भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत आहेत. आज नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कणकवलीत जाहीर सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यासह विनायक राऊत यांच्यावर टीका केली. ‘नुसतं बाकावर बसणारे खासदार पाहिजे की, केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे’, असा टोला राज ठाकरे यांनी विनायक राऊत यांना लगावला. तसेच राज ठाकरे यांनी यावेळी नारायण राणे यांचे कौतुकही केले.

राज ठाकरे काय म्हणाले?

“बाकीचे राज्य विकासात पुढे चालले आहेत. खरे तर कोकणात अनेक कारखाने यायला हवेत. मी नारायण राणे यांना आवाहन करतो, कोकणात फक्त हॉटेल आणि इंग्लिश कोचिंग क्लासेस आणा. कोणीही केरळ आणि गोव्याला जाणार नाही. सर्वजण येथे येतील. नारायण राणे यांना मुख्यमंत्री असताना जेवढा वेळ मिळाला त्यामध्ये त्यांनी झपाट्याने कामे केली होती. जर पाच वर्षांचा कालावधी त्यांना मिळाला असता तर आज प्रचारासाठी कोणाला यायची गरज पडली नसती”, असे राज ठाकरे म्हणाले.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : “नरेंद्र मोदी सरकारमुळेच…”, राम मंदिराबाबत राज ठाकरेंचं मोठं विधान; नारायण राणेंच्या सभेत उद्धव ठाकरेंवरही डागली तोफ!

“कामाचा सपाटा लावणे आणि झपाटल्या सारखे काम करणे काय असते? ते नारायण राणे यांच्याकडे बघून कळेल. बाळासाहबे ठाकरे हे नेहमी सांगायचे की अंतुले यांच्यानंतर जर कामाचा सपाटा लावणारे कोणी असेल तर नारायण राणे आहेत. नारायण राणे यांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्रिपद हाताळले हे भल्याभल्यांना जमले नाही”, अशा शब्दात राज ठाकरे यांनी कणकवलीत सभेत बोलताना नारायण राणे यांचे कौतुक केले.

राज ठाकरेंचा विनायक राऊतांना टोला

“एखादा विषय समजून घेणे आणि त्याची हाताळणी करणे, त्याची अंमलबजावणी करणे, हे ज्या माणसाला कळते आज तो माणूस तुमच्यासमोर खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा आहे. माजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला आवाहन की यांना निवडून द्या. मात्र, एक प्रश्नही आहे. तुम्हाला नुसता बाकडावर बसणारा खासदार पाहिजे की, केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे. ज्यावेळी नरेंद्र मोदी यांचे सरकार येईल, त्यांच्या मंत्रिमंडळात नारायण राणे हे पुन्हा एकदा मंत्री असतील”, असे राज ठाकरे म्हणाले.

Story img Loader