उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशात भाजप २७३ जागांसह आघाडीवर आहे, तर सपा दुसऱ्या स्थानावर आहे. तर पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP पक्षाने बाजी मारली आहे. दरम्यान, या सगळ्यात समीक्षक आणि बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने निकालाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या विजयावर केआरकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “मोदीजी आणि अमित शहाजी यांना आज चार राज्ये जिंकल्याच्या आनंदा पेक्षा अरविंद केजरीवाल यांच्या पंजाब विजयामुळे दुखीं असायला हवेत. कारण केजरीवाल ५० पटीने मजबूत झाले आहेत. आता ते पंजाबमधून कोट्यवधी रुपये घेऊन इतर सर्व राज्यांमध्ये निवडणूक लढवू शकतात.” त्याच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे.
एक नेटकरी केआरकेला ट्रोल करत म्हणाला, “पंजाबचे पैसे? यात एक चुक आहे. दिल्ली पंजाबपेक्षा श्रीमंत आहे. माझे राज्य पंजाब, इतके कर्जात बुडाले आहे की त्यावर मी विनोदही करु शकणार नाही.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “माझे शब्द लक्षात ठेवा, हे कुठेही जाणार नाहीत, इथेच राहणार आणि कचरा पसरवत राहणार.”
आणखी वाचा : …म्हणून समांथाने लग्नाची ‘ती’ साडी नागा चैतन्यच्या कुटुंबाला केली परत
योगी आदित्यनाथ यूपीमध्ये जिंकणार नाहीत, असा दावा केआरके गेल्या अनेक दिवसांपासून करत होता. पण आता त्याचा हा दावा चुकीचा वाटत असताना त्याने ईव्हीएममध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. त्याविषयी पोस्ट शेअर करत तो म्हणाला, “आतापर्यंत मला असे वाटायचे की, फक्त एका राज्यात, यूपीमध्येच ७ टप्प्यात निवडणुका का घेतल्या जात आहेत! पुढच्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये नेते व्यस्त आहेत आणि आधीच्या टप्प्यातील ईव्हीएम मशिन बदलण्यात यावेत म्हणून हे करण्यात आल्याचे आज कळले! निवडणूक आयोगाने चांगला खेळ खेळला आहे!”