Mohit Kamboj : देवेंद्र फडणवीस यांना मोहित कंबोज यांनी उचलून साजरा केला विजयाचा आनंद, व्हिडीओ चर्चेत

मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस यांना विजयानंतर उचलून घेतलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

Mohit Kamboj lifts Devendra Fadnavis on his shoulders after Bjp victory
मोहीत कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस यांना घेतलं उचलून (फोटोृ-मोहीत कंबोज, ट्वीटर पेज)

Mohit Kamboj महाराष्ट्रात भाजपासह महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. २०० हून अधिक जागा महायुतीने जिंकल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना मोहीत कंबोज ( Mohit Kamboj ) यांनी उचलून घेतलं होतं. तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांनाही उचलून घेतलं आणि आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रात महायुतीला उत्तम असा कौल मिळाला आहे. २२० हून अधिक जागा महायुतीला मिळाल्या आहेत. महायुतीला २३१ जागांवर आघाडी मिळाली आहे. यानंतर मोहीत कंबोज ( Mohit Kamboj ) यांनी देवेंद्र फडणवीसांना उचलून घेतलं आणि आनंद साजरा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मी राजकारणात आलो तेव्हापासून प्रचंड बहुमत पाहिलेलं नाही-अजित पवार

मी जेव्हापासून राजकारणात आलो आहे, तेव्हापासून इतकं प्रचंड बहुमत मी पाहिलेलं नाही. २२२ आणि २२५ असं महाराष्ट्रात मिळालेलं यश मी पाहिलेलं नाही असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. अलिकडच्या काळात जसं आम्हाला समजतंय ते यश पहिल्यांदाच मिळालं आहे. खूप काही काम करावं लागेल असं मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना फोन करुन सांगितलं. आम्हाला त्यात कुठलीही अडचण नाही. आमच्या पाठिशी केंद्र सरकार आहे. त्यांचा आम्हाला खूप मोठा आधार आहे असंही अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

मोहीत कंबोज यांचा व्हिडीओ काय?

मोहीत कंबोज हे भाजपाशी संबंधित नेते आहेत. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मोहीत कंबोज आधी देवेंद्र फडणवीस यांना उचलून घेताना दिसत आहेत. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनाही उचलून घेतलं. भाजपाचं हे खास सेलिब्रेशन चर्चेत आहे. मोहीत कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस यांना उचलून घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला तीनवेळा उत्तम यश

भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. कारण, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागांवर विजय मिळूनही त्यांना विरोधात बसावे लागले होते. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपने मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासात एक नवा अध्याय भाजपने त्यांच्या नेतृत्वात लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, भाजपाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सलग तीन टर्म शतकेपार झेंडा फडकवला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाला २०१४, २०१९ आणि २०२४ या कालावधीत सलग तीनवेळा स्प्ष्ट बहुमत मिळाले आहे. तर, २०१४ मध्ये भाजपाला १२३ जागा, २०१९ मध्ये १०५ आणि २०२४ मध्ये १०० पेक्षा जास्त जागांवर भाजपाचा विजय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे,आजच्या विजयानंतर भाजपाने नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. विशेष म्हणजे सलग तीनवेळा भाजपाला शंभरीपार नेण्याचा पराक्रम आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाला आणि नेतृत्वाला जमलेला नाही. त्यामुळे, हे यश महत्वाचं मानलं जातं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mohit kamboj lifts devendra fadnavis on his shoulders after bjp victory scj

First published on: 23-11-2024 at 17:55 IST