एनडीएप्रणित सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी पार पडला आहे. या मंत्रिमंडळात राज्य मंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून एकूण ७१ जणांची वर्णी लागली आहे. शिवसेनेच्या वाट्याचं केंद्रीय मंत्रिपद आलं आहे ते प्रतापराव जाधव यांना देण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिपदी श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागेल असंच सगळ्यांना वाटलं होतं. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्री पद मिळालं आहे. बाजार समितीतले आडत व्यापारी ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

मेहकर विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा आमदार झालेले तसंच राज्याच्या मंत्रिमंडळात क्रीडा युवक कल्याण आणि पाटबंधारे राज्यमंत्री ही खाती त्यांनी सांभाळली आहेत. आडत व्यापारी ते केंद्रीय मंत्री हा त्यांचा प्रवास कसा आहे जाणून घेऊ.

congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Maharashtra FM Ajit Pawar on state budget
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडक्या बहिणी’, सामान्य नागरिक केंद्रबिंदू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

कोण आहेत प्रतापराव जाधव?

प्रतापराव जाधव यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९६० या दिवशी बुलढाण्यातल्या मेहेकर तालुक्यात असलेल्या अंजनी बुद्रूक या गावी झाला. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मेहकर बाजार समितीत ते आडत व्यापारी म्हणूनही काम करत असत. त्यावेळी त्यांनी बाजार समितीत पॅनल उभे केले आणि तिथली सत्ता ताब्यात घेतली. शिवसेनेचे जिल्ह्यातले नेते दिलीप रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापराव जाधव यांनी राजकारणाला सुरुवात केली. १९९५ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर मेहेकरमध्ये त्यांनी त्यांच्या कामाने त्यांचा दबदबा वाढवला. १९९९ आणि २००४ या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्येही ते आमदार झाले.

हे पण वाचा- Narendra Modi Swearing-in Ceremony Updates: “…म्हणून केंद्रीय मंत्रीपद नाकारलं”, श्रीकांत शिंदेंनी सांगितलं कारण; उद्धव ठाकरेंना लगावला टोला!

प्रतापराव जाधव चौथ्यांदा खासदार

त्यानंतर चौथ्या टर्ममध्येही त्यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. बाळासाहेब ठाकरेंपासून लोकसभा मतदारसंघात त्यांची ख्याती होतीच. खासदारकी आणि आमदारकी दोहोंमध्ये त्यांनी हॅट ट्रिक मारलीच. २०१९ नंतर २०२४ मध्ये प्रतापराव पुन्हा लोकसभेची निवडणूक जिंकले. खासदार म्हणून ही त्यांची चौथी टर्म आहे. विदर्भातल्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.

बुलढाणा जिल्ह्याला खा. प्रतापराव जाधव यांच्या रुपाने तिसऱ्यांना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळाले आहे. यापूर्वी सर्वप्रथम मुकूल वासनिक हे १९९० च्या दशकात केंद्रामध्ये क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री बनले होते. त्यानंतर २००२ मध्ये केंद्रातील एनडीएच्या सरकारमध्ये एकसंघ शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे केंद्रीय अर्थराज्यमंत्री बनले होते. त्यानंतर आता प्रतापराव जाधवांच्या रुपाने जिल्ह्याला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळण्याचा तिसऱ्यांदा बहुमान मिळाला आहे.

प्रतापराव जाधव यांची राजकीय वाटचाल कशी आहे जाणून घ्या

१९८८ ते १९९२- मेहकर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष

१९९३-मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती

१९९५-मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार

१९९७ ते १९९८ या कालावधीत क्रीडा, पाटबंधारे राज्यमंत्री, अकोल्याचे पालकमंत्री

२००४ मध्ये तिसऱ्यांदा आमदार

२००९ मध्ये पहिल्यांदा खासदार, त्यानंतर २०१४, २०१९ मध्ये खासदार

प्रतापराव जाधव २०२४ मध्ये पुन्हा खासदार झाले

आता केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश

लोकसभेची लढत चुरशीची झाली

राज्यात महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक २१ जागा या शिवसेना ठाकरे गटाने लढल्या. तर त्यानंतर काँग्रेसने १७ जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने १० जागा लढवल्या. तर दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वाधिक २३ जागा या भाजपने लढवल्या, तर शिंदे गटाने १५ आणि अजित पवारांनी चार जागा लढवल्या.
यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा मतदार संघातून २९, ३७६ मतांनी विजय मिळवला. मतमोजणी दरम्यान अखेरच्या २५ व्या फेरीमध्ये महायुतीचे प्रतापराव जाधव यांना ३, ४८, २३८ मतं मिळाली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना ३,१८, ८६२ मतं मिळवली आहेत. तर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना २,४८, ९७७ मतं मिळाली आहे. या तिरंगी लढतीत प्रतापराव जाधव यांचा २९ हजार ३७६ मतांनी विजय झाला आहे. पण प्रतापराव जाधव यांना यंदाच्या लढाईत चुरशीची लढत द्यावी लागली होती.

Story img Loader