मध्य प्रदेशासह राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम राज्यातील विधानसभा निवडणुकीचं मतदान नुकतंच पार पडलं. या निवडणुकांचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. तत्पूर्वी एग्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये काही राज्यांत काँग्रेसची सरशी पाहायला मिळत आहे. तर काही राज्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाने २०१४ पासून ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा दिली. पण काँग्रेसच्या राहुल गांधींसह, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा करणाऱ्यांना घाम फोडला. चारही राज्यात काँग्रेसची सत्ता असेल आणि मिझोराममध्ये प्रादेशिक पक्षांसह काँग्रेस सरकारमध्ये असेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या एग्झिट पोलबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “भाजपाने २०१४ पासून ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा केली होती. पण त्याच काँग्रेसने आणि काँग्रेसच्या राहुल गांधीसह प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा करणाऱ्यांना घाम फोडला. पंतप्रधान मोदींना आठ-आठ दिवस एका राज्यात राहावं लागतंय. गृहमंत्र्यांना संपूर्ण देश वाऱ्यावर सोडून निवडणुकीच्या प्रचारात फिरावं लागतंय.”

“हे ‘काँग्रेसमुक्त भारत’चं लक्षण नसून २०२४ ला तुमच्यापासून भारताला मुक्ती मिळणार आहे, याची ही हवा आहे. मला पूर्णपणे खात्री आहे की, राजस्थानसह चारही राज्यात काँग्रेस पक्षाचं म्हणजेच इंडिया आघाडीचं सरकार बनेल आणि मिझोराममध्येही प्रादेशिक पक्षांबरोबर काँग्रेस सत्तेत असेल,” अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp sanjay raut reaction over 5 states assembly election exit poll congress free india slogan by bjp rmm