MNS List : मनसेने जाहीर केली उमेदवारांची यादी, अमित ठाकरे माहीममधून, तर वरळीतून आदित्य ठाकरेंना ‘हा’ उमेदवार देणार आव्हान

आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेतून कोणाला देण्यात आली संधी?

MNS Second List Announced
मनसेची विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर (फोटो-राज ठाकरे, एक्स पेज)

MNS List अविनाश जाधव आणि राजू पाटील यांची उमेदवारी राज ठाकरेंनी सोमवारी जाहीर केली होती. त्यानंतर लवकरच दुसरी यादी येईल असं त्यांनी सांगितलं होतं. ज्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत एकूण ४५ नावं आहेत.

विधानसभेसाठी मनसेची यादी
१) राजू पाटील- कल्याण पाटील
२) अमित ठाकरे -माहीम
३) शिरीष सावंत-भांडुप
४) संदीप देशपांडे-वरळी
५) अविनाश जाधव-ठाणे शहर
६) संगिता चेंदवणकर -मुरबाड
७) किशोर शिंदे- कोथरुड
८) साईनाथ बाबर-हडपसर
९) मयुरेश वांजळे- खडकवासला
१०) प्रदीप कदम-मागाठाणे
११) कुणाल माईणकर-बोरीवली
१२) राजेश येरुणकर-दहिसर
१३) भास्कर परब-दिंडोशी
१४) संदेश देसाई-वर्सोवा
१५) महेश फरकासे-कांदिवली पूर्व
१६) वीरेंद्र जाधव -गोरेगांव
१७) दिनेश साळवी-चारकोप
१८) भालचंद्र अंबुरे- जोगेश्वरी पूर्व
१९) विश्वजीत ढोलम-विक्रोळी
२०) गणेश चुक्कल- घाटकोपर पश्चिम
२१) संदीप कुलथे-घाटकोपर पूर्व
२२) माऊली थोरवे-चेंबूर
२३) जगदीश खांडेकर-मानखुर्द-शिवाजीनगर
२४) निलेश बाणखेले-ऐरोली
२५) गजानन काळे-बेलापूर
२६) सुशांत सूर्यराव-मुंब्रा-कळवा
२७) विनोद मोरे- नालासोपारा
२८) मनोज गुळवी-भिवंडी-पश्चिम
२९) संदीप राणे – मिरा भाईंदर
३०) हरिश्चंद्र खांडवी- शहापूर
३१) महेंद्र भानुशाली-चांदिवली
३२) प्रमोद गांधी-गुहागर
३३) रविंद्र कोठारी-कर्जत-जामखेड
३४) कैलास दरेकर-आष्टी
३५) मयुरी म्हस्के-गेवराई
३६) शिवकुमार नगराळे-औसा
३७) अनुज पाटील-जळगाव
३८) प्रवीण सूर- वरोरा
३९) रोहन निर्मळ- कागल
४०) वैभव कुलकर्णी- तासगांव-कवठे महाकाळ
४१) महादेव कोनगुरे-सोलापूर दक्षिण
४२) संजय शेळके-श्रीगोंदा
४३) विजयराम किनकर-हिंगणा
४४) आदित्य दुरुगकर-नागपूर दक्षिण
४५) परशुराम इंगळे-सोलापूर शहर, उत्तर

मनसेच्या यादीची खासियत काय?

मनसेने दुसऱ्या यादीत एकूण ४५ जणांना तिकिट दिलं आहे. मनसे महाराष्ट्रातल्या २८८ पैकी जवळपास २०० ते २२५ जागा लढवणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या तालमीत तयार झाल्यानंतर आता या विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे माहीम या विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावणार आहेत. मनसेने आणखी एक प्रयोग केला आहे तो म्हणजे वरळीतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. मागच्या निवडणुकीला म्हणजेच २०१९ ला मनसेने आदित्य ठाकरे शिवसेनेकडून उभे असल्याने वरळीत उमेदवार दिला नव्हता. मात्र यावेळी आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडेंचं आव्हान असणार आहे. तसंच या ठिकाणी भाजपा किंवा शिवसेनेचा (एकनाथ शिंदे) उमेदवार असणार आहे. त्यामुळे वरळीतली लढत तिरंगी होईल हे नक्की.

भाजपाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातही मनसेचा उमेदवार. कोथरुड या ठिकाणाहून मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. येत्या काळात राज ठाकरे काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राज ठाकरेंनी आज यादी येणार हे जाहीर केलं होतं त्यानुसार मनसेची दुसरी यादी जाहीर झाली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns list for vidhan sabha election in maharashtra amit thackeray contest poll from mahim scj

First published on: 22-10-2024 at 22:21 IST
Show comments