Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर आज (२३ नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आहे. तर, महाविकास आघाडीसह इतर सर्वच पक्षांचा सुपडा साफ झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी अटीतटीची लढत होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, निकालात तशी काही स्थिती पाहायला मिळाली नाही. महायुतीने तब्बल २३६ जगा जागा निवडून आणल्या आहेत. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळाली नाही. पक्षस्थापननेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत (२००९) या पक्षाचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र, २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत या पक्षाचा केवळ एकेक आमदार निवडून आला होता. यंदा मनसेने १२८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तसेच मनसेने अनेक मतदारसंघात महायुतीशी साटंलोटं केलं होतं. तसेच राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचारकाळात महायुतीवर कोणत्याही प्रकारची टीका केली नाही. महायुतीच्या साथीने मनसे यंदा किमान ५ ते १० जागा जिंकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत जिंकलेले मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यंचा यंदा कल्याण ग्रामीण या मतदारसंघात दारुण पराभव झाला आहे. या पराभवानंतर त्यांनी दोन वाक्यात त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये जनतेला उद्देशून म्हटलं आहे की “निकाल येतील जातील… आपलं प्रेम, आपले ऋणानुबंध कायम राहतील. गेली ५ वर्ष तुम्ही अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रेम दिलंत, निवडणुकीचा निकाल अनपेक्षित असला तरी तो स्वीकारायलाच हवा. तुमची ‘राजूदादा’ ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती. माझ्या प्रामाणिक प्रयत्नांची ती खरी पोचपावती असते. माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या प्रत्येक मतदाराचे आणि माझ्यासाठी अहोरात्र मेहनत केलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.आपला, प्रमोद (राजू) रतन पाटील.”

भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Vijay Vadettiwar statement regarding the Leader of the Opposition Nagpur news
सरकारला विरोधी पक्षनेता हवा असेल तरच नाव देऊ -वडेट्टीवार
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

हे ही वाचा >> Mumbai Konkan Region Election Results 2024 Live Updates : शपथविधीची तारीख व ठिकाणही ठरलं, मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित जागेची निवड

राज ठाकरेंचा करीश्मा चालला नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल १२८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरे म्हणाले होते की कोणत्याही परिस्थितीत मनसे सत्तेत बसेल म्हणजे बसेल. महायुतीच्या पाठिंब्याने राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री बसेल, असंही ते म्हणाले होते. त्यांनी राज्यातील जनतेला एकहाती सत्ता देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जनतेने त्यांच्या एकाही उमेदवाराला विजय मिळेल इतकं मतदान केलं नाही.

राज ठाकरे यांच्या मुलाचा पराभव

माहीम विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली. या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेले. त्यांना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महेश सावंत आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे आव्हान होते. हे आव्हान त्यांना पेलवता आले नाही. कारण त्यांचे निवासस्थान असलेल्या या मतदारसंघातून त्यांचा दारूण पराभव झाला.

Story img Loader