण्याचा महापालिका अधिकारी व इतर संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी यावर भारत निवडणूक आयोगाने सख्त कारवाईचे निर्देश द्यावेत”, अशी मागणीही पत्राद्वारे त्यांनी केली.

अमित ठाकरे अडचणीत येणार?

दरम्यान, अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून यंदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात दोन्ही शिवसेनेचं तगडं आव्हान आहे. शिंदेसेनेकडून सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या सेनेतून महेश सावंत यांची लढत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होईल. त्यातच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने अमित ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे कुरघोडी केल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.