Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर आज (२३ नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आहे. तर, महाविकास आघाडीसह इतर सर्वच पक्षांचा सुपडा साफ झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी अटीतटीची लढत होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, निकालात तशी काही स्थिती पाहायला मिळाली नाही. महायुतीने तब्बल २३६ जगा जागा निवडून आणल्या आहेत. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळाली नाही. पक्षस्थापननेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत (२००९) या पक्षाचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र, २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत या पक्षाचा केवळ एकेक आमदार निवडून आला होता. यंदा मनसेने १२८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तसेच मनसेने अनेक मतदारसंघात महायुतीशी साटंलोटं केलं होतं. तसेच राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचारकाळात महायुतीवर कोणत्याही प्रकारची टीका केली नाही. महायुतीच्या साथीने मनसे यंदा किमान ५ ते १० जागा जिंकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा